Author: Saimat

जळगावः प्रतिनिधी  येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिरात तब्बल 150 विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मानवी साखळी बनवून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. निस्वार्थपणे चोवीस तास सेवा देणारी स्त्री गृहिणी तिचे एक ममतामई रूप म्हणजे आई प्रत्येकासाठी अतिशय जिव्हाळ्याचा शब्द आई.महिला दिनानिमित्त स्त्रीच्या कार्याला देण्यासाठी मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक शाळेत 150 विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात मानवी साखळी तयार करून आई हा शब्द साकारून सर्व महिलांना आगळ्या वेगळ्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या.

Read More

जळगाव : प्रतिनिधी भादली बुद्रूक येथील पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंदिराची दुरुस्ती करून जीर्णोद्धार केला जाणार आहे. पंचायत समितीच्या सेस फंडातून सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून, त्याचेही भूमिपूजन झाले. सरपंच मिलिंद चौधरी, पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी, उपसरपंच मीराबाई कोळी, गोपाळ ढाके, पोलिस पाटील ॲड. राधिका ढाके, मुरलीधर महाराज रडे, माजी सरपंच मनोहर महाजन, राजेंद्र चौधरी, उपसरपंच मीराबाई कोळी, पूजा नारखेडे, संदीप कोळी, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या 52 वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम केलेल्या अडकमोल परिवार यांचे सार्वजनिक,समाजिक काम पाहता त्यांना राजनंदिनी महिला संस्था जळगावकडून सन 21-22 साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांना समाजभुषण पुरस्कार महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ.मिलिंद बागूल, हैदर तडवी,ईश्वर मोरे,सौ.संदिपा वाघ,ज्ञानेश्वर वाघ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी अनिल अडकमोल यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्य देऊन सन्मान करण्यात आला.सत्काराला उत्तर देतांना अनिल अडकमोल यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षापासून अडकमोल परिवार हा सामाजिक,राजकीय जीवनात योग्यरित्या काम करीत आहे त्यात प्रमुख्याने शहरातील समतानगर ही वस्ती वसवून याठिकाणी…

Read More

पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील परधाडे येथे अनोखा वािवाहसोहळा पाहायला मिळाला. या विवाहसोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे, यामधील विक्रम व राजश्री हे दोघं वधू-वर हे दृष्टीहिन आणि दिव्यांग होते. यामुळेच हा विवाहसोहळा या भागातील सर्वांसाठी विशेष ठरला. या लग्न सोहळ्यावेळी अनेक लोकांनी हजेरी लावली होती. आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवीत अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी वधू-वरांचे दृष्टीहिन आणि दिव्यांग बांधवांनीही यावेळी उपस्थिती लावली होती. नशिबाने आयुष्यात अंध:कार भरला असला तरी जिद्दीने आयुष्यात ते यशस्वी झाले. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. पुणे येथील विक्रम या दृष्टीहिन तरुणाचा विवाह परधाडे येथील राजश्री या दृष्टीहिन तरुणीशी झाला. विक्रम हा एम.ए. झाला असून युनियन बँकेत…

Read More

चोपडा : संदीप ओली  चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश असलेल्या यावल तालुक्यातील मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा नाशिक विभागांतर्गत राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत (सन 2021-22) पर्यटन विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव र. ज. कदम यांनी दिलेला आदेश जळगाव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांना नुकताच (11 फेब्रुवारी 2022) प्राप्त झाला. त्यामुळे मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा पर्यटनस्थळ विकास होण्याचा मार्ग सुकर बनला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाठविलेला प्रस्ताव व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यासभेत पुढील पाच वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी राजेश गोविंद जाधव, उपाध्यक्ष म्हणून प्रा.आशिषकुमार प्रभाकर चौधरी व जयंत श्रीकृष्ण जोशी (वरणगाव), कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद रामदास चौधरी, सचिव किशोर माधवराव पाटील, सहसचिव नरेंद्र विश्वनाथ भोई (वरणगाव), खजिनदार सचिन लोटन सुर्यवंशी (धरणगाव), सल्लागार प्रा.संजय भिकाजी पवार (पारोळा), प्रवीण वसंतराव पाटील, सदस्य योगेश शशिकांत सोनवणे व सचिन सोपान चौधरी यांचा समावेश आहे. यांप्रसंगी शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत व विविध गटात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यात मल्लखांब खेळाचा प्रचार व प्रसार करून…

Read More

मुबई : प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी आहे. विधानसभेत ओबीसी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हे विधेयक मांडण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचे काही अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत. प्रभागरचन, आरक्षण ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ आता निवडणुका घेण्याचे अधिकार असतील. आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाही. निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारनं त्यांच्याकडे घेतले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्या एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाकडे आता फक्त निवडणूक घेण्याचे अधिकार ठेवण्यात आले आहेत. प्रभाग रचना करणं,…

Read More

एसपी विराधात सर्व पक्षाचे आमदार एकवटले विधान सभेत बीड पोलीस अधीक्षकांना  निलंबित करण्याची मागणी. मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख बीड मधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून बीड जिल्याचा बिहार होत असल्याचे मत विधानसभेत आमदारांनी मांडले बिदड जिल्यातील वाढते अवैध धंदे आणि पोलीस अधीक्षकांना कडून त्याला मिळणारे पाठबळ यावर सर्व पक्षीय आमदारणानी बीड जिल्याचे एसपी यांच्या विरोधात आपले . आरोपांची उजळणी लक्षवेधी च्या माध्यमातून केली या वेळी विरोधकांनी संबंधित अधिऱ्याला निलंबित करण्याची मागनी केली . यावेळी संबंधित विषयावर उत्तर देत असताना गृह मंत्री यांनी  बीड मध्ये गोळीबार घटनेत दोन्ही पक्षकारांना वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र घटना आणि करवाहीची अहवाल।घेऊन…

Read More

मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख  अमरावती शहरात शिवजयंती च्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतल्यावरून  झालेल्या प्रकारचा मुद्दा आज अमरावतीचे आमदार नवनीत राणा यांनी विधानसभेत उपस्थित केला . यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल।केली आहेत त्यांच्यावर वचक राहिला नाही तर पोलीस बेछूट होतील त्यामुळे त्यांना बोलू द्या रावीरणा याना बोलू द्या .त्यानंतर रवी राणा यांनी  सदनात भावना व्यक्त करत असताना  अमरावती महानगर पालिकेच्या मनपा आयुक्त , अमरावती पोलीस अधीक्षक , आणि मुख्यमंत्री , गृहमंत्री यांच्या वर आरोप केले .यावेळी त्यांनी सभागृहाला सांगितले की 307 व 353 सारखे खोटे गुन्हे हे राजकीय फोन आल्याने  दाखल केले असल्याचे रती…

Read More