नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांचा सहभाग

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार गोदावरी फाउंडेशच्या विविध संस्थांमध्ये गुरूवारी पार पडलेल्या नमो नवमतदाता संमेलनात १२०० नवमतदारांनी सहभाग घेतला. भाजपाच्या प्रदेशच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

मुबंई येथे भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ.केतकी पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार नमो नवमतदाता संमेलनात डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालया सह गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थानी सहभाग नोंदविला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह नवमतदार तरूण वर्ग उपस्थीत होता.

गोदावरी नर्सिग महाविद्यालयात ४०० नवमतदार, प्राचार्य डॉ. विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, गोदावरी अभियांत्रिकीत ३०० नवमतदार, डॉ. विजय पाटील, डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी,कृषि, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ. अशोक चौधरी, डॉ. शैलेश तायडे, डॉ. पुनमचंद सपकाळे, डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ होमीओपॅथी येथे २०० नवमतदार प्राचार्य डॉ. डी.बी.पाटील,गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च येथे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ वर्षा पाटील वृमेंन्स कॉलेज ऑफ कॉम्युटर अ‍ॅप्लीकेशन येथे १५८ संचालक डॉ. निलीमा वारके, डॉ वर्षा पाटील वृमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स येथे ६० प्राचार्य उज्वला मावळे, हरीभाउ इन्स्टीटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे ५५ असे एकूण १२०० हून अधिक नवमतदारांनी संमेलनात सहभाग घेतला.

याप्रसंगी प्रिन्सीपल पुनीत बसन,डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालय येथे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालयात डॉ. नयना झोपे यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here