बुलडाणा : प्रतिनिधी खामगाव शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आठ महिन्याचे बाळ जागीच ठार झाले तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे दुचाकीस्वार आंनद चांडक यांना धक्का बसला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खणदावी येथील आंनद चांडक हे आपली पत्नी दुर्गा आणि आठ वर्षीय हंस यांच्या सोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी ते घरी परतात असताना शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ त्यांचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनूसार चांडक यांनी घटनास्थळावरील असलेल्या स्पीड ब्रेकर इथं वाहनाचा वेग केला तेव्हा पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात…
Author: Saimat
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आता राज्यातील आघाडी सरकार मध्यप्रदेश पॅटर्न लागू करणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच या संदर्भात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वच राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आणि देशपातळीवर निर्णय घेतला तर सर्वच राज्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.…
मेष मेष राशीचे लोक स्वतःच्या प्रतिभेने नशीब उजळवतील आणि तुम्हाला सर्व कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नती किंवा संबंधित बोलणी आज होऊ शकतात. आज मुलगा-मुलगी काही प्रशंसनीय काम करतील. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. तुमच्याकडे नवीन गोष्टी असू शकतात ज्यामुळे तुमची जीवनशैली सुधारेल. आज ७५% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. मिथुन विद्यार्थी आज अभ्यासात चांगले काम करतील. कोणालाही कर्ज…
श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या खोर्यात अलिकडच्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांना टार्गेट करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच रविवारी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. हरि सिंह हायस्ट्रीटच्या मार्केटमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दला च्या तुकडीला दहशतवाद्यांनी टार्गेट केला. या सुरक्षा दलाच्या तुकडीच्या दिशेने दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता. मात्र निशाणा चुकल्यामुळे त्या ग्रेनेडचा दुसर्या जागी जाऊन स्फोट झाला. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर पोलिस कर्मचार्यासह 20 हून अधिक नागरिक जखमी झाले. श्रीनगरमध्ये प्रसिद्ध आणि वर्दळीचा मानला जाणार्या अमीरा कदल बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे या बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या ग्रेनेडच्या…
भुसावळ : प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे यंदाही नुपूर महोत्सवाचे आयोजन महाशमहाशिवरात्री मंगळवार दि .१ मार्च रोजी बि. व्ही. खाचणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन बाजारपेठ पोलिस स्टेशनचे राहुल गायकवाड, झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आरुण पाटील, संस्कृत शिक्षक ब्रजेश पंडीत, तसेच पाहुणे कलाकारांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराज पुजन करुन झाले. प्रास्ताविक नुपूर चे संचालक रमाकांत भालेराव यांनी केले त्यात आता पर्यंतच्या प्रवासावर उजेड टाकतांना नुपूर च्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी नृत्यशिक्षीका चारु भालेराव मंचावर उपस्थित होत्या.या वर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने गेल्या कालावधीत ज्यांनी मदत करणार्यांचा व सहभागी कलावंतांचा स्मृतिचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे भरतनाट्यम…
जळगाव: प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांसाठी टू व्हीलर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन कृष्णा महिला बचत गट व रिद्धी जानवी फाउंडेशन यांचा सौजन्याने करण्यात आले आहें. शिबीरा चे आयोजन दिं 6 मार्च ते 10 पर्यंत दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत जी. एस. ग्राउंड येथे करण्यात आले आहे तरी सर्व महिलांनी या निःशुल्क शिबीरा चा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी रिद्धि जानवी फाउंडेशनच्या चित्रलेखा मालपाणी, 7798310002,रंजना शर्मा, 9284070596 यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे.
मुंबई : प्रतिनिधी महापालिकेचं युद्ध जिंकण का महत्वाचं आहे. हे संम्मेलन तळागळातील सहकारी ज्यांच्यामुळे आम्ही पोहचतो शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचणे महत्वाचं आहे. पंतप्रधानाचे विचार फडणवीसांचे विचार पोहचवणे गरजेच आहे. मुंबईत चांगल जीवन जगायचं असेल, तर निवडणुका लागणार आहेत. आचार संहिता लागणार आहे. जनतेला समजावावं लागेल की भाजपाचा झेंडा मुंबईकरांच्या अस्मितेचा आहे. असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. ते आज आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये वॉर्डमध्ये वॉर्ड कार्यकर्ता संम्मेलन आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, १९९२-९३ ला हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हातभार लावला तसंच १९९३ मध्ये लोकांची घर उध्वस्त केली यासाठी आम्ही…
उस्मानाबाद : प्रतिनिधी तालुक्यातील आकुबाई पाडूळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या जिल्हा परिषद गटातील विवीध विकासकामांचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी यावेळी ईडीच्या कारवायांवरून देखील टोला लगावला. “ईडी पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे.”, असं त्यांनी बोलून दाखवलं. धनंजय मुंडे भाषणात म्हणाले, “आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. भाजपाचा आणखीही अंगातला माज गेलेला नाही. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं केलं तरी. भल्या भल्याच्या मागे इनकम टॅक्स काय, सीबीआय काय… ईडी…
यावल(सुरेश पाटील) आज दि.5 रोजी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धां घेण्यात आल्या. कार्यक्रमात यावल पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले सर,भुसावळ येथील नाहाटा कॉलेजच्या प्राध्यापिका सौ.भारती सोनवणे मॅडम व सौ.दिपाली महाजन मॅडम,तसेच साखर कारखाना संचालक मिलिंद नेहते,अनिल महाजन,अतूल उल्हास चौधरी तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन तसेच शशिकांत फेगडे इत्यादि मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शुभारंभ सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर इयत्त्ता नववीच्या कु.फाल्गुनी विनोद चौधरी व कु.दिक्षा दिनेश महाजन या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून प्रमुख अतिथींचे स्वागत केले. स्वागतगीतानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे यांच्या…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दुध सेवन करत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात ग्रामीण भागात पसरताच अचानक सायंकाळी ग्रामीण भागातील महादेवाच्या मंदिरावर महिलांची मोठी गर्दी उसळली या घटनेच्या गर्दीमुळे उसळलेली गर्दीला आवर घालण्यासाठी अखेरीस सोयगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले .मात्र अख्रेर हि अफवा असल्याचे समोर आले आहे परंतु प्रत्यक्षदर्शी काही महिलांशी वार्तालाप केला असता अफवा पसरण्याच्या आधी दहा मिनिटे आधीच काही महिलांकडून नंदीने दुध वर्ज केल्याचे महिलांनी सांगितले व या सुखद घटनेचा महिलांना मोठा आनंद द्विगुणीत झाल्याचे काही महिलांच्या तोंडातून ऐकावयास मिळाले परंतु शेवटपर्यंत हिं अफवाच असल्याचे बोलले जात आहे. सोयगाव तालुक्यात महादेवाच्या मंदिरावर नंदी दुधाचे आणि…