ओझरखेडा येथील बनावट देशी दारू कारखान्यावर छापा

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी १५ फेब्रुवारी रात्री ११ वाजता छापा टाकुन बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना एका आरोपीला अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर ४६ लाख ३७ हजार पाचशे एवढ्या किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शेतात कारखाना टाकून बनावट देशी दारूची निर्मीती होत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरूवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता पथकासह ओझरखेडा येथील बनावट दारू निमिर्ती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. याठिकाणी पथकाला मोठ्या प्रमाणावर बनावट दारूचा साठा हाती लागला. दरम्यान पथकाने बनावट देशी दारूसह बाटल्यांना लावायचे बूच, बाटल्या, स्वयंचलित मशिनरी असे ४६ लाख ३७ हजार पाचशे एवढ्या किमंतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

हा अवैध बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक अं. व दक्षताप्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आल्याचे जळगाव जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी सांगितले.

सदर कारवाई जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन, भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, निरीक्षक अन्वर खतीब, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, राजकिरण सोनवणे, एएसआय आय.बी.बाविस्कर, जवान सागर देशमुख, नितीन पाटील, योगेश राठोड, नंदू नन्नवरे यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here