Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त निशुल्क स्त्री रोग निदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुमन लोढा यांच्या हस्ते संपन्न झाला.प्रास्तविक अध्यक्ष राजकुमारी बाल्दी , कोषाध्यक्ष मिनाक्षी वाणी ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. हे शिबीर ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे. प्रकल्प प्रमुख उपाध्यक्ष मंगला नगरकर यांनी शिबिरांची संपूर्ण माहिती दिली. हेमा रोकडे यांनी आभार मानले. प्रचार प्रमुख वैशाली पाटील, अ.भ.मारवाड़ी म.स.च्या महा प्र.उपाध्यक्ष आशाजी पगारिया, अ.भ.मा.म.स. जिल्हा सचिव ललिता श्रीश्रीमाळ , ,छाया गडे, राजकमल पाटील वंदना वानखेडे,डॉ. शेख इम्रान यांचे सहकार्य लाभले हे शिबिर पुर्णवर्ष गर्जून सांठी दर बुधवारी लोढा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त सरदार वल्लभाई पटेल हॉल येथे विविध क्षेत्रात जसे वैद्यकीय, शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, विधी व सेवा, पोलीस दल, होमगार्ड, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवळपास 55 रणरागिणींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान सोहळा शिववंदन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री श्री गुलाबरावजी देवकर, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, शिवसेनेच्या सरीताताई माळी-कोल्हे, इमरान मुलतानी युवा जिल्हाध्यक्ष एम आय एम, योगराज सपकाळे ,समाजसेविका रुबिना पटेल, विजयाताई इंगळे,, रूपालीताई वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिववंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय राठोड,…

Read More

मुंबई :- अभिनेत्री आलीय भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सगळे रेकॉर्ड मोडत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये शामील होत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारपर्यंत ७.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आतापर्यंत ७८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशामध्ये बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार १० व्या दिवशी म्हणजेच रविवारीदेखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात आलियाने केलेल्या अभिनयाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत असून तिचा बॉयफ्रेंड रणबीरलाही तिचा हेवा वाटत आहे. दहाव्या दिवशी ८ ते ९ कोटींचा व्यवसाय केल्यानंतर हा चित्रपट लवकरच १००…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगांव नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वछता व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४३ महिलांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोयगांव शहरात सफाई कामगार म्हणून कार्य करणाऱ्या १६ महिला,१० अंगणवाडी सेविका,१० मदतनीस ६ आशा स्वयंसेविका व एक आरोग्य सेविका अशा ४३ महिलांना कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम राजू दुतोंडे, उपसभापती शाहिस्ताबी रऊफ शेख,सदस्य किशोर संध्या मापारी, ममता विष्णू इंगळे, आशियांना कदीर शहा…

Read More

 मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख  विकसनशील महाराष्ट्रात आज ही मोठ्या प्रमाणात बाल विवाह होत असून मराठवाड्यात याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची ग्वाही आज महिला आयोगाने दिली आहे . त्या विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी त्यांनी पत्रकांबरोबर सोबत अनौपचारिक गप्पा मारल्या त्यावेळी महिला आणि राज्यातील महिला आयोगाचे कार्य यावर बोलत असताना त्यांनी पदभार घेतल्या पासून महिला आयोगाने केलेले कार्य आणि त्यात त्यांना अधिक चैलेंजिंग वाटलेले विषय काय विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की  , आज ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाल विवाह होत आहेत ही  शोकांतिकाच म्हणावी लागेल . 2007 मध्ये आपल्याकडे बालविवाह प्रतिबंधीतकायदा आमलात आला आहे…

Read More

मुक्ताईनगर :प्रतिनिधी   तालुक्यातील मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीच्या दप्तरी हेराफेरी करून व खोटे दस्त तयार करून तक्रारदाराची व शासनाची  फसवणूक केली, म्हणून मुक्ताईनगर पंचायत समिती चे विद्यमान  गट विकास अधिकारी संतोष रघुनाथ नागतीलक आणि अन्य सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे  न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर पंचायत समितीचे कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्या  दुर्गा धनराज कांडेलकर या गैरहजर असतानासुद्धा त्यांचे नावे ग्रामपंचायतीत खोटा ठराव घेऊन बनावट माहिती ठरावात लिहिण्यासाठी सदर ठरावा पासून दस्तुरखुद्द सूचकासह अन्य ग्रामपंचायत सदस्यही पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समजते, सदर ठरावाच्या अनुषंगाने व दप्तरी दाखवलेल्या खर्चानुसार 1)टीसीएल पावडर खरेदी,2)क्लोरीन…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी मुराद पटेल युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये भडकलेल्या युध्दाच्या झळा जगातील अनेक लोकांना बसत असतानाच याच युक्रेनमध्ये चाळीसगावचा एमबीबीएस चा विद्यार्थी यश राजेंद्र परदेशी हा युद्ध जन्य परिस्थिती उद्भवल्याने अडकला आणि प्रत्येक मुलाच्या आई वडील भाऊ भहीणी आणि नातलगांना जशी काळजी आपल्या मुलाची वाटते तशीच काळजी चाळीसगावातील राजेंद्र परदेशी आणि आर्किटेक आकाश परदेशी व त्यांच्या सर्व परिवाराला लागली आपला मुलगा भाऊ मायदेशी परत येत नाही तोपर्यंत हा सर्व परिवार चिंताक्रांत होता युक्रेनमधील खार्किव राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापिठात यश परदेशी एम. बी. बी. एस. च्या शिक्षणासाठी नुकताच ७ फेब्रुवारी रोजी भारतातून गेला होता तेथे पंधरा दिवस खार्किव येथे मुक्काम केल्यानंतर त्यांचे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते संजय राऊतांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू असताना राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलीय. यात संजय राऊतांनी अनेकांची नावं घेतली आहे. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना यात जितेंद्र नवलाणी हे नाव सर्वात महत्वाचे आहे, असा उल्लेख केला आहे. जितेंद्र चंद्रलाल नवलाणी असे या व्यक्तीचे संपूर्ण नाव राऊतांनी सांगितलं आहे. यात 60 कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसुल केलेत. या कॅश आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्याची ईडीनं चौकशी केली. त्या कंपन्यांनी ईडीचा पैसा ट्रान्सफर केला. हा नवलाणी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्याप्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हाशाखे तर्फे निषेध करत राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणा  देण्यात आल्या. भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा  व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्यांचा वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखे तर्फे उप जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देऊन ना. रावसाहेब दानवे यांचा राजीनामा किंवा माफीनामा घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे , महिला…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी कै.बाबुरावजी काळे स्कूल, सोयगांव येथे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या पातळीवर शालेय विद्यार्थिंनींनी कार्यक्रम आयोजित केला यामध्ये विद्यार्थीनींनी शिक्षेकेचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली. त्याच प्रमाणे ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव सर व प्राध्यापक डॉ. डि.आर.पवार सर यांनी महिलांच्या कर्तुत्वावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर एलीस, शितल काटोले, मनिषा पाटील, अंजली कथलकर, शितल पवार, विद्या पाटील, आशा पंडित, पुजा सोनुने, पुजा इंगळे, मुश्ताक शहा, संजय डापके, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पाटील यांनी केले तर आभार…

Read More