साईमत जळगाव प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षेद्वारे मोठ्या भाऊंनी पुढच्या पिढीला मूल्ये, विचार व तत्त्वे दिलीत. हाच वारसा घेऊन संस्था वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड यांनी केले. गांधी विचार संस्कार परीक्षेच्या जळगाव जिल्हास्तरीय पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईचे अध्यक्ष जे. के. पाटील, गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या सौ. अंबिका जैन, डॉ. गीता धर्मपाल, डॉ. अश्विन झाला, वरिष्ठ गांधीयन अब्दुलभाई व परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी उपस्थित होते. आपल्या मनोगतात दक्षिण आफ्रिकेतील सैनिक अधिकारी जनरल स्मट्स याला अहिंसा मार्गाने गांधीजींनी कसे जिंकले, गांधीजींनी स्वतः तयार करुन…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी शेतकरी, वंचित, दुर्लक्षित घटक, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी शुभेच्छा संदेशात पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी अंकुश पीनाटे,…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा कारागृहात मानवी स्पर्शाद्वारे चालणाऱ्या ई-किऑक्स मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक ओ. आर वांदेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन विठ्ठल पाटील, तुरुंगाधिकारी एस.पी.कवार, आर.ओ. देवरे आदी उपस्थित होते. ई-प्रिसन्स् च्या बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत ई-किऑक्स मशीन कारागृहास प्राप्त झाले आहे. या मशिनद्वारे कारागृहातील बंद्यांना प्रकरणाची स्थिती, कैदीच्या खात्यात शिल्लक खाजगी रोख शिल्लक, पुढील सुनावणीची तारीख, माफी, मजुरी सुविधा, पॅरोल / फर्लो अर्जाची स्थिती, प्रकाशन तारीख, उर्वरित फोन व मुलाखत संधी यांची माहिती घेता येईल. छत्रपती संभाजीनगरच्या समता फौंडेशनच्या वतीने कैद्यांच्या मनोरंजनासाठी एलईडी…
साईमत जळगाव प्रतिनिधी पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील बालचमूंनी सादर केलेले मल्लखांब, लाठी-काठी , लेझीम नृत्य, साहसी मानवी मनोरे, योगासने, कराटे प्रात्यक्षिक व देशभक्तीपर गीत सादरीकरणास मान्यवर व नागरिकांनी टाळ्या कडाकडाट करून दाद दिली. याप्रसगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती, पुरस्कार्थी व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणांनतर राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा नियोजन 5 कोटी 57 लाख रूपयांच्या निधीतून जिल्हा रूग्णालयात एसएनसीयू युनिट कार्यरत करण्यात आला आहे. या युनिटचे उद्धाटन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, डॉ. गिरीष ठाकूर, डॉ.शैलेजा चव्हाण व डॉ.इंद्रानी मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते. विशेष नवजात शिशु काळजी कक्षाची यावेळी पालकमंत्र्यांनी पाहणी केली.…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिनांक २६जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दीपक वामन पाटील हे होते.तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, काशिनाथ पलोड स्कूलचे एस.एम.सी. सदस्य सरल चोपडा , शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, समन्वयिक संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे उपस्थित होत्या. डॉ . दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांची परेड घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून दाखवल्या. तसेच पूर्व प्राथमिक विभागातील काही विद्यार्थी पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष…
साईमत जळगाव प्रतिनिधी सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि मूल्य जपत भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी दीपस्तंभ मनोबल मध्ये दोन्ही हात नसलेल्या विद्यार्थ्याच्या पायाने ध्वजारोहण करण्यात आले, असा माझ्या आयुष्यातील हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा आहे, असे प्रतिपादन माजी नौदल व्हाईस ऍडमिरल सुनील भोकरे यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण व सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. मनोबल मधील विद्यार्थी राजेश पिल्ले याला दोन्ही हात नसूनही कॉम्पुटर इंजिनियरिंग पूर्ण करून त्याला टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो कार्यरत आहे. राजेशने ध्वजारोहण केले आणि त्याच वेळेस दोन्ही हात नसलेल्या माउली अडकूर या विद्यार्थिनीने राष्ट्रगीताची…
साईमत जळगाव प्रतिनिधी महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन ध्वजवंदना करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांच्यासह परिमंडल, मंडल आणि विभागीय कार्यालयातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्येतील राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निवडक निमंत्रि तांपैकी जळगावच्या जैन उद्योगसमुहाचे प्रमुख अशोक जैन हेही एक निमंत्रित होते. या सोहळ्याहून परतल्यानंतर त्या सोहळ्याचे सगळेच क्षण डोळ्यांत साठवण्याचे परमभाग्य लाभल्याची कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. अयोध्येतील सोहळ्यातही खान्देशाला मानाचे पान मिळाल्याचे त्यांचे हे मनोगत. महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्षे झाली. आमच्या घराण्याला धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरा आहे. पूर्वजांसह आई-वडिलांचा आशीर्वाद पाठीशी आहे. जिल्हा वासियांच्या सदिच्छेमुळे मला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. आयुष्यात हे मला सौभाग्य प्राप्त झालं, ही माझ्या आयुष्यातील सर्वांगसुंदर अनुभूती आहे! ‘सार्थक करूया…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा वाढदिवस दि.२३ रोजी शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये जळगाव रेल्वे स्टेशन गोरगरिबांना जेवण तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे व जेवण, रिमांड होममधील बालकांना पोटभरून जेवण, यासोबत लीलाई आश्रममधील बालकांना जेवण तर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अंध मुलांच्या शाळेत जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भाजपा जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, भाजपा सहकार आघाडी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष निलेश झोपे, भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष लताताई बाविस्कर,…