विभागीय क्रीडा स्पर्धेत चाळीसगावच्या निवासी शाळेचे घवघवीत यश

0
15

साईमत जळगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या वतीने आयोजित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला/मुलींच्या शासकीय निवासी शाळांच्या, नाशिक विभागस्तरीय क्रीडा व कला अविष्कार स्पर्धा – २०२३-२४ चे आयोजन धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. या स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी विजयीरथ कायम ठेवत सुवर्णपदक प्राप्त केले.

स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून तसेच हवेत बलून सोडून करण्यात आले. यावेळी धुळे समाजकल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळेकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य शामकांत गुजांळ, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आदि उपस्थित होते.
या स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, या जिल्ह्यातील संघानी १०० मी., २०० मी, ४०० मी, रीले, रस्सीखेच, लांबऊडी, थाळीफेक तसेच भुमिका अभिनय व नृत्यसादरीकरण या विविध प्रकारात सहभाग घेतला होता. यामध्ये विभागीयस्तरीय कला – क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी विजयीरथ कायम ठेवला. क्रिडा स्पर्धेच्या एकूण १४ क्रिडा प्रकारांमधून १० क्रिडा प्रकारांत चाळीसगाव निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. सहभागी खेळाडूंचे आणि निवासी शाळेचे मुख्याद्यापक, शिक्षक, गृहपाल, तालुका समन्वयक या सर्वांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here