औरंगाबाद : प्रतिनिधी पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला अनेक महिलांना बळी पडावं लागतं. घरगुती हिंसाचाराच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल आहेत, मात्र कित्येक तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्याही नसतील. या वास्तवाची दुसरी बाजू दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बायकांकडून होणाऱ्या नवरोबांच्या छळाची . पत्नी पतीचा छळ करत असल्याच्या तब्बल 285 तक्रारी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. हा आकडा फक्त गेल्या वर्षभरातील आहे. त्यामुळे बायको-सुनांवरील अत्याचाराच्या घटना उजेडात येत असताना नवऱ्यांवरही अन्याय-अत्याचार वाढत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नवरा-बायकोमध्ये तक्रारी आणि वादाचे प्रमाण वाढल्याचं बोललं जात आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे…
Author: Saimat
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बुधवारी सोयगावला पंचायत समितीच्या सभागृहात शेवटच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले परंतु या शेवटच्या बैठकीलाही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याचे बैठकीदरम्यान उघड झाले होते,त्यामुळे सदस्यांनी नाराजीचा सूर काढला असल्याने या गैरहजर यंत्रणांना कारणे दाखवा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. सोयगाव पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकासासाठी मार्च अखेरीस आणि कालावधी संपल्याने शेवटची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मार्च अखेरीस साठी अखर्चित ग्रामीण विकास निधी,घरकुल योजना यासह इतर यंत्रणांचा आढावा घेण्यात येणार होता परंतु यंत्रणाच्या खुद्द अधिकाऱ्यांनीच या बैठकीकडे पाठ फिरविल्याने बैठकीत काहीच निष्पन्न झाले नव्हते त्यामुळे विकासाचे केवळ कागदोपत्री…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी … सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे सकाळी आठ ते दहाच्या वेळात तीन पिसाळलेल्या कुत्र्यानी गावात व शेतीशिवारात धुमाकुळ घालीत सात जणांना कडकडुन चावा घेत जखमी केल्याची घटना घडली जखमीमधील दोन जणांना औरंगाबाद घाटीत तर एकास चाळीसगाव इतर बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सद्या कीन्ही गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. .सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत ह्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ चालुच होता गावात ही पिसाळलेली कुत्रे घुसताच गल्ली बोळात आरडाओरडा सुरु झाला तो पर्यत ह्या कुत्र्यानी कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला कडकडुन चावा घेत गंभीर जखमी केले जखमींमध्ये गंगाराम शेलार (वय…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या गोरगरीब महीला पुरूष व अपंग 30 तीस कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले, यावेळी पुणे येथील के एम हॉस्पिटल सामाजिक संस्थेच्या बिराजदार मॅडम , महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अलीबाबा तडवी, औरंगाबाद जिल्हा कार्यध्यक्ष करीम तडवी, ग्रामीण विकास सामाजिक संस्थेचे तालुका अधिकारी नागणे साहेब, तालुका कार्यध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य अनुप तडवी, सामाजिक कार्यकर्ते जुबेर तडवी, मा. ग्राम पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नजीर तडवी, मेहमूद तडवी, वजीर तडवी आदी उपस्थित होते
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सात नंबर पोलिस चौकीच्या मागील परीसरातत 38 वर्षीय विवाहितेची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात संशयीत संदीप रामकिसन कनोजिया (30) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 38 वर्षीय विवाहिता बाजारात जात असतांना मरीमाता मंदीराजवळ संशयीत संदीपने छेड काढली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात संशयीताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजीव सोनवणे करीत आहे.
मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. बच्चन कुटुंबाची सून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीसाठी मोठ्या पडद्यावर येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नमच्या पीएस-1 या सिनेमात दिसणार आहे. जी एक मायथोलॉजिकल जॉनर मुव्ही आहे. या सिनेमात ऐश्वर्या एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. बुधवारी सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. सोबत सिनेमातील स्टार कास्टचा फर्स्ट लूक देखील शेअर करण्यात आला. पीएस-1 हा सिनेमा 2 भागांमध्ये रिलीज होणार आहे. कल्किच्या क्लासिक नॉवल पोन्नियिन सेल्वनमधून सिनेमाची कथा घेण्यात आली आहे. ,लाइका प्रोडक्शन्स आणि मद्रास टॉकीजने सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पीएस-1 ची कथा…
मुबई : प्रतिनिधी देशासह राज्यात कोरोनाचा आलेख कमालीचा घसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लागू असलेले कोरोनासंदर्भात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून येत्या 4 मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल लागू होतील. कोरोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला असून अ श्रेणीत 14 जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं…
मुंबई : पेट्रोल आणि डिजेलच्या वाढत्या किंमती पाहाता सर्वच लोक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळले आहेत . इलेक्ट्रिक गाड्यांकडे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे बरेच लोक आता इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहे. परंतु होतं काय की, या गाड्या महाग असल्यामुळे लोक या गाड्यांना विकत घेताना 10 वेळे विचार करतायत. परंतु ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही स्कुटर नक्की घरी आणाल. भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कुटर्स पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्ही फक्त 10 हजार रुपये देऊन…
येत्या 4 मार्च रोजी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. तर ‘झुंड’च्या निमित्ताने ‘सैराट’ या चित्रपटाची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्यासोबतच ‘सैराट’चे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल हेसुद्धा ‘झुंड’साठी काम करत आहेत. ‘सैराट’मधल्या गाण्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात भुरळ घातली होती. आजही ही गाणी आवडीने ऐकली जातात. ‘झिंगाट’ हे गाणं आजही पार्ट्यांमध्ये वाजवलं जातं. त्यामुळे ‘झुंड’मधील गाणी अशाच पद्धतीने हिट होणार असल्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. अमिताभ बच्चन यांनी या गाण्याचा टीझर ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘तैयार हो जाओ एक…
मुंबई : प्रतिनिधी बदलती जीवनपध्दती, व्यायामाचा अभाव (Lack Of Exercise), चुकीचा आहार, फास्टफूडचा अतिरेक आदी विविध कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. वाढत्या वजनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार (Heart disease) आदी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रीत असणे आवश्यक असते. परंतु वजन नेमके कसे नियंत्रित करावे, यासाठी किती कालावधी द्यावा असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. जर तुम्हाला फक्त 30 दिवसात 10 किलो वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली (Lifestyle) बदलावी लागेल. कारण आहारात बदल केल्याशिवाय तुम्ही हे ध्येय पूर्ण करू शकत नाही. प्रत्येकाला वजन कमी करायचं असतं, असे बरेच लोक आहेत ज्यांना महिनाभरात…