पलोड स्कूलचे कराटे स्पर्धेत यश

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, मधिल प्राथमिक विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी संजीवनी स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले.

या स्पर्धेत गुर्वेश जेऊरकर, मोहित पवार, रुद्र निंबाळकर, सारा अजनाडकर यांनी सुवर्ण पदक पटकावले आणि वेदांत प्रवीण पाटील, वेदांत विठ्ठल पाटील, ध्रुव पाटील, लिंगेश पाटील, नैतिक पाटील, गोविंद पाटील, सुरज शर्मा, विश्वजित निकम, गीतेश राणा, रुचा जेऊरकर, कृतिका महाजन, परीधी सोनार आणि काव्या खडके यांनी रौप्य पदक तर यश सपकाळे आणि जागृत निकुंभ यांनी कांस्य पदक मिळवले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव स्कूल चे प्राचार्य प्रवीण सोनवणे आणि समन्वयिका स्वाती अहिरराव यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. प्राचार्य प्रवीण सोनवणे यांनी मेहनत व चिकाटीने यश कमवत तुमचे व स्कूलचे नाव देशपातळीवर न्या असे मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक शिल्पा मांडे, ज्ञानेश्वर पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here