अयोध्येतील सोहळ्यातही खान्देशाला मानाचे पान

0
19

साईमत जळगाव प्रतिनिधी

अयोध्येतील राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निवडक निमंत्रि तांपैकी जळगावच्या जैन उद्योगसमुहाचे प्रमुख अशोक जैन हेही एक निमंत्रित होते. या सोहळ्याहून परतल्यानंतर त्या सोहळ्याचे सगळेच क्षण डोळ्यांत साठवण्याचे परमभाग्य लाभल्याची कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. अयोध्येतील सोहळ्यातही खान्देशाला मानाचे पान मिळाल्याचे त्यांचे हे मनोगत.

महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्षे झाली. आमच्या घराण्याला धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरा आहे. पूर्वजांसह आई-वडिलांचा आशीर्वाद पाठीशी आहे. जिल्हा वासियांच्या सदिच्छेमुळे मला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
आयुष्यात हे मला सौभाग्य प्राप्त झालं, ही माझ्या आयुष्यातील सर्वांगसुंदर अनुभूती आहे! ‘सार्थक करूया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ माझ्या वडिलांच्या या ब्रीद वाक्याचा अर्थ पूर्णपणे सार्थक झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सरकार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी १६ जानेवारीरोजी आमंत्रण दिले.

व्हॅटीकनसिटी येथे एक कोटीपेक्षा जास्त ख्रिश्चनधर्मीय दरवर्षी भेट देतात. मक्का मदीना येथे तीन कोटी मुस्लीम भेट देतात. गोल्डन टेम्पल येथे साडेतीन कोटी, तिरुपती येथे चार कोटी भेट देतात. अयोध्या येथे मात्र दरवर्षी पाच करोड भाविक भेट देतील. जगातील सर्वात मोठं धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळ अयोध्याच असणार आहे.

कान्हदेश आणि अयोध्येचा संदर्भ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यां तळोद्याच्या मल्हारराव होळकर यांच्या सून. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्याआधी खान्देश होळकर राज्याचा भाग होता. खान्देश राणीची अहिल्यादेवींची मूर्तीही राम मंदिरात बसविण्यात येणार आहे.

थाळनेरच्या लता मंगेशकर यांचं नावं एका मुख्य चौकाला देण्यात आले आहे. सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. यापेक्षा उंच रामाचा पुतळा अयोध्येत बसविण्याची योजना आहे. हां पुतळा गोंदूर (धुळे) येथील राम सुतार तयार करणार आहेत.

सोनगीर तांबे, पितळी भांडयासाठी प्रसिद्ध आहे. या तांबट कासाराणी २०० तांब्याचे नक्षीदार कळस तयार करून अयोध्येलां पाठविले. या कळसानें रामलल्लावर प्राणप्रतिष्ठेच्यावेळी जलाभिषेक झाला. अयोध्येत एवढा मोठा सन्मान जो कान्हदेशचा झाला तितका कोणालाही मिळाला नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here