Author: Saimat

मेष : आजच्या दिवशी मेष राशीचे लोक आपल्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात पुढे असतील. आज तुमच्या प्रतिभेने नशीब उजळेल आणि तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोलावे. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या दृष्टीने चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज ८५% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्या. मिथुन : आजच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चांगले राहील. तुम्ही तुमच्या मित्र आणि ओळखीच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रार्दूभावाने गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नसल्याने जिल्ह्यातील विकासकामे थोडी मंदावली होती, मात्र 2020 मध्ये मक्तेदारांनी विकासकामांना जोमाने सुरुवात केली. मात्र या विभागात दोन वर्षांची कामांपोटी मक्तेदारांचे 250 कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहे तर राज्यशासनाचे पथदर्शी योजना असलेल्या ग्रामविकास मंत्रालयाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांपोटी मक्तेदारांचे सुमारे 100 कोटी रुपयांचे देयके प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील मक्तेदार हवालदिल झाले असून जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना खोडा बसतो की काय? असा सवाल उभा राहिला आहे. दरम्यान, प्रलंबित निधीच्या देयकांसाठी नागपूर विभागातील मक्तेदारांनी शासनाला कामबंद करण्याचा इशाराही दिला आहे. असाच इशारा आपल्या जिल्ह्यातूनही दिल्या जाण्याची खात्रीलायक वृत्त आहे. जिल्ह्यात यंदाच्या अर्थसंकल्पात…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी चुकीच्या धोरणांमुळे नळगंगा नदीला गटार गंगेचं स्वरूप प्राप्त झाले. दुष्काळी परिस्थितीत खोलीकरण करण्यात आल्याने जलस्त्रोतात वाढ झाल्याची शेखीही मिरवण्यात आली. दरम्यान जलस्त्रोतांच्या भविष्यातील भवितव्याबाबतचा दूरदृष्टीकोन मात्र बाळगण्यात आला नाही. त्यामुळे गावगाड्यातील सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी मरणासन्न अवस्थेत असून शेवटच्या घटका मोजू लागली आहे. तरीही नगर पालिकेने सांडपाण्यावर उपाय योजना करण्याऐवजी जलपर्णी काढण्याच्या कामावर लाखो रुपये खर्च करून केवळ ठेकेदारांना पोसण्यातच धन्यता मानली. या घोडचुकीमुळेच आज मितीस नळगंगा नदी पात्राची दुरावस्था झालेली दिसत आहे. कधीकाळी स्वच्छ व नितळ पाण्याने बारामाही खळखळून वाहणारे नदी पात्र नळगंगा धरणाच्या निर्मितीमुळे कालांतराने ओस पडत गेले. केवळ पावसाळ्यातच नदीला पाणी वाहते राहीले. धरणातील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील लाइफ इज ब्युटिफुल फाउंडेशन आयोजित मल्हार हेल्प फेअर-4 प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी जळगावकरांनी प्रचंड उत्साहाने आपला सहभाग नोंदवत सेवाकार्याच्या कुंभमेळ्याला निरोप दिला. या माध्यमातून सेवा आणि सदाचाराचा एक सोहळाच जणू जळगावकरांनी अनुभवला. समारोप कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा संस्था व स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. फेअरमध्ये यंदा एकूण 60 समाजसेवी संस्था व 26 सेवा महर्षी फेअरमध्ये सहभागी झालेत. सोमवारी समारोप कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ॲड. ललिता पाटील, डॉ. केतकी पाटील, मिस मल्टिनॅशनल तन्वी मल्हारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव हे होते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सध्या मराठी शाळांसमोर इंग्रजी माध्यमाचे मोठा आव्हान उभे ठाकले आहे. यातच जिल्हा परिषद शाळांना नव्या युगाच्या आव्हानाशी जुळवून घेतांना अडचणी येत आहेत. यामुळे शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून याला तोंड देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन नवीन खोल्यांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. दरम्यान, जिल्ह्यात यंदा तब्बल 108 नवीन शाळा खोल्या उभारण्यात आल्या असून यापुढे देखील याच गतीने कामे होतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या चिंचोली येथील शाळा खोल्यांचे लोकार्पण आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ना.…

Read More

मुंबई   यास्मिन शेख  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री  नवाब मलिक यांनी इडी च्या कारवाही विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत न्यालायने मलिक यांना चपराक दिली असून मलिक यांच्या अडचणी वाढत असल्याचे  अंदाज लावला जात आहे . नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली ती अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे. नवाब मलिकांच्या या याचिकेवर ईडीच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आणि पीएमएलएचा कायदा लागू होतो असं ईडीने म्हटलं. त्यानंतर उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळून लावला. तसेच नवाब मलिकांना…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता थेट पक्ष नेतृत्वालाच सवाल करण्यास सुरुवात केली आहे. स्वत: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर सवाल केले आहेत. गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचं नेतृत्वं सोडावं आणि इतरांना संधी द्यावी. काँग्रेस सर्वांचीच व्हायला हवी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पाच राज्यातील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याआधीच कपिल सिब्बल यांनी हा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे या बैठकीतही सिब्बल यांच्या…

Read More

मेष : गणेशजी मेष राशीच्या लोकांना सांगत आहेत की आज घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. जोखीम आणि तारणाची कामे टाळा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. तुम्हाला अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना स्वतःसाठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी…

Read More

मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख  राज्यातील सरकार हे दाऊदला वाहिलेले सरकार आहे वक्फ बोर्डात आपण दाऊद ची मांस नियुक्त केले आहेत का? असें म्हणत सर्वांना आजून एक जोरका झाटका दिला . त्याच बरोबर त्यांनी   वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. लांबे यांच्या वर आरोप केले किंबहुना त्यांनी डॉ . लांबे यांचे मोबाईल वरील अर्शद नावाच्या व्यक्ती बरोबर झालेले  संभाषण सभागृह समोर वाचून दाखवले यामुळे सत्ता पक्षाचे आमदार एकदमच चमकले कारण फडणवीस असा काही आरोप करतील या बाबत कल्पना नसावी ….. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर बोलत असतांना वक्फ बोर्डाचे सदस्य यांच्या वर केलेय आरोपांची हवा वक्फबोर्ड अध्यक्ष डॉ. वाजहत मिर्झा यांनी काढली…

Read More