वास्तु शास्त्र में सभी दिशाओं के लिए वहां विद्यमान उर्जाओं के अनुरूप उचित और लाभदायक गतिविधियां बताई गई हैं। चार प्रमुख दिशाओं की जानकारी हम सभी को हैं। लेकिन वास्तु में एक शुभ भवन के निर्माण के लिए चार प्रमुख दिशाओं के अलावा चार अन्य दिशाओं में की जाने वाली गतिविधियाँ भी निर्धारित की गई है। इन सभी दिशाओं के अलग-अलग प्रभाव होते हैं इन प्रभावों को ध्यान में रखते हुए विभिन्न कमरों के निर्माण से लेकर वस्तुओं को रखने की जगह के सम्बन्ध में वास्तु में कई नियम बनाये गए है। इन नियमों के अनुरूप बना घर व्यक्ति को…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी राज्याच्या ‘कृषी धोरण 2020’ अंतर्गत जिल्ह्यातील पहिले वीज उपकेंद्र चिंचोली येथे उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रामुळे शेतकरी आणि उद्योजकांना ऊर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चिंचोली येथील 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून उर्जामंत्री नितीन राऊन यांनीही सहभाग घेतला. वीज उपकेंद्र भूमिपूजन कार्यक्रमाला परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधिक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जनार्दन पाटील,…
मुंबई : प्रतिनिधी ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा बॉक्सऑफिससोबतच राजकीय वर्तुळातही गाजतोय. सध्या विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनादरम्यान भाजप आमदार प्रवीण दटके यांनी ही मागणी केली. “द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे.परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणिवपूर्वक आवाज बंद करणे,प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा”, असं प्रवीण दटके म्हणाले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा…
भुसावळ : प्रतिनिधी येथील श्री रिद्म मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट ,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर , ब्राम्हण संघा जवळ भुसावळ तर्फे भुसावळ विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, यावल, सावदा व फैजपूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी भगवान श्री धनवंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात येउन शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पो.नि. राहुल गायकवाड, सपोनि भोये, सपोनि संदिप दुंडगहु, शहर वाहतूक पोलिस शाखेचे सपोनि नाईक, शहर व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, रुग्णालयाचे डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला,…
जळगाव : प्रतिनिधी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी अजितदादा नांदेडकर यांची सर्वानुमते निवड झाली. रविवारी सत्यवल्लभ कार्यालयात बहुभाषिक ब्राह्मण संघाची वार्षिक सभा झाली. माजी अध्यक्ष अशोक वाघ यांनी सूत्रे नवीन अध्यक्षाकंडे दिली. यावेळी श्रीकांत खटोड यांनी आगामी परशुराम जयंती उत्सव भव्य साजरा करण्याविषयी माहिती दिली.दाधीच समाजाने महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारली. संघाचे संस्थापक लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, महिला संघ अध्यक्षा कमल पाठक, संजय कुलकर्णी, सुरेश जोशी, सूरज दायमा, सतीश दायमा, ऋषिकेश शर्मा आदी उपस्थित होते.
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील कोरपावली येथे दलित वस्ती साठी सार्वजनिक महिलांचे शौचालय मंजुर झालेली रक्कम सहा लाख रुपये मंजुर झालेले असून सदरचे बांधकाम हे दलीत वस्तीत न करता दहिगाव रस्त्यावर असलेल्या वाहत्या नाल्यामध्ये सदरचे अनधिकृत बांधकाम फक्त आणि फक्त सरकारी निधि लाटण्यासाठी ईस्टीमेट प्रमाणे बांधकाम न करता निकृष्ट दर्जाचे काम कलेले दिसून येत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे अशा प्रकारे संबंधीत पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम शाखा अभियंता,गट विकास अधिकारी अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाची चौकशी करावी अशी दलित बांधव व गावकऱ्यांनी केली आहे.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. कापड व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजीपणा करू नका. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना या दिवशी शुभ माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी चांगली राहील. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. तुमच्या मनात काही…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेले गवळीवाडा व काट्या फैल या भागात दोन गटांमध्ये रविवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास दगडफेक झाल्याचे समजतात शनिपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दाखल होताच. पुढील अनर्थ टळला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिपेठ पोलिस स्थानक हद्दीत असलेला गवळीवाडा व काट्या फैल या परिसरात रात्री नऊ वाजेनंतर काही तरुणांमध्ये वाद झाल्याने दोन गटात दगडफेक झाली. या घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या दगडफेकीत चार चाकी गाडीचे नुकसान झाल्याचे समजते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने तत्काळ, अप्पर अधीक्षक चंद्रकांत…
मुंबई प्रतीनिधी राज्यभरात एकाच दिवशी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 17 लाख 51 हजार 211 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून वाहतूक विभागाला 69 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती/ उपसमित्या आणि ३०९ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १ हजार ४८७ पॅनल ठेवण्यात आलेली होती. या पॅनलसमोर ६५ लाखांपेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे आणि ४ लाख प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ६९ लाख प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ लाख ६८…