मुंबई : प्रतिनिधी दुचाकी विक्रीला ग्रहण लागले आहे. दुचाकी व्यवसायात रिव्हर्स गिअर पडला आहे. देशातील पहिल्या पाच दुचाकी वाहनांची फेब्रुवारीत एकूण विक्री 10 लाख 74 हजार 303 वाहनांची झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या सहा महिन्यांचा डेटा गोळा केला तर देशात जवळपास 7 लाख कमी दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकी विक्रीत कमालीची घसरण वाहन उद्योगासाठी घातक ठरत आहे. कोरोनाकाळात कसेबसे तग धरणाऱ्या ऑटो सेक्टरला सेमीकंडक्टर आणि चिप तुटवड्याचा फटका सहन करावा लागला. आता विक्रीत घट झाल्याने वाहन उद्योगाचा ताप वाढला आहे. देशात बेरोजगारीचा दर 8.35% उच्चांकी पातळीवर आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत…
Author: Saimat
जळगाव – प्रतिनिधी साहित्यातून समाजमनाचे दर्शन घडत असते तर आजच्या बालकांमधून उद्याचा समाज घडत असतो. त्यामुळे बालमनावर संस्कार घडवता घडवता समाजाचे दर्शन घडविण्यासाठी आपल्या प्रतिभाशील लेखणीला सतत तेवत ठेवणार्या शिक्षक साहित्यिकांचे कार्य अभिमानास्पद आहे. अशा शिक्षक साहित्यिकांकडून सातत्याने संस्कारशील साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी व्यक्त केली. जळगाव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिनानिमित्त मराठी-विज्ञान सृजनोत्सव 2022 आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. गायकवाड बोलत होते. व्यासपीठावर डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, साहित्यिक अ. फ. भालेराव, मनोहर आंधळे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, विद्या…
नागपूर : प्रतिनिधी फक्त एक दिवस महिलांचा साजरा करून चालणार नाही. राज्यात वर्षभरात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना घडतात. कोविड सेंटरमध्येही महिलांवर बलात्कार झाले. गडचिरोलीत चित्रपटात काम देतो म्हणून अनेक मुलींना पळवून नेले. राज्यातील अनेक जिल्हयात महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांचा पाढा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वाचला. नागपुरात एमडी ड्रग्ज देत दोन दिवस मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एका महिलेला अत्याचाराचा गुन्हा दाखल प्रकरणात तीस लाखांची लाच मागितली. काही ठिकाणी पोलीस महिलांच्या जीवावर उठलेत, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला. राज्यात वसूल करणारे, बलात्कार करणारे, भूखंड हडप करणाऱ्यांना…
मुंबई: प्रतिनिधी युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं आहे. तसेच पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. आयकर विभागाने एकाच दिवशी दोन शिवसेना नेत्यांच्या घरांवर छापेमारी केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर, आयकर विभागाच्या धाडीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा,…
प्रतीनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता , भडगाव येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षाच्यावतीने आज भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.अविनाशराव आदिक साहेब,पक्ष निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव हे होते तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार दिलीप ओंकार वाघ होते. जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र भैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मा.वंदनाताई चौधरी,पाचोरा न.पा.गटनेते नानासो संजय वाघ,जिल्हा कार्याध्यक्ष मा.विलास पाटील,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र मानकरी मा.मनोराज पाटील, जिल्हा प्रवक्ते मा. योगेश देसले,मा.एजाज भाई मलिक, युवती जिल्हाध्यक्ष मा.कल्पिताताई पाटील,मा. दिव्या भोसले,मा.अरविंद चितोडिया,जिल्हा उपाध्यक्षा मा.योजनाताई पाटील, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक डॉ.संजीव पाटील,जिल्हा परिषद सदस्य मा.स्नेहा ताई…
यावल (सुरेश पाटील) दि. 7 मार्च 2022 रोजी रात्री पासून किरकोळ पाऊस सुरू झाला या पावसात यावल शहरातील तिरुपती नगर,फालकनगर, एस.टी.स्टँड परिसर व इतर काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर यावल चोपडा रोडवर वढोदे गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर साकळी जवळ आज दि.8 रोजी सकाळी नदीवरील पुलावर पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने वाहतूकदारांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.किरकोळ पावसामुळे वीजपुरवठा खंडित आणि पावसाचे पाणी पुलावर साचुन असल्यामुळे तसेच कामांमध्ये टक्केवारीचे प्रमाण वाढल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची निष्क्रियता उघड झाली आहे.अधिकारी कर्मचारी व ठेकेदार लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्यांचे नियत्रण राहिले नसल्याचा आरोप सुद्धा नागरिकामधून होत आहे.
मुंबई: प्रतिनिधी शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने…
जळगाव ; प्रतिनिधी खान्देशसह जळगाव जिल्ह्यात सोमवार रात्री ७ वाजेपासून विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला असून हा पाऊस तीन दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेत सापडला आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. भुसावळ शहरासह परिसरात रात्री ८.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. यासह बदलत्या वातावरणामुळे पुन्हा साथीचे आजार तोंड वढ काढण्याची शक्यता आहे
मुबई : प्रतिनिधी “सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यानं विजेचं कनेक्शन कापल्यानं फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडला. सरकारनं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापावी, अशी मागणी केली. हे सरकार कोडगं, असंवेदनशील आहे. हे सरकार बिल्डरांचं आहे, हे सरकार बेवड्यांकरता धोरण तयार करतं. शेतकऱ्यांना नापिकी आणि इतर कारणांनी वीज कनेक्शन कापू नका अशी विनंती केली होती. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन मे पर्यंत कापणार नाही, असं म्हटलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ऊर्जा मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापलं जातंय. काही शेतकऱ्यांनी वीज बील थकवलं तरी डीपी काढून नेलं जात आहे. रब्बीचा हंगाम खराब झाला आता…