साईमत जळगाव प्रतिनिधी पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील बालचमूंनी सादर केलेले मल्लखांब, लाठी-काठी , लेझीम नृत्य, साहसी मानवी मनोरे, योगासने, कराटे प्रात्यक्षिक व देशभक्तीपर गीत सादरीकरणास मान्यवर व नागरिकांनी टाळ्या कडाकडाट करून दाद दिली. याप्रसगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती, पुरस्कार्थी व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणांनतर राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांचे…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा नियोजन 5 कोटी 57 लाख रूपयांच्या निधीतून जिल्हा रूग्णालयात एसएनसीयू युनिट कार्यरत करण्यात आला आहे. या युनिटचे उद्धाटन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, डॉ. गिरीष ठाकूर, डॉ.शैलेजा चव्हाण व डॉ.इंद्रानी मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते. विशेष नवजात शिशु काळजी कक्षाची यावेळी पालकमंत्र्यांनी पाहणी केली.…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिनांक २६जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दीपक वामन पाटील हे होते.तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, काशिनाथ पलोड स्कूलचे एस.एम.सी. सदस्य सरल चोपडा , शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, समन्वयिक संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे उपस्थित होत्या. डॉ . दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांची परेड घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून दाखवल्या. तसेच पूर्व प्राथमिक विभागातील काही विद्यार्थी पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष…
साईमत जळगाव प्रतिनिधी सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि मूल्य जपत भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी दीपस्तंभ मनोबल मध्ये दोन्ही हात नसलेल्या विद्यार्थ्याच्या पायाने ध्वजारोहण करण्यात आले, असा माझ्या आयुष्यातील हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा आहे, असे प्रतिपादन माजी नौदल व्हाईस ऍडमिरल सुनील भोकरे यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण व सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. मनोबल मधील विद्यार्थी राजेश पिल्ले याला दोन्ही हात नसूनही कॉम्पुटर इंजिनियरिंग पूर्ण करून त्याला टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो कार्यरत आहे. राजेशने ध्वजारोहण केले आणि त्याच वेळेस दोन्ही हात नसलेल्या माउली अडकूर या विद्यार्थिनीने राष्ट्रगीताची…
साईमत जळगाव प्रतिनिधी महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन ध्वजवंदना करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांच्यासह परिमंडल, मंडल आणि विभागीय कार्यालयातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्येतील राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निवडक निमंत्रि तांपैकी जळगावच्या जैन उद्योगसमुहाचे प्रमुख अशोक जैन हेही एक निमंत्रित होते. या सोहळ्याहून परतल्यानंतर त्या सोहळ्याचे सगळेच क्षण डोळ्यांत साठवण्याचे परमभाग्य लाभल्याची कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. अयोध्येतील सोहळ्यातही खान्देशाला मानाचे पान मिळाल्याचे त्यांचे हे मनोगत. महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्षे झाली. आमच्या घराण्याला धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरा आहे. पूर्वजांसह आई-वडिलांचा आशीर्वाद पाठीशी आहे. जिल्हा वासियांच्या सदिच्छेमुळे मला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. आयुष्यात हे मला सौभाग्य प्राप्त झालं, ही माझ्या आयुष्यातील सर्वांगसुंदर अनुभूती आहे! ‘सार्थक करूया…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा वाढदिवस दि.२३ रोजी शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये जळगाव रेल्वे स्टेशन गोरगरिबांना जेवण तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे व जेवण, रिमांड होममधील बालकांना पोटभरून जेवण, यासोबत लीलाई आश्रममधील बालकांना जेवण तर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अंध मुलांच्या शाळेत जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भाजपा जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, भाजपा सहकार आघाडी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष निलेश झोपे, भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष लताताई बाविस्कर,…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या वतीने आयोजित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला/मुलींच्या शासकीय निवासी शाळांच्या, नाशिक विभागस्तरीय क्रीडा व कला अविष्कार स्पर्धा – २०२३-२४ चे आयोजन धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. या स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी विजयीरथ कायम ठेवत सुवर्णपदक प्राप्त केले. स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून तसेच हवेत बलून सोडून करण्यात आले. यावेळी धुळे समाजकल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळेकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य शामकांत गुजांळ, समाजकल्याण अधिकारी…
साईमत जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार गोदावरी फाउंडेशच्या विविध संस्थांमध्ये गुरूवारी पार पडलेल्या नमो नवमतदाता संमेलनात १२०० नवमतदारांनी सहभाग घेतला. भाजपाच्या प्रदेशच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुबंई येथे भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ.केतकी पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार नमो नवमतदाता संमेलनात डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालया सह गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थानी सहभाग नोंदविला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, भाजपा महिला प्रदेश…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून मयूरी महाले ही एकमेव आहे. ती दिल्लीला रवाना झाली असून आपल्या जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब आहे. भवरलालजी जैन यांच्या समाजशील दृष्टीकोनातून उभारलेल्या अनुभूती स्कूलमधील मयुरी चंद्रशेखर महाले ही जळगाव जिल्ह्यातील शालेय स्तरावरील एकटीच आहे. जळगावातून १, अमरावती विभागातून ४ तर पुणे विभागातून ५ असे एकून १० कॅम्प मधून तीची निवड झाली. आरडीसी दिल्ली परेडसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३१ जण महाविद्यालयीन स्तरावरील आहेत तर ५ विद्यार्थी शालेय स्तरावरील आहेत.…