लंडन : वृत्तसंस्था पुतीन यांचे आचारी म्हणून परिचित असलेले येगवेनी प्रिगोजहिन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यासह 23 जणांच्या हत्येसाठी कुख्यात व्हॅगनर ग्रुपच्या किलरला सुपारी दिली आहे. प्रिगोजहिन रशियाचे अब्जाधीश आहेत. रशियात त्यांची अनेक हॉटेल आहेत. पुतीन आपल्या अनेक पार्ट्या प्रिगोजहिन यांच्या हॉटेलमध्ये आयोजित करतात.प्रिगोजहिन उद्योजक असले तरी त्यांची पुतीन यांचे आचारी अशी ओळख आहे. प्रिगोजहिन यांनी मोठी रक्कम देऊन व्हॅगनर ग्रुपला युक्रेनला पाठवले आहे.पाच महिन्यांपासून 400 मारेकरी युक्रेनमध्ये मुक्काम ठोकून असल्याचे सांगितले जाते. हे मारेकरी बेलारूस मार्गे युक्रेनमध्ये घुसले आहेत. आतापर्यंत सुपारी किलर दक्षिण आफ्रिकेत होते परंतु युक्रेनमध्ये दडून बसलेल्या मारेकऱ्यांची एकूण संख्या 4 हजारांवर आहे. युक्रेनच्या सुरक्षा दलाने काही…
Author: Saimat
यावल : प्रतिनीधी ( सुरेश पाटील) आश्रय फॉउंडेशन यावल -रावेर तर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिराचे आयोजन विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा येथे आश्रय फॉउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व आश्रय फॉउंडेशन पदाधिकारी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रुकसाना फिरोज तडवी या होत्या. शिबिराचे उदघाट्न आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे हार व पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा ता.यावल येथे डॉ. कुंदन फेगडे, डॉ.राजेश चौधरी, डॉ. पराग पाटील, डॉ.भरत महाजन, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले आदी आश्रय फॉउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी…
पहुर ता. जामनेर पहूर कसबे गावात ठेकेदाराकडून बोगस कामे सुरू असल्याची जोरदार चर्चा पहुर परिसरात सुरू असून या कामांविषयी सत्ताधारी, विरोधी व अधिकारी गप्प का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पहूर कसबे गावातील वार्ड क्रमांक दोन मध्ये राजाराम बनकर यांच्या घरा जवळील गटारी वर नुकताच ढापा टाकण्यात आला होता तो ढापा पंधरा दिवसातच एका बाजूने तुटला व एका बाजूने चक्क आसाऱ्या दिसू लागल्या होत्या त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता पहूर येथील काही नागरिक पहूर येथील कामांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व गटविकास अधिकारी जामनेर यांच्याकडे करणार असल्याची चर्चा सुरू होताच…
जामनेर : प्रतिनिधी येथील प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या ठिकाणी महाशिवरात्री च्या पावन पर्वा निमित्त भाविक भक्तांना कडून विश्व शांती साठी प्रतिंज्ञा घेण्यात आली. प्रथम विद्यालयात जामनेर जि. परिषद मराठी शाळेचे केंद्र प्रमूख के एम अंभोरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या प्रमूख सुषमा दीदी , सूनिता दीदी यांच्यासह परिसरातील भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ब्रम्हा कुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या प्रमूख सुषमा दीदी यांनी महाशिवरात्री निमित्त मार्गदर्शन केले.
सोयगाव : प्रतिनिधी शेतकरी सन्मान योजनेसाठी लाभार्थ्यांना संचिका ऑनलाईन करण्यासाठी सोयगाव तालुक्यात सन्मान योजनेचे पोर्टलच बंद असल्याने नवीन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन करण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहे. सोयगाव तालुक्यात शेतकरी सन्मान योजनेची संकेतस्थळ बंद असल्याने नव्याने संचिका ऑनलाईन करणाऱ्या शेताकायांना मोठ्या अडचणी होत असून केंद्र शासनाची महत्वाकांक्षी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी पोर्टलच बंद असल्याने डोक्याला हात लावून बसावे लागत आहे. कृषी विभागाने या योजनेच्या बाबतीत हात वर केले असल्याने शेतकऱ्यांना संचिका ऑनलाईन करण्यासाठी गाव पातळी वरून ते तालुकास्तरावर पायपीट करावी लागत असून तालुका कृषी विभाग मात्र शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे जाण्याचा उपदेश देत आहे. तर महसूल विभाग संकेतस्थळ…
राज्य नाट्य स्पर्धा जसजशींतिम टप्प्याकडे झुकु लागली आहे तसतशी स्पर्धेची उंची वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.काल इंदौर येथील नाट्यसंपदा संस्थेने सादर केलेले डहुळ या नाटकाने एक विशिष्ट उंची गाठल्याने रसिकांनाही ते भावले. नाटकाचे खरं सादरीकरण किती सुटसुटीत व रेखीव असावं व ते सर्व बाजूंनी कसं परिपूर्ण असावं याचा सुखद प्रत्यय आणून दिला.विशेष म्हणजे प्रमुख भूमिका, दिग्दर्शक व नाट्य रूपांतरण या तिन्ही आघाड्यांवर श्रीराम जोग यशस्वी ठरले असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरु नये. जुन्या पिढीतील महान साहित्यिक व आजच्या पिढीतील उदयास येणारा साहित्यिक यांच्या मनातील वैचारिक व्दंद सादर करतांना ‘डेहुळ’ ने ‘महान’ होण्याच्या धडपडीत आपण आपले स्वतःचे अस्तित्व कसे गमावून बसतो…
सोयगाव : प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या गोरगरीब महीला पुरूष व अपंग 30 तीस कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी पुणे येथील के. एम. हॉस्पिटल सामाजिक संस्थेच्या बिराजदार मॅडम, महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अलीबाबा तडवी, औरंगाबाद जिल्हा कार्यध्यक्ष करीम तडवी, ग्रामीण विकास सामाजिक संस्थेचे तालुका अधिकारी नागणे , तालुका कार्यध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य अनुप तडवी, सामाजिक कार्यकर्ते जुबेर तडवी, मा. ग्राम पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नजीर तडवी, मेहमूद तडवी, वजीर तडवी आदी उपस्थित होते.
जळगाव : प्रतिनिधी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने निविष्ठांची कार्यक्षमता 80 ते 90 टक्के मिळेल. त्यामुळे उत्पादनात अधिक वाढ होते. पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, मजुरांची उलब्धता, खतांची टंचाई या समस्यांवर उपाय ठिबक सिंचन तंत्रज्ञान हाच उपाय असून शेतकऱ्यांच्या समृद्धीचा ठिबक सिंचन तंत्र राजमार्ग आहे असे मत जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांनी व्यक्त केले. कोळपिंप्री येथे व्ही. एम. पाटील यांच्या मोसंबी, आंबा, केळी, गहू, हरभरा पिके असलेल्या शेतांमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला होता. डॉ.बी.डी.जडे यांनी कापूस आणि मका लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी भरत वारे, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विसनजी नगर येथे आम आदमी पुरस्कृत, श्रमिक विकास संघटन या कामगार युनियनचे नुकतेच शाखा फलक अनावरण करण्यात आले. या प्रसंगी पार्टीचे जिल्हा सचिव रईस भाई तसेच मिडीया प्रमुख योगेश भोई यांची उपस्थिती होती. शहर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. महानगर संघटक रत्नाकर खरोटे यांनी सुत्र संचालन केले.पार्टीचे प्रवक्ता चंदन पाटील यांनी आभार मानले. शाखा कार्यकारिणी पुढील प्रमाणे, शाखाध्यक्ष रविंद्र सोनवणे, उपाध्यक्ष कैलास चौधरी, सचिव हरून शेख, संघटक प्रकाश सोनवणे यांच्या सह आदींचा कार्यकारणीत समावेश आहे..
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे खान्देशातील पहिल्या वही गायन महोत्सवाचे 4 ते 6 मार्च दरम्यान सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत महात्मा गांधी उद्यानात आयोजन करण्यात आले आहे. यात तीन दिवस लोककलेचा जागर होणार असून महोत्सवाच्या समन्वयकपदी लोककलावंत विनोद ढगे यांची निवड करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन आले आहे. खान्देशातील लोककलावंताना शासनस्तरावर आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, खान्देशातील पारंपारीक लोककलेच्या सन्मान व्हावा या लोककलेत कार्यरत कार्य करणाऱ्या लोककलावंताचा यथोचित गौरव व्हावा, या उद्देशाने शासनातर्फे महोत्सवाचे आयोजन…