Author: Saimat

मुंबई प्रतिनिधी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने पुन्हा दणका दिला आहे. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी महाजन व जनक व्यास यांच्या जनहित याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आल्या आहेत. इतकंच नाहीतर महाजन यांनी कोर्टात भरलेले दहा लाख रुपये आणि व्यास यांनी भरलेले दोन लाख रुपयेही हायकोर्टाने जप्त केले आहेत. खरंतर, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिकेवर आज कोर्टाकडून सुनावणी करण्यात आली आहे. याआधीही मुंबई हायकोर्टाने भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या हेतूवर शंका उपस्थित करतानाच, महाजन यांना सुनावणी हवी असल्यास आधी १० लाख रुपये जमा करण्याचे…

Read More

दिल्ली-   रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. युद्धामुळे वेगवेगळ्या देशातील अनेक नागरिक युक्रेनमध्ये फसले आहते. भारत सरकार ने आपल्या नागरिकांना आपल्या मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ राबवत आहे. ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थी तसेच नागरिकांना भारतात परत आणले आहे. भारताने फक्त भारतीय नागरिकांनाच युक्रेनबाहेर न काढता पाकिस्तान, नेपाळ या देशांतीलही नागरिकांची सुटका केली व नऊ बांगलादेशी नागरिकांना नुकतेच युक्रेनमधून बाहेर काढले आहे, या उत्कृष्ट कामगिरी बदल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या आधी ही भारताने नेपाळ,पाकिस्तान या देशातील नागरिकांना सहायता केली आहे. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये पाकिस्तानी विद्यार्थिनीनी संघर्षग्रस्त भागातून…

Read More

यावल (सुरेश पाटील) इयत्ता बारावी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असल्याने परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू आहे किंवा नाही याची चौकशी व पाहणी करण्याकामी यावल येथील बीआरसी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी “धनके” हा बेकायदा आणि बेकायदेशीरपणे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या शिक्षण संस्थेचे म्हणजे डिएन कॉलेज मध्ये गेल्याने याबाबत यावल पंचायत समिती सदस्यांच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांच्याकडून संतापजनक चर्चा करण्यात आली या धक्कादायक कृत्याला बीआरसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मीटिंगमध्ये दुजोरा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत काल दि.8 रोजी शिक्षण विस्तार अधिकारी “धनके” यांना कोणताही अधिकार नसताना परीक्षा केंद्रावर तसेच इतर कार्यालयीन कामकाज…

Read More

निंभोरा ; प्रतिनिधी रावेर तालुक्यातील निंभोरा येथे बस स्टँड एरिया ढाके वाड्यात शेजारील महिलांना आमंत्रित करून महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे यांनी आपल्या माते समवेत ज्येष्ठ महिला भगिनी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आपल्या मनोगतात त्यांनी महिलांचे अधिकार महत्व काय आहे हे पटवून सांगितले यावेळी ज्येष्ठ महिला शांताबाई पाटील उर्फ अक्का सुभद्रा कोंडे, सिंधुबाई शेलोडे, करुणा ढाके, इंदुबाई ढाके, वत्सलाबाई दोडके, कमल मनुचारी, सरला चौधरी, चारुलता नेहते, शारदा चौधरी, सविता पाटील, आरती आखरे, ममता भंगाळे, हर्षा कोळंबे यांनी उपस्थिती दिली कार्यक्रमाचे आभार चारुलता नेहते यांनी मानले.

Read More

अमरावती : वृत्तसंस्था एकाच विहरीत दोघा भावांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत मृतदेह सापडले होते. प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. दोघा भावांचा अपघात झाला, त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी पोलिसांचा तपास सुरु आहे. आत्महत्या, घातपात की अपघात? प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. मात्र दोघा भावांचा अपघात झाला, त्यांच्यासोबत घातपात झाला की त्यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील कुसुमताई फाऊंडेशन (निस्वार्थ अन्नसेवा) जळगाव शहरातील रस्त्यावरील निराधार आजी-आजोबा व गरीब गरजूंना रोज भुक क्षमविण्याचे काम 5 वर्षापासून सतत करत आहे. अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. याकामाची दखल घेवून रत्नागिरी येथील जय मल्हार सामाजिक चॅरिटी ट्रस्टच्यावतीने जागतिक महिलादिनी सुप्रसिध्द अभिनेत्री किशोरी अंबिके यांच्या हस्ते राज्यस्तरीय 2022 चा रत्नदुर्गकोकण रत्न पुरस्कार मॅडेल, ट्रॉफी, प्रशस्ती पत्रात मानाचा फेटा शाल देवून गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल कुसुमताई फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

पुणेः प्रतिनिधी पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे  स्वतः येथे उपस्थित राहत राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे राज ठाकरे कार्यकर्त्यांना आज काय संबोधून पुढील येणाऱ्या निवडणुकीची दिशा काय असणार आहे हे आज राज्यातील जनतेला पाहावयास मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मंगळवारपासून तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. ‘मनसे’च्या वर्धापनदिनाचा मेळावा यंदा पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. मंगळवारी सकाळी राज ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार…

Read More

मेष : आज केलेल्या प्रयत्नांतून चांगले फळ मिळेल तसेच आत्मविश्वास वाढीस लागेल. तुम्ही एखाद्या नवीन भागीदारीत व्यवसाय सुरु करू शकता. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि काही नवीन चांगल्या ओळखी होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. प्रवासाचा आनंदही घेऊ शकता. कामकाजात नफा होईल तसेच तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल. वृषभ : आज योजना प्रत्यक्ष कृतीत उतरतील व त्यातून लाभ देखील होईल. नोकरदार वर्गाचे काम तसेच कर्तव्यनिष्ठतेमुळे कौतूक होईल आणि सन्मान मिळेल. तुम्हाला मेहनतीने व सामंजस्याने आपले आयुष्य आनंदी बनवण्यात मदत होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक दृष्टीने हा एक शुभ दिवस आहे. मिथुन : आज लेखन, कला, साहित्य, संगीत, चित्रपट तसेच…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शेअर बाजाराच्या सलग चार दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. काल (सोमवार) शेअर्स बाजारात मोठी पडझड नोंदविली गेली होती. आज (मंगळवार) सकाळपासून बाजार बंद होईपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदीवर जोर राहिला. आज सेन्सेक्स 581 अंकांच्या तेजीसह 53424 टप्प्यावर आणि निफ्टी 150 अंकांच्या तेजीसह 16013 वर बंद झाला. बाजारच्या अखरेच्या तासात मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करण्यात आले. आज सेन्सेक्सवर टॉप-30 मधील 24 शेअर तेजीसह आणि सहा शेअर घसरणीसह बंद झाले. सनफार्मा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि NTPC शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. टाटा स्टील, पावरग्रिड आणि टायटन शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. शेअर बाजारातील तेजीमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला.…

Read More