साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या वतीने आयोजित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला/मुलींच्या शासकीय निवासी शाळांच्या, नाशिक विभागस्तरीय क्रीडा व कला अविष्कार स्पर्धा – २०२३-२४ चे आयोजन धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. या स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी विजयीरथ कायम ठेवत सुवर्णपदक प्राप्त केले. स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून तसेच हवेत बलून सोडून करण्यात आले. यावेळी धुळे समाजकल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळेकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य शामकांत गुजांळ, समाजकल्याण अधिकारी…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार गोदावरी फाउंडेशच्या विविध संस्थांमध्ये गुरूवारी पार पडलेल्या नमो नवमतदाता संमेलनात १२०० नवमतदारांनी सहभाग घेतला. भाजपाच्या प्रदेशच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुबंई येथे भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ.केतकी पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार नमो नवमतदाता संमेलनात डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालया सह गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थानी सहभाग नोंदविला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, भाजपा महिला प्रदेश…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून मयूरी महाले ही एकमेव आहे. ती दिल्लीला रवाना झाली असून आपल्या जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब आहे. भवरलालजी जैन यांच्या समाजशील दृष्टीकोनातून उभारलेल्या अनुभूती स्कूलमधील मयुरी चंद्रशेखर महाले ही जळगाव जिल्ह्यातील शालेय स्तरावरील एकटीच आहे. जळगावातून १, अमरावती विभागातून ४ तर पुणे विभागातून ५ असे एकून १० कॅम्प मधून तीची निवड झाली. आरडीसी दिल्ली परेडसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३१ जण महाविद्यालयीन स्तरावरील आहेत तर ५ विद्यार्थी शालेय स्तरावरील आहेत.…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, मधिल प्राथमिक विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी संजीवनी स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले. या स्पर्धेत गुर्वेश जेऊरकर, मोहित पवार, रुद्र निंबाळकर, सारा अजनाडकर यांनी सुवर्ण पदक पटकावले आणि वेदांत प्रवीण पाटील, वेदांत विठ्ठल पाटील, ध्रुव पाटील, लिंगेश पाटील, नैतिक पाटील, गोविंद पाटील, सुरज शर्मा, विश्वजित निकम, गीतेश राणा, रुचा जेऊरकर, कृतिका महाजन, परीधी सोनार आणि काव्या खडके यांनी रौप्य पदक तर यश सपकाळे आणि जागृत निकुंभ यांनी कांस्य पदक मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव स्कूल चे प्राचार्य प्रवीण सोनवणे आणि समन्वयिका स्वाती अहिरराव यांच्या हस्ते…
साईमत जळगाव प्रतिनिधी या वर्षी अ भा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण ९ ठिकाणी साजरे होत असुन त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर “नाट्यजागर” सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील 22 केंद्रांवर होणार असुन, त्यातील एक केंद्र “जळगाव” आहे. रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या या ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजनानिमित्त जळगावा जिल्हा मराठी नाट्य परिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्य संगीत स्पर्धा आयोजित…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित कार्यक्रमात आयएफआरएमच्या सदस्यांनी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध भक्तीगीते सादर करीत राममय वातावरण निर्माण केले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांची सामूहिक आरती करण्यात आली. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमास रोटरी वेस्टच्या अध्यक्ष सरिता खाचणे, माजी अध्यक्ष नितीन रेदासनी, अनिल कांकरिया, योगेश भोळे , सुनील सुखवानी, आयएफआरएमच्या जळगाव चॅप्टर चेअरमन डॉ. अपर्णा मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी प्रांतपाल शब्बीर शाकीर व डॉ. राजेश पाटील यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी राम आयेंगे – शिल्पा सफळे, रामजी की निकली सवारी – डॉ. सुशीलकुमार राणे, हे राम हे राम – अमित माळी, कौसल्येचा…
साईमत जळगाव प्रतिनिधी ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’ आयोध्येत स्थापन झालेल्या प्रभु श्री राम यांचे रूप डोळ्यांमध्ये बसवा. आपली जी बुद्धी आहे त्यात रामांना पाहून सुखी झाले पाहिजे. राग, व्देष, वैर आणि भय या चार गोष्टीचा त्याग केल्याने बुद्धी सुखरूप होते. तसेच हनुमंत भेट, बालीवध, वनलीला व सेतू बंध, विभीषण भेट, इंद्रजीत, कुंभकर्ण, रावणवध आणि प्रभु श्री राम यांचे राज्याभिषेक सोहळा जी. एस. मैदानावर उत्साहात साजरा झाला. आज पंच दिवशीय कथेत प्रभु रामांच्या विविध आदर्शांचे उदाहरण देवून हभप परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी कथेत विषद केली. प्रभु श्री राम यांचा आदर्श सर्वांनी अंगिकारला पाहिजे आणि बुद्धीत आणला पाहिजे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव रनर्स ग्रुपच्या किमान ६० सदस्यांनी गेल्या दोन महिन्यापासून टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव शहर ,बहिणाबाई विद्यापीठ ,मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला तसेच या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते टाटा मुंबई मॅरेथॉन जगातील नामांकित मॅरेथॉनपैकी एक आहे.यात यावर्षी ५५ हजार स्पर्धक जगभरातून सहभागी झाले होते त्याचाच एक भाग म्हणून जळगाव रनर्स ग्रुपचे ५० पुरुष व १० महिला यांनी यात सहभाग नोंदविला. यापैकी 40 जण हे पहिल्यांदा टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले. ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन तसेच २१ .किलोमीटर मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. जास्तीत जास्त वेगाने…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उत्साह शिगेला पोहोचला आहे.चित्रपट विषयक प्रदर्शनी , शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. यंदा या महोत्सवाचे ३रे वर्ष असून खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रितांन मध्ये जळगावचे मूळ रहिवासी आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचाही समावेश होता . ते या भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून ८८९ जणांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते त्यात ५०६ विशेष निमंत्रित होते. यात जेष्ठ विधीतज्ज्ञ आणि पदमश्री पुरस्कार प्राप्त विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. त्यात ॲड.उज्ज्वल निकम यांचे समावेश करण्यात आला असल्याने ही उत्तर महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे. हा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक…