Author: Saimat

कजगाव : प्रतिनिधी कजगाव हे भडगाव तालुक्यातील बाजारपेठचे मोठे गाव आहे गावाला 35 ते 40 गावांचा रोजचा संपर्क आहे यामुळे परिसरातील गावातील ग्रामस्थांना दररोज काही ना काही कामासाठी कजगाव येथे यावे लागते. यामुळे परिसरातील नागरीकांच्या सेवेत लवकरच आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांना दळवलन साठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे अशात गावात ग्रामस्थांना नवीन आधार बनविण्यासाठी भडगाव येथे जावे लागते व्यापारी दृष्टीने बाजारपेठ असलेल्या गावांतून लोकांना आधार संबंधित कामे जसे की नवीन आधार कार्ड बनविणे दुरुस्ती करणे लहान मुलांचे आधार कार्ड बनविणे याकरिता भडगाव येथे जावे लागते संपूर्ण दिवस या कामासाठी खर्च करावा लागत असे कजगाव ग्रामस्थांची गैरसोय…

Read More

कजगाव ता.भडगावः प्रतिनिधी  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे बंद असलेल्या 12 वी च्या परिक्षेला 4 तारखेपासून सुरुवात झाली राज्य सरकारने शाळा तेथे केंद्र असा निर्णय घेतला त्या अनुषंगाने कजगाव येथील ब ज हिरण माध्यमिक शाळेत दि 4 पासून 12 वी च्या परीक्षेला सुरुवात झाली. प्रथमच शाळेत परीक्षा केंद्र सुरू झाल्याने प्रत्येकाला वेगळीच उत्सुकता लागून होती परीक्षा केंद्रा वर एकूण 46 विद्यार्थी पैकी 45 हजर होते गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा बंद असल्याने विद्यार्थी च्या मनात भीती पाहावयास मिळत होती दोन वर्षांपासून लिखाणाची सवय कमी झाल्याने पेपर लिहिण्यास वेळ पुरणार नसल्याने 30मिनिट वाढवुन देण्यात आले आहे परीक्षा केंद्रांवर कोरोनाचे नियम पाळण्यात आले…

Read More

मुंबई : प्रतिनिधी “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009” अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांना अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देम्यात आली आहे. सन 2022-23 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार मुलांचा प्रवेश घेण्‍यासाठी आता 10 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. परंतु, ही मुदत आता 10 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव 31 डिसेंबर करण्यात आला आहे.…

Read More

पुणे : प्रतिनिधी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याचा दौऱ्यामध्ये पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळा ही पडणारा आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका , मेट्रो स्थानक परिसरात . एसपीजी आणि पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा असणार महापालिकेत बंदोबस्त असणार आहे. या या कार्यक्रमासाठी पास असेल त्या व्यक्तीलाच महापालिकेत सोडलं जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत उद्या (6…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी असो किंवा कौटुंबिक आनंद, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. आज मूड चांगला असणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुमचे जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुम्ही संपूर्ण दिवस आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब किंवा मित्रासोबत प्रवास कराल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव वनपरिक्षेत्रातील मौजे जरंडी याठिकाणी आढळलेल्या वन्यप्राणी बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाने दिनांक 27/02/2022 रोजी अटक केलेल्या आरोपीस मा. न्यायालय सोयगाव याठिकाणी हजर करण्यात आले. सदर प्रकरणी मा. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला असून आरोपीची हर्सूल जेलला रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरण वनविभागाने युद्धपातळीवर घेतले असून लवकरच याचे सूत्रधार गजाआड होतील अशा तीव्र हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्याना चांगलीच चपराक बसली आहे. मादी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाने केली जिवतोड मेहनत दिनांक 24/02/2022 रोजी मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या बिबट्यास वनविभागाने तातडीने सोयगाव येथे हलवून तीन डॉक्टरांना पाचारण केले. औषधे, ऑक्सिजन सिलेंडर, तातडीने हलविण्यासाठी मोबाईल व्हॅन, आवश्यक संसाधने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आव्हाने गावाजळून गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरूवार ३ मार्च रोजी ट्रॅक्टर चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि , जळगाव तालुक्यातील आव्हाने गावाजवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार गुरूवार ३ मार्च रोजी तालुका पोलीस कर्मचारी यांनी दुपारी ४ वाजता गिरणानदी पात्राजवळील आव्हाणे गावाजवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतुकीचा परवाना विचारले असता ट्रॅक्टर चालक सुनील बाबुराव सोनवणे (वय-४२, रा. आसोदा रोड जळगाव) याने उडवाउडवीची…

Read More

जळगावः प्रतिनिधी  बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेस आज दि.4 मार्च पासुन सुरूवात झाली. पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला शहरातील परीक्षांकेंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळा झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. बारवीच्या परिक्षांना सुरूवात झाली असून आज पहिलाचा पेपर इंग्रजीचा होता. इंग्रजी हा विषय कठिण असल्याचा अनेकांचा समज असतो यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉप्या केल्या जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरातील अश्‍याचा काही केंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांनी तारेवरची कसरत करीत परिक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याचे दिसुन आले. मोठ्या प्रमाणावर भरारी पथके तैनात करण्यात आले असले तरी कॉपी पुरविणारे देखिल काही कमी नसल्याचे परीक्षा केंद्रांवर पहावयास मिळाले. अनेक परिक्षा केंद्राच्या बाहेर कॉप्यांचा खच आढळून आला.

Read More

जळगाव : प्रतिनीधी हॉटेल मालकाच्या परवानगीविना सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन हॉटेल मालकाला दमदाटी, शिवीगाळ तसेच त्याच्या नातेवाईकाच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेविकेचे पती धुडकू सपकाळे यांच्यासह त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जळगाव औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल काशिनाथ नजीक महेश विष्णू रडे यांचे प्रभात रेस्टॉरंट आणि भरीत सेंटर आहे. या हॉटेलचे कामकाज बघण्यासाठी महेश रडे यांना त्यांचे मेहुणे हेमंत पाटील हे मदत करत असतात. ३ मार्च रोजी हॉटेल मालक महेश रडे यांच्या गैरहजेरीत धुडकू सपकाळे व…

Read More