Author: Saimat

मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षने ठाकरे सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘दाऊदच्या दलला मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ असे लिहिलेले फलक लावून भाजपच्या नेत्यांनी घोषणा दिल्य. विरोधी पक्ष नेते फडणवीसांनी केली टीका राज्य विधिमंडळच्या आजपासून चालू होणाऱ्या अर्थसंकलपीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षने संघर्षचा संकल्प केला आहे. हे सरकार दाऊद समर्पित आहे अशी टीका फडणवीस यांनी केली व बुधवारी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिले. ‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?… दाऊद का दलाल है…’ अशा घोषणा भाजपाच्या आमदारांनी…

Read More

रावेर : प्रतिनिधी शहरातील सप्तश्रृंगी नगरातील ४६ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील सप्तश्रृंगी नगरात राहणारी सुनिता महाजन (वय-४६) या विवाहितेचा लाकडी दांडा डोक्यात मारल्याने खून केल्याची धक्कादायक घटना गुरूवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली. मयत विवाहितेचा मुलगा हा दुपारी कामावरून जेवनासाठी घरी आला तेव्हा घराला कुलूप होते. कूलूप उघडून पाहिले असता आईचा खून झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाला शेजारच्या नागरीकांनी मोठी गर्दी केली. हा खून कोणी केला व का केला यासंदर्भात माहिती उपलब्ध झालेली नाही. खून झाल्याची माहिती…

Read More

मुंबईः प्रतिनिधी  सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा ओबीसी आरक्षणासंदर्भातील अहवाल फेटाळल्यानंतर आता ठाकरे सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायलयाचा निकाल येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ हे तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत आता ओबीसी आरक्षणाच्या नव्या रणनीतीवर चर्चा होईल. त्यानंतर दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकासआघाडी सरकार काही महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. तत्पूर्वी ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्याच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. भाजपच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम होते. परंतु, महाविकासआघाडी…

Read More

धानोरा ता.चोपडा ः वार्ताहर कुटूंबात किरकोळ वाद सुरुच असतात बऱ्याचदा वाद हे आर्थिक विवंचनेतून होतांना दिसतात, मात्र अशा प्रसंगी घाई घाईत घेतलेले निर्णय आयुष्यात निराशेशिवाय काहीच येत नाही. याचा प्रत्यय येथून जवळच असलेल्या बिडगाव गावात आला आहे. कौटुंबिक वादातून पतीने विषप्राशन केल्याचे समजताच. पत्नीने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे विनोद विक्रम बाविस्कर(कोळी, वय 40) हे आपल्या कुटूंबासह रहिवासास आहेत. ते आपल्या पत्नी वर्षा विनोद बाविस्कर(वय 35), मुलगी खुशी विनोद बाविस्कर, किर्ती विनोद बाविस्कर, मोनाली विनोद बाविस्कर…

Read More

नाशिक :प्रतिनिधी शहरातील मानवता कॅन्सर रुग्णालयाच्या लिफ्टच्या खड्ड्यात पाचव्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची खबर मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात (Hospital) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिकच्या मुंबई नाका येथील नामांकित मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ठेकेदारामार्फत दिलेल्या कामानुसार लिफ्टचे काम सुरु होते. लिफ्टच्या दारावर पोस्टर चिपकवतांना अश्फाक शब्बीर नगीनेवाले (वय 25) हा तरुण लिफ्टच्या खड्यात खाली पडला. त्याला जबर मार लागून या घटनेत सदर तरुणाचा दुर्देवी मुत्यु झाला आहे. मुंबई नाका पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुंबई नाका पोलिस अधिक तपास करत आहे. घटनेची माहिती मिळताच मयत…

Read More

पाचोरा प्रतिनिधी गणेश शिंदे  महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास यांच्या शासन निर्णया अनुषंगाने राज्याचे कृषीमंत्री यांनी मालेगावातील सर्व गावांचा समावेश पोखरा योजनेत केला. याचा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणुन त्यांचे अभिनंदन करतो.परंतु त्याच धर्तीवर पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करावा. अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना केली आहे. सदर निवेदनाची प्रत प्रांताधिकारी यांना देखील दिली आहे. यासाठी आ. किशोर पाटील यांनी देखील आज पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हि मागणी करावी, अशी मागणी देखील अमोल शिंदे यांनी अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना केली आहे.…

Read More

मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख राज्यपाल अभिभाषणात गोधळ केल्या नंतर अभिभाषण न करता किंबहुना राष्ट्रगीत न होऊ देता राज्यपालांनी सभागृहातून काढता पाय घेतला . आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली . सुरवात होण्या अगोदर राज्यपाल अभिभाषण करतात मात्र या अभिभाषणात राज्यपाल सभागृहात येताच सत्ता पक्षाच्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या जयघोष केल्याच्या घोषणा दिल्या . त्यातच विरोधी पक्षाने सरकार दाऊद चे दलाल च्या घोषणा दिल्या या गोधळात राज्यपालांनी अभिभाषणाची सुरवात केली आणि काही शब्द वाचून अभिभाषणाचा शेवट केला यात सर्व गोधळात राज्यपाल सभागृहातून निघून गेले त्यानंतर राष्ट्रगीत झाले . आरोप प्रत्यारोप अभिभाषण न करता निघून गेल्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांनी एक मेकांवर आरोप करण्यास…

Read More

मेष : आयुष्यातील त्रास दूर होईल आणि घराच्या देखभालीशी संबंधित कामाकडे लक्ष दिले जाईल. तुमच्या जवळच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या रागावर आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रलंबित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाच्या प्रचंड ताणामुळे थकवा जाणवेल. यासोबतच तुमच्या प्रमोशनची शक्यताही वाढेल. कुटुंबात प्रेम आणि आनंदी सुसंवाद राहील. वृषभ : आर्थिक बाबतीत योग्य बजेट असेल. तुम्ही केलेल्या कामाचे समाजात कौतुक होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याऐवजी, आपली उर्जा केवळ चालू उपक्रमांवर केंद्रित करा. घरातील वातावरण सुख-शांतीपूर्ण राहील. पती-पत्नीमध्येही योग्य समन्वय राहील. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या किरकोळ समस्या निर्माण होतील. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवल्यास तुम्ही…

Read More

बीड : प्रतिनिधी बाईक अपघातात तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बीडमध्ये घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकवरुन प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या तरुणाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिघेही जण बुलेटवरुन बीडच्या दिशेने येत असताना समोरुन येणाऱ्या बसने त्यांना उडवलं. ही धडक इतकी जबर होती, की दोघांचा जागीच अंत झाला, तर उपचार सुरु असताना तिसऱ्या मित्राने प्राण गमावले. तिघा जीवलग मित्रांचा बाईक अपघातात मृत्यू झाल्याची करुणाजनक घटना उघडकीस…

Read More