काकर समाजाचे कार्य कौतुकास्पद : डॉ. निलेश चांडक

0
14

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवाह सोहळ्याचा खर्च सामान्य कुटुंबाला आज परवडणारा नाही. समाजातील गरजूंची मदत व्हावी या उदात्त उद्देशाने मुस्लीम काकर समाजाने सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे . काकर समाजाचे कार्य समाज हितकारी आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी केले. ते ते येथील काकर समाजातर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्या प्रसंगी बोलत होते. या विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाले.

यावेळी व्यासपीठावर नगरसेवक गणेश सोनवणे, अशोक लाडवंजारी, विक्की बजाज, वरिष्ट पत्रकार वाहिद काकर, राजु बर्तन वाला उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष रियाज काकर यांनी सांगितले की, आजचा हा पाचवा सामुहिक विवाह सोहळा आहे. समाज संघटनेतर्फे समाजातील गरजू व्यक्तींना नेहमीच मदतीचा हात देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे एखाद्या गरजू व्यक्तीला जोखमीच्या आजाराच्या वेळी त्याला सरकारी योजनेसह शक्य ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासह गरजू व्यक्तींना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करणे, रेशन कार्ड बनवणे, गरजूंसाठी मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात येते.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन फारुख अमीर काकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कौसर काकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काकर समाजाचे पंच मोहसीन युसुफ काकर, कौसर काकर, हुस्नोद्दीन काकर, मुश्ताक गुलाब काकर, विक्की अख्तर काकर, रफीक चांद, वसीम सट्टा, बबलू यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.यावेळी सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here