रोटरी वेस्टच्या कार्यक्रमात रामगीतांनी भक्तीमय वातावरण

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित कार्यक्रमात आयएफआरएमच्या सदस्यांनी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध भक्तीगीते सादर करीत राममय वातावरण निर्माण केले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांची सामूहिक आरती करण्यात आली.

मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमास रोटरी वेस्टच्या अध्यक्ष सरिता खाचणे, माजी अध्यक्ष नितीन रेदासनी, अनिल कांकरिया, योगेश भोळे , सुनील सुखवानी, आयएफआरएमच्या जळगाव चॅप्टर चेअरमन डॉ. अपर्णा मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी प्रांतपाल शब्बीर शाकीर व डॉ. राजेश पाटील यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.

यावेळी राम आयेंगे – शिल्पा सफळे, रामजी की निकली सवारी – डॉ. सुशीलकुमार राणे, हे राम हे राम – अमित माळी, कौसल्येचा राम – तृप्ती बाकरे, श्रीराम चंद्र कृपाळू – डॉ. स्मिता पाटील, अच्युतम केशवम – नेहा नैनानी, सुख के सब साथी – डॉ. विजय शास्त्री, मेरे घर राम आये हैं – गौरव मेहता, अविरत ओठी घ्यावे नाम – डॉ. मनीषा दावलभक्त आदींनी गीते सादर केली. कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख राहुल मोदीयानी व सहप्रमुख सचिन वर्मा यांनी केले. चेतन गांधी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ. सुशीलकुमार राणे व डॉ. मनीषा दावलभक्त यांनी केले. रोटरी वेस्ट, रोटरॅक्ट जळगाव वेस्ट, आयएफआरएमच्या सदस्यांची परिवारासह उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here