Author: Saimat

पेशावर, पाकिस्तान : पुन्हा एकदा दहशतवादानं पाकिस्तानला आपल्या निशाण्यावर घेतलंय. शुक्रवारी पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. शुक्रवारचा नमाज सुरू असतानाच मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास 36 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या (जुमा) नमाजाच्या वेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं गर्दीच्या मध्यभागी स्वत:ला स्फोटकांनी उडवून घेतलं. या स्फोटाच्या झळा अनेक कुटुंबांपर्यंत पोहचल्यात. या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानची सर्व मदत पथकं घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी यास्मीन शेख  वाढत्या लोकसंखेमुळे आता वाहनधारकांची देखिल संख्या अधिक झाली आहे यामुळे वाहतूक कोंडीत अनेक वाहनचालक जोरजोरात हॉर्न वाजवून वातावरण तापवतात तर काही मध्ये गर्दीत घुसून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. यामुळे वाहतूक मोकळी होण्याऐवजी गुंता आणखी वाढतो व सर्वांना मनस्ताप होतो, हा आपला सर्वांचा नेहमीच अनुभव. पण, आपल्याच देशात मिझोराम हे एक असे राज्य आहे की, जिथे नागिरक वाहतूक कोंडीतही, वाहतुकीची शिस्त मोडत नाहीत. महिंद्रा उद्योग समुहाचे आनंद महिंद्रा यांनी ‘अतिशय सुंदर फोटो..’ म्हणून अशा वाहतूक शिस्तीचा फोटो रिट्विट केला आहे. फोटोत वाहतूक कोंडीमुळे वाहनांची लांब रंग लागली आहे. पण, सर्व वाहनचालक शिस्तीत लाईन लावून उभे आहेत.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी युवासेना जळगाव महानगरतर्फे विधवा महिलांना शुक्रवारी इलेक्ट्रिक मोटर युक्त शिलाई मशीनचे वाटप नेहरू चौक येथील शिवसेना कार्यालयात करण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जयश्री नरेंद्र देशमुख, रुपाली अजय पाटील, ज्योती गणेश महाजन, सुशीला फकिरा नाईक, स्वाती गोविंदा देवरे या विधवा महिलांना शिलाई मशीन देण्यात आल्या. या व्ोळी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लद्धा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना प्रदेश सहसचिव विराज कावडीया, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेता अनंत जोशी, नगरसेवक गणेश सोनवणे, नितीन बर्डे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती…

Read More

मुंबई : प्रतिनीधी राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी – विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळत आहेत. अशातच आता भाजपा चे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने १० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला आ.महाजन यांनी आव्हान दिले होते. या दोन जनहित याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, विधिमंडळाच्या नियमदुरुस्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले जाऊ शकत नाही, असा या याचिकेवर राज्य सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे जनक व्यास आणि आ. गिरीश महाजन यांच्या जनहित याचिका सुनावणी योग्य नाहीत, असेही राज्य सरकारने स्पष्ट…

Read More

कजगाव प्रतीनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या सावदे गावचे सुपुत्र माननीय श्री मनोहर नामदेव देसले हे C R P F मध्ये हवलदार या पदावर गडचिरोली येथे लष्कर मध्ये 24 वर्ष भारत मातेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होऊन प्रथमच कजगाव येथे आल्याने शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन यांच्या वतीने व पाचपावली माता नगर कजगाव यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले , व त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कजगाव येथील शिवसेना कार्यालयात अनिल महाजन , राष्ट्रीय चर्मकार समाजाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष उत्तम मोरे , हर्षल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, खलील मन्यार, रमेश बैरागी, श्याम सोनार , अविनाश वाघ…

Read More

मुंबई प्रतिनिधी यास्मीन शेख  ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे मात्र अद्याप धान खरेदी झालेली नाही अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी आल्यास मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात येईल, असे अन्न, नागरी पुरवण व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात विधानसभा सदस्य कृष्णा गजबे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ३० सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयान्वये खरीप पणन हंगाम २०२१-२२ साठी दि. १ ऑक्टोबर २०२१ ते दि. ३१ जानेवारी २०२२ असा खरेदी कालावधी निश्चित करण्यात आला होता, मात्र मागील हंगामाच्या तुलनेत खरीप पणन हंगाम…

Read More

मुंबई : यास्मीन शेख   राज्यातील  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी हजारो कोटीची कामे केली जातात.सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण हे या खात्याचे  मंत्री असले तररी त्यांना या खात्यातील निधी नेमका कामांवर खर्च होतो की,प्रमुख   अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होतो याची कल्पना आहे की नाही,याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.विशेषतः मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता  रणजित हांडे यांचे नाव चर्चेत  आघाडीवर आहे.  सार्वजनिक बांधकाम  विभागाला जो काही  एकूण कोट्यवधीचा निधी दिला जातो,त्यातून 2 टक्के निधी आपल्याकडे जमा करण्याचे तोंडी आदेश त्यांनी राज्यातील  सर्व अधिक्षक अभियंत्यांना  दिले  असल्याची जोरदार चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात सुरु असल्याचे समजते. याबाबत संबंधित मंत्र्यांनी व मंत्रालयातील…

Read More

धानोरा ता चोपडा : प्रशांत चौधरी येथुन जवळच असलेला सातपुडा पर्वतावर वणवा लावण्याच्या घटनेत सध्या वाढ होत आहे.यामुळे येथिल वन्यजीव धोक्यात आहे. औषधी वनस्पती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असुन कंदमुळे ही नामशेष होत आहे.हा वणवा थांबला नाही तर वाळवंट होण्यास उशिर लागणार नाही.तर गेल्या बारा वर्षात वनवा लावण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे.तरी यावर कायमस्वरुपी कायदा करावा अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहे. साईमत ने गेल्या सात वर्षापासुन दरवर्षी वनवा बाबत बातम्या प्रकाशित केल्यात.तीन वर्षापूर्वी तत्कालीन उपवनसंरक्षक संजय दहीवले यांनी वन सचिवांपर्यंत वनवा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. महाराष्ट्र,मध्यप्रदेश या राज्यांना लागुन सातपुडा पर्वत आहे.गेल्या बारा वर्षांपूर्वी हा पर्वत सुजलाम्- सुफलाम् होता.परंतु काही…

Read More

मुंबई : प्रतिनिधी भाबडेपणात रमणारे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शुक्रवारी अचानक विरोधीपक्ष असलेल्या भाजपच्या प्रेमात पडले आणि नकळत त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सही केली. विरोधकांच्या स्वाक्षरी मोहिमेची त्यांना कल्पना नव्हती कल्पना नसलेल्या झिरवाळांनी विरोधक आमदारांचा गोतावळा बघत सही केली, आणि काही क्षणातच चूक कळताच कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. दरम्यान, त्याच वेळी त्या ठिकाणी हसन मुशरीफ आले , त्यांनी ही पेन हातात घेतला सही करणार, तोच त्यांनी प्र्श्न विचारला की सही कश्यासाठी त्यात कोणी तरी बोलले की, मलिक यांच्या राजीनाम्या साठी , आणि मग सही न करता हातात घेतलेला पेन घेऊन निघून गेले .…

Read More