संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

0
9

साईमत जळगाव प्रतिनिधी

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १४ फेब्रुवारीला झाले, या उद्घाटन सोहळ्यास जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन हे ज्योती जैन यांच्यासह उभयता उपस्थित होते.

भारतातून या कार्यक्रमासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते, अबुधाबी येथील या सोहळ्याला तेथील स्थानिक भारतीयांची संख्या लक्षणीय होती हे विशेष होते, अबुधाबी मधील या हिंदू मंदिरात प्रत्येक शिखरावर रामायण, शिव पुराण, भागवत आणि महाभारतातील कथा तसेच भगवान जगन्नाथ , भगवान स्वामींनारायन , भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अयप्पा यांच्या कथांचे वर्णन करणारी कोरीवकाम आहेत , यासह या मंदिरात राधाकृष्ण, राम सीता, , शंकर पार्वती या सह 16 विविध देवतांच्या आकर्षक मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. चिकाटी, बांधिलकी, आणि सहशीलतेचे प्रतिनिधित्व करणारे उंट, हत्ती सुद्धा शिल्पांमध्ये कोरण्यात आले आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या ५ घटकांच्या सुसंवादाचे एक अद्वितीय चित्रण म्हणून ‘डोम ऑफ हार्मोनी’ बनवण्यात आले आहे

‘अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अनुभवल्यानंतर अबुधाबीतील श्री स्वामीनारायण मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले. बीएपीएस मंदिर म्हणजे वास्तूकलेचा अप्रतिम नमुना म्हणता येईल, मंदिरात प्रत्येक ठिकाणी शिल्पकलेतून साकारण्यात आलेल्या कथा पाहणे अविस्मरणीय आहे.
                 -अशोकभाऊ जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम ली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here