साईमत जळगाव प्रतिनिध जी. एच. रायसोनी स्पोर्ट अॅन्ड कल्चरल फाउंडेशनतर्फे जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविध्यालय तसेच सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर जिल्हाभरातील दिग्गज व उदयोन्मुख खेळाडू व पदाधिकाऱ्यांचा सहभागात शुक्रवारी तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. महाविद्यालयातील व स्कूलमधील या स्पर्धेत जिल्ह्यातील २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. महाविद्यालयातील उद्घाटन कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी मेमोरियलच्या समन्वयिका अमितासिंग या उपस्थित होत्या, तर महाराष्ट्र…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी अ. भा. हदयास्त्रक्रिया भूलतज्ञ परिषद या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच नागपूरला व्दिवार्षिक निवडणूक झाली असता जळगावच्या नामवंत हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ डॉ. वर्षा कुलकर्णी यांची या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी वर सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी विक्रमी मतांनी निवड झाली. जळगावच्या डॉक्टरांची या संस्थेत निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अ. भा. हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ परिषद या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची नागपूर येथे नुकतीच कार्यशाळा पार पाडली. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत जळगावच्या हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ उॉ. वर्षा कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. कुलकर्णी या गेल्या चोवीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून आज पर्यंत अकरा हजारावर शस्त्रक्रियात…
साईमत जळगाव प्रतिनिधी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १४ फेब्रुवारीला झाले, या उद्घाटन सोहळ्यास जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन हे ज्योती जैन यांच्यासह उभयता उपस्थित होते. भारतातून या कार्यक्रमासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते, अबुधाबी येथील या सोहळ्याला तेथील स्थानिक भारतीयांची संख्या लक्षणीय होती हे विशेष होते, अबुधाबी मधील या हिंदू मंदिरात प्रत्येक शिखरावर रामायण, शिव पुराण, भागवत आणि महाभारतातील कथा तसेच भगवान जगन्नाथ , भगवान स्वामींनारायन , भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अयप्पा यांच्या कथांचे वर्णन…
साईमत जळगाव प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी १५ फेब्रुवारी रात्री ११ वाजता छापा टाकुन बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना एका आरोपीला अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर ४६ लाख ३७ हजार पाचशे एवढ्या किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शेतात कारखाना टाकून बनावट देशी दारूची निर्मीती होत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरूवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता पथकासह ओझरखेडा येथील बनावट दारू निमिर्ती करणाऱ्या कारखान्यावर…
साईमत जळगाव प्रतिनिधी जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील आमुलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आले. यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल देखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला. आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड २०२४ चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदरसिंग…
साईमत जळगाव प्रतिनिधी महापालिकेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांचे ९७२ कोटी २७ लक्ष रुपयांचे मुळ अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले असून या अंदाजपत्रकास प्रशासक म्हणून डॉ. विदया गायकवाड यांनी मंजुरी दिली. २८ कोटी ४४ लक्ष शिल्लकीचा हा अर्थसंकल्प असून यात कर वाढ नसल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तसेच सन २०२३-२४ चा सुधारीत ९०० कोटी १० लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकाला देखील यावेळी मंजुरी देण्यात आली आहे. सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक १६८ कोटी २२ लक्ष असून महसुली जमा ३६७ कोटी ८२ लक्ष आहे. तसेच भांडवली जमा ३०५ कोटी ७३ लक्ष असून असाधारण देवाण घेवाण ७६ कोटी ४ लक्ष आहे तर, परिवहन…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे दि.१४ फेब्रुवारी रोजी “मा बसंत आयो री” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे प्रतिवर्षी वसंत पंचमी आणि जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून श्री सरस्वती पूजन व वाद्य पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सुरवातीला संगीत विद्यालयाचे प्रमुख किरण सोहळे यांनी प्रास्ताविक करुन वसंत पंचमीचे पौराणिक महत्त्व तथा जीवनातील संगीताचे महत्त्व विशद केले. या नंतर प्रतिष्ठान चे सचिव डॉ.रत्नाकर गोरे यांच्या हस्ते सरस्वती व वाद्य पूजन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वसंत ऋतु सर्व ऋतूंचा राजा आहे, हा नवनिर्मितीचा काळ आहे. अनेक नवनवीन रचना करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावे असे आवाहन डॉ.…
साईमत जळगाव प्रतिनिधी विद्यार्थ्यांना कृतीद्वारे विज्ञानाच्या संकल्पना शिकता याव्यात, हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांच्या तर्फे “हँड्स ऑन सायन्स” या कार्यशाळेचे आयोजन महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय व मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून एसडी-सीड गव्हर्निंग बोर्ड सदस्य तसेच कुतूहल फाउंडेशनचे संचालक महेश गोरडे हे होते. शाळेच्या विज्ञान पुस्तकातील फक्त शब्द वाचून व लिहून विज्ञान समजणे केवळ अशक्य आहे. बाल वयातच विद्यार्थ्यांना विज्ञान संकल्पना स्पष्ट न झाल्याने भविष्यातील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांना अपेक्षित यश प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे बालपणापासूनच मुलांनी स्वानुभव आणि कृतीतून शिकणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मेह्श गोरडे…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये दिनांक १४ फेब्रुवारी रोजी मातृ पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला. “मातृ पितृ उपासना दिवस” साजरा करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांचे विचार मांडले. चैताली पाटील आणि सिमरन बारी या विद्यार्थिनींनी आपल्या जीवनातील पालकांचे महत्व या विषयावर भाषण केले. प्राचार्य प्रवीण सोनवणे यांना सक्रिय सहभाग पाहून आणि तरुण पिढीची “पालक” बद्दलची काळजी ऐकून खूप समाधान वाटले.सर्व विद्यार्थ्यांना एक छोटी व्हिडिओ क्लिपही दाखवण्यात आली. शाळेतील उपस्थित शिक्षक, शिक्षिकेच्या मुलांच्या हस्ते त्यांचे पूजन करण्यात आले. प्राथमिक विभागाच्या समन्वयिका अनघा साघडे यांनी मनोगत व्यक्त केले.…
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल असे प्रतिपादन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी केले. जिल्हास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात जिल्हास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल…