जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य गेट समोर २ जणांवर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये तरूणावर कोयत्याने वार करन तो गंभीर जखमी झाला आहे तर दुस-या तरुणाने जीव मुठीत धरून रुग्णालयात पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. सुरेश विजय ओतारी (वय २८) आणि अरुण भीमराव गोसावी (वय ४७) दोन्ही रा. तुकाराम वाडी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचाराकामी आले होते. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर गेल्यावर गेटच्या समोरच त्यांच्यावर भूषण माळी व अन्य पाच ते सहा जणांनी धारदार कोयता, लाकडी बल्ल्या व अन्य धारदार शस्त्राने वार करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत असे की, सुरेश ओतारी व अरुण गोसावी…
Author: Saimat
अमृतसर : वृत्तसंस्था ‘आम आदमी पार्टी’कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर झाली आहे. हरभजनला राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पंजाबमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेवर आले आहे. हरभजन सिंगकडे क्रीडा विश्वविद्यालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधरमध्ये क्रीडा विश्वविद्यालय बनवण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीत आपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. विधानसभेच्या 117 पैकी 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. हरभजन सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने आम आदमी पार्टी आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
पुणे : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात काश्मीर फाईल चित्रपट गाजू लागलाय. त्यावर दोन्ही बाजुने चर्चा आणि वाद सुरू झालेत. काहींचं म्हणणं आहे की या चित्रपटात अर्धवट इतिहास दाखवलाय. फक्त एक बाजू मांडली आहे तर काही म्हणतात हा वाद मुद्दाम वाढवला जातोय. यावर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. इथले हिंदू आणि मुस्लिम हे इथलेच आहेत, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच रहावं, द कश्मीर फाईल्स चित्रपटामुळं जे गट पडलेत ते चुकीचे आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याने अधिकचं बोलणं उचित ठरणार नाही. एखाद्या चित्रपटावरून वाद होणं योग्य नाही. असेही…
जगात कोरोना प्रभाव कमी होत आहे, सर्व काही सुरळीत होत असतानाच आता काहीशी चिंता वाढविणारी बातमी येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या डेल्टाक्रॉनमुळे अनेक शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. हा नवा व्हायरस डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटपासून बनलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने अहवाल दिला आहे, की या नवीन डेल्टाक्रॉन प्रकाराची काही प्रकरणे काही युरोपियन देशांमध्ये, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेली आहेत. या प्रकाराची फारच कमी प्रकरणे आतापर्यंत पाहिली गेली आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञांना या नवीन प्रकाराबद्दल पुरेशी माहिती नाही. जागतिक…
भुसावळ : प्रतिनिधी येथील भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडीच्या शहराध्यक्षपदी शहरातील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले लव वामन झाडगे यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक नुकतीच भाजपाचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, भाजपा ओबीसी सेलचे अजय भोळे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, सतिष सपकाळे, रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत शहरातील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले लव वामन झाडगे यांच्या कार्याची दखल घेत सहकार क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीच्या…
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीबाबत मंत्रालयात भरविण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. या माध्यमातून सरकारच्या कामांचे अतिशय उत्तम प्रकारे मांडणी करण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मंत्रालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामांना अतिशय परिणामकारक अशा फलकांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे. आज ना. गुलाबराव पाटील यांनी या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन याबाबतची विस्तृत माहिती जाणून घेतली. सरकारच्या कामाला डीजीआयपीआरतर्फे चांगल्या प्रकारात प्रसिध्दी दिली जात असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना गुरुवार 17 मार्चपासून कोर्बेव्हॅक्स लस दिली जाणार आहे. आज सकाळी शहरातील शाहू महाराज रुग्णालयात पहिली लस देऊन प्रारंभ करण्यात आला. बुधवारी राज्य शासनाकडून कोर्बेव्हॅक्स लस मनपाला प्राप्त झाली. 1 जानेवारी 2008 ते 17 मार्च 2010 दरम्यान जन्मलेल्या मुले/मुलींना ही लस देण्यात येईल. यासाठी त्यांना आपले आधार कार्ड किंवा जन्मतारीख नोंद असलेले शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करून किंवा ऑन स्पॉट नोंदणी करण्याची मुभा राहील. लस घेण्यासाठी मुलांचे 12 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून मान्यताप्राप्त कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जातील. पहिला डोस घेतल्यानंतर…
पुणे : वृत्तसंस्था सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजस मोरेविरोधात शिवाजीनगर पोलिसांत ही तक्रार देण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेन ड्राइव्ह हा तेजस मोरे यानेच पुरवला, असा आरोप चव्हाणांनी केला आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर तेजस मोरेचा शोध पोलीस घेतात का, हे पाहावे लागेल. जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप नुकताच केला होता. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावे पुढे येणार आहेत. ‘व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता’ व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता, असा आरोप…
मेष : आज मेष राशीच्या लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे सरकारकडून लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य सर्वोच्च शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही अंगावर येऊ शकते. आज तुम्हाला कठीण समस्यांचे समाधान मिळेल. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. कर्क : आज कर्क राशीच्या लोकांना संमिश्र…