मुंबई : प्रतिनिधी मुंबई पोलिसाच्या अंमली पदार्थ विभाग घाटकोपर युनिटने ३८ किलोचा गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. घाटकोपरच्या वैतागवाडी येथील पीडब्ल्यूडी सिमेंट गोडाऊन येथून हे दोन्ही आरोपी गांजाच्या गोणी घेऊन जात होते. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना अडवले चौकशी केली आणि अंग झडतीत त्याच्याजवळ हे अंमली पदार्थ आढळून आले. तर दुसरीकडे अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान युनिटने ५ लाख ७० हजाराचे एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आयुब खान असे या आरोपीचे नाव असून तो…
Author: Saimat
????????मानवी जीवनावर प्रभाव असलेल्या ज्या ऊर्जा आहेत, त्यातील काही महत्वाच्या ऊर्जा पुढील प्रमाणे 1) सूर्या ची ऊर्जा 2) वास्तु पुरूष 3) पृथ्वी चे चुम्बकीय तत्व 4) नैसर्गिक दिशा 5) पंचमहाभूते ????वास्तु शास्त्र याचा संबंध अष्ट दिशाशी आहे… या अष्टदिशां चे नाते पंचमहाभुताशी आणि नवग्रहाशी सुद्धा. आपले शरीर हे सुद्धा पंचमहाभुतानी बनलेले आहे… साहजिकच या शरीराचा अष्ट दिशा शी अन्योन्न संबंध आहे ????देवांचा वास्तु शास्त्र -इंजीनियर विश्वकर्मा होय… महाभारत कालीन मय दानव हा वास्तु शास्रात पारंगत होता, ????सूर्य सिद्धांत नुसार त्याने अनेक वास्तु बांधलीली आहेत… त्याचे वंशजही आज वास्तुशिल्पी म्हणून प्रसिद्ध आहेत ????वास्तु पुरूष मंडलातिल 45 पैकी काहीच देवता अधिक प्रभावशाली…
चोपडाःप्रतिनिधी ग्राहकांनी काळजीपुर्वक आणि सजग राहून खरेदी केली पाहीजे. सध्या लोकांकडे पैसा आहे पण वेळ कमी यामुळे धावपळीच्या जगात सर्व ग्राहकांनी वस्तू आणि सेवा खरेदी करतांना सजग बनून आपला हक्क तसेच केंद्र शासनाकडून ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यामुळे ऑनलाईन खरेदी व भ्रामक जाहिरातींव्दारे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीस आळा बसणार आहे. या नवीन कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अनिल गावित यांनी जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमांत केले. ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत असतात या सर्वांसाठी 15…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव : तालुक्यातील किन्ही गावातील पंचायत समिती मार्फत जाहीर झालेल्या नुकत्याच घरकुल यादीत वंचित गरजू ग्रामस्थांचे नावे वगळले असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे, गावतील घरकुल साठी पाञ ठरलेले काही लाभार्थी धनदांडगे असुन त्यांचे पक्केघर तसेच बागायती जमीन असल्याचे निदर्शनास आले, माञ अपाञ ठरविण्यात आलेले वंचित गरजू गरीब यांच्या वर अन्याय होऊ नये यासाठी स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांनी थेट औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय गाठत चौकशी करण्यात यावी ही मागणी केली आहे. तसेच यात संबंधित कर्मचारी वर कारवाई करण्यात यावी असे देखील अर्ज देण्यात आला, सदरील पाञ अपाञ यादीची चौकशी जलद गतीने व्हावी अशी…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी बहुजन समाज पार्टी संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त सोयगाव येथील बहुजन समाज पार्टी कार्यालयासमोर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बसपा सिल्लोड -सोयगाव विधानसभा अध्यक्ष संघपाल सोनवणे,सिल्लोड सोयगाव विभाग भारतीय बौद्ध महासभा (रा. अध्यक्ष मा. राजरत्न साहेब) संघटक जेष्ठ कार्यकर्ता भारत पगारे, मुखेड सरपंच रवींद्र सोनवणे, सागर खरे,ओमप्रकाश जैस्वाल, महेंद्र पाटील, अनिल वाघ, अशोक साबळे, पंजाब बोरसे आदी बसपा कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोयगाव : प्रतिनिधी अतिवृष्टीच्या २५% यातून राहिलेल्या नुकसानीच्या पोटी सोयगाव तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या ६ कोटी ५१ लक्ष ३५ हजार ४१३ निधी सोमवारी २३ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याची माहिती रमेश जसवंत यांनी दिली आहे त्यामुळे ऐन टंचाईग्रस्त स्थितीत सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाअसून होळीच्या सणात मदत मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे सोयगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्याच्या क्षेत्राला मोठा फटका बसला होता त्यातच अवकाळी च्या नुकसानीचा पंचनामे होणार नसल्याचे संकेत मिळाले असताना आधीच संकटाच्या खाईत असलेल्या शेतकर्यांना पुन्हा नुकसानीचा पेच पडला आहे विहिरींनी तळ गाठल्याने आणि वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने फळबागा संकटात सापडल्या होत्या अशा स्थितीत…
चंदीगड: वृत्तसंस्था पंजाबमधील सत्ता जाताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानुसार सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. हायकमांडच्या इच्छेनुसारच राजीनामा देत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. प्रदेश कमिट्यांचे पुनर्गठन करण्यासाठी हे राजीनामा मागण्यात आल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचेही राजीनामे एक दोन दिवसात येण्याची शक्यता वर्तवली…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे बंद असलेली अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेले येथील खंडोबा देवस्थानची यात्रा कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून उद्यापासून सुरू होत आहे. दिनांक १७ मार्च ते २४ मार्च दरम्यान ही यात्रा भरणार असून यात्रा विश्वासाठी पोलीस प्रशासन, नगरपालिका, वीज वितरण कंपनी, मंदिर देवस्थान व अन्य घटक सज्ज असल्याचे देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या यात्रोत्सवात भाविकांनी खंडोबा देवाला मानलेला मान, कर्ण छेदणाचे कार्यक्रम शहरात मोठ्या प्रमाणात होणार आहे. यासह वेगवेगळी खेळणी, आकाश पाळणे, ब्रेक डान्स, मौत का कुवा, भांड्याची दुकाने, हॉटेल आधी दुकाने थाटण्यात आलेली आहे. यात्रा…
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृद्धपकाळाने आज पहाटे निधन झाले. ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या माजी आ.स्नेहलता बिपीन कोल्हे यांचे ते सासरे होते. त्यांच्या कार्यकाळात सहकारमंत्री , कृषी मंत्री , परिवहन मंत्री, महसूलमंत्री असे मंत्री पद त्यांनी भूषवले आहे. कोपरगाव तालुक्यातुन सलग ३५ वर्ष महाराष्ट्र विधिमंडळावर आमदार म्हणून निवडून आले आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी सरपंच पदापासून राजकारणाची सुरुवात केली होती . त्यांनी पाठ पाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा अंत्यविधी 4.30 वाजता कोपरगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे.