साईमत जळगाव प्रतिनिधी रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा , आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे.असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त 77 आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयामध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन ३ मार्च रोजी जिल्हा न्यायालयात करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपुर्व अशी एकुण ३५०७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. न्यायाधीश वृंद, वकिल वृंद, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजुचे पक्षकार यांचे मदतीने २६४५ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत ८६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातुन एकुण रक्कम रुपये १६५,६०,३६,३०१/- वसुल करण्यात आले. दिनांक २७/०२/२०२४ ते दि. ०२/०३/२०२४ पर्यंत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी न्यायाधीश एन. जी. देशपांडे याचे पॅनल…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ खान्देश सेंट्रल परिसरात असलेल्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्समध्ये दुकाने खरेदीसाठी जळगावातील दोन व्यापारी भावंडांनी ३ कोटी ७३ लाख रुपये दिले होते. अनेक वर्ष होऊनही दुकाने मिळत नसल्याने तसेच दिलेली रक्कमही परत न दिल्याने शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून बांधकाम व्यावसायिक साहित्या परिवारातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील फुले मार्केटमध्ये महेंद्र रोशनलाल नाथानी (५०) व त्यांचे भाऊ आनंद नाथानी यांचे कपड्याचे दुकान आहे. महात्मा फुले मार्केटमधील गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ते दुसरीकडे दुकान घेण्याच्या विचारात होते. एका कार्यक्रमात त्यांची बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्याशी भेट…
साईमत जळगाव प्रतिनिधी गावाच्या एकीच्या जोरावर गावातील कोणते काम अशक्य नाही. आता निवडणूक संपली असल्याने गावातील मतभेद विसरून गावाची एकजूट कायम ठेवून एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून , बंजारा तांड्यातील उर्वरित विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असून रामदेववाडी ते कुऱ्हाडदे रस्त्याचे डांबरीकरण करून त्यासाठी ४ कोटीचा निधी लवकरच मंजूर करणार असून शेती रस्त्याना प्राधान्य देवून गाव अंतर्गत गटार बधाकामासाठी व रस्ते काँक्रिटीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ठेवावी. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते रामदेववाडी…
साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज ऑफ एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्वयंम २ के २४ स्नेहसंमेलन जल्लोषात सुरू आहे. यात विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण सुरू आहे. यानिमित्त ६ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या स्नेहसंमेलनात रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. मॅनेजमेंट पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी विभागातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेत ४८, मेहंदी स्पर्धेत ५२, संगीत खुर्ची स्पर्धेत १२० स्पर्धक, तर अंताक्षरी स्पर्धेत १२ समूह सहभागी झाले. कार्यक्रमादरम्यान सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अंताक्षरी स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले. सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूड डे, चॉकलेट डे, हैलोवीन डे,…
साईमत जळगाव प्रतिनिधी वैद्यकीय महाविद्यालयात ३ मार्च रोजी नवजात बालकांना ‘ दो बुंद ‘ पोलीओ लसीचा डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर उपस्थित होते. देशभर ३ मार्च रोजी पल्स पोलीओचे नवजात पालक ते पाच वर्षाच्या बालकांना हा डोस देण्यात येतो. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणाचे डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या नियोजनात हे काम सुरु आहे.
साईमत जळगाव प्रतिनिधी के.सी.ई सोसायटीच्या पी. जी. कॉलेज येथे वाषिर्क स्नेहसंमेलन ‘ह्रिदम-२४’ अंतर्गत मोफत रक्त तपासणी शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. केतन नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा लाभ १३५ जणांनी घेतला. या वेळी प्राचार्य डॉ.व्ही. एस. झोपे, समन्वयक डॉ. आर. एम. पाटील, प्रा. संदीप पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महालॅब एच.एल.एल.चे धीरज पानपाटील, भावना पाटील, चेतन धनगर, संदीप सुरवाडे व इतर यांनी रक्त तपासणी चाचण्यांसाठी योगदान दिले. रक्त तपासणी शिबिरात मधुमेह निदानासाठी रक्तातील साखर, सीबीसी काउंट आदींचे मूल्यांकन करण्यात आले. ॲनिमिया, लूकेमिया सारख्या अनेक प्रकारचे विकार ओळखण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवाह सोहळ्याचा खर्च सामान्य कुटुंबाला आज परवडणारा नाही. समाजातील गरजूंची मदत व्हावी या उदात्त उद्देशाने मुस्लीम काकर समाजाने सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे . काकर समाजाचे कार्य समाज हितकारी आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी केले. ते ते येथील काकर समाजातर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्या प्रसंगी बोलत होते. या विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक गणेश सोनवणे, अशोक लाडवंजारी, विक्की बजाज, वरिष्ट पत्रकार वाहिद काकर, राजु बर्तन वाला उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रियाज काकर यांनी सांगितले की, आजचा हा पाचवा सामुहिक विवाह सोहळा आहे. समाज संघटनेतर्फे समाजातील गरजू व्यक्तींना नेहमीच…
साईमत जळगाव प्रतिनिधी एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते. अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव जिल्हा रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेतर्गत नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून बसविण्यात आली आहे. नाशिक विभागातली पहिली अशी ही मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची भावना जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. येथील जिल्हा रुग्णालयात ही ‘मदर मिल्क बँक ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रस्तावित जिल्ह वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे इ. माध्यमातून संस्कारी पिढी घढवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. जिल्हास्तरीय “ वारकरी भवन ” बांधकाम जळगाव परिसरात होण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी मंडळींची व लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी होती.त्यानुसार खेडी शिवारात ६ कोटी ०६ लक्ष निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच यासाठी सर्व खासदार व आमदार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले. वारकरी भवनाचे भूमिपुजन मुख्यमंत्री…