साईमत जळगाव प्रतिनिधी माती, पाणी, इतिहास आणी छत्रपती शिवाजी महाराज हा सर्वोत्तम संस्कार आहे. अशा स्पर्धा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये मदत करतात असे प्रतिपादन माजी महापौर अश्विन सोनवणे यांनी केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भाऊंच्या उद्यानासमोरील परिसरात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २१ शाळांचे ४२ संघ व २३७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत मुलींची लक्षणीय उपस्थिती होती. या स्पर्धेला शाळा व मुलांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे भाऊंच्या उद्यानासमोरील परिसर गजबजलेला होता. दरम्यान, माजी महापौर अश्विन सोनवणे…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “ईगलबाइट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड” या आयटी कंपनीमार्फत जावा डेव्हलपर, सिस्टम इंजिनिअर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, एचआर एक्झिक्युटिव्ह, पीएचपी डेव्हलपर इत्यादी पदांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून “ईगलबाइट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीचे संचालक ओम काठे, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. यावेळी १३२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर ९० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, ट्रेनिंग अॅण्ड…
साईमत जळगाव प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान नागपूर विद्यापीठाच्या ११ व्या पदवीप्रदान समारंभात जळगाव येथील डॉ. मानसी योगेश चौधरी हिला कनुभाई पशुवैद्यकिय सावडीया सूवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. सुवर्ण पदक वेटरनरी पब्लिक हेल्थ (VPH) या विषयात मिळवल्याचे मानसीने वार्तालाप कार्यक्रमात सांगितले. व्हेटरनरी क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुलींना खूप उत्तम संधी असल्याचेही तिने अभिमानाने सांगितले. ११ व्या पदवीदान समारंभात २०२१-२४ या शैक्षणिक वर्षात व्हेटरनरीचे १३४४० पदवीधर, १९९ पदव्युत्तर 30 डॉक्टरेट, एकूण १७६९ जणांना पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभातील उत्कृष्ट, शैक्षणिक कामगिरीबद्दल ७२ सुवर्णपदके, २३ रोज पदके आणि तीने २५ हजार रुपयांचे तीन रोख पारितोषिक देण्यात आली. व…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल मध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. हर्षवर्धन जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्य दिपक भावसार यांनी केले. याप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा विविध अंगांचा उलगडा करत भुषण पाटील, किर्ती वाघ या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत भाषणे सादर केली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ‘अफजलखानाचा वध’ या प्रसंगावर आधारित पोवाडा सादर केला.…
साईमत जळगाव प्रतिनिधी उंडाळ (कराड) येथील स्व. दादा उंडाळकर ५० व्या सुवर्ण महोत्सवी स्मृती दिनानिमित्त आयोजित ४१ वे स्वातंत्र्य संग्राम व माजी सैनिक अधिवेशनात जैन इरिगेशन सिस्टीम ली चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना स्व. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री व भारत सरकारचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख विश्वस्त उदयसिंह उंडाळकर, ट्रस्टचे विश्वस्त विजयसिंह पाटील, आमदार महेश शिंदे, प्रा. गणपतराव कणसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उदयसिंह पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा सुयोग्य वापर कसा…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेला रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी उत्साहात प्रारंभ झाला. रविवारी चार मैदानांवर झालेल्या सकाळच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, भारती विद्यापीठ, पुणे, नवरचना विद्यापीठ, गुजराथ आणि चारोतर विद्यापीठ गुजराथ हे चार संघ बाद पध्दतीतील पहिल्या फेरीत विजयी झाले. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या वतीने या स्पर्धा होत असून महाराष्ट्र, गुजराथ व गोवा या तीन राज्यातील ६१ विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २६ फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजता या स्पर्धांना प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या मैदानावर सकाळच्या सत्रात सावित्रीबाई फुले…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड मध्ये दिनांक १७ रोजी महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील , डॉ.हर्षल कुलकर्णी शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेच्या समन्वयिका स्वाती अहिरराव, अनघा सागडे, संगीता तळेले यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर ईश्वरी भावसार, यश महाजन, लावण्या चौधरी या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीची माहिती सांगितली. ऋषिकेश पाटील व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला व इयत्ता चौथी,सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी राजं आलं राजं आलं आणि युगत मांडली या गाण्यावर नृत्य सादर केले.…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय ज्ञानपरंपरा फार मोठी असून आपल्या पूर्वजांचे ज्ञान सध्याच्या काळात, सध्याचे संदर्भ घेऊन कसे वापरता येतील याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग प्रयत्नशील असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे ही परंपरा समृद्ध होईल असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ.मनीष जोशी यांनी व्यक्त केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी नीतीवरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ.जगदीश पाटील, कला व मानव्य प्रशाळेचे प्रभारी संचालक…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. जळगाव जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार, सरकारी डॉक्टर्स यांना गुंडांकडून धमक्या येणे, मारहाण होणे या घटना वाढत आहेत. या गुंडांमध्ये एवढी हिम्मत आली कुठून ? असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांचे गुंडांना अभय असल्याचा आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे. अधिकाऱ्यांवरील मारहाणीचा व धमक्यांचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. जिल्ह्यात तिन्ही मंत्री निष्क्रिय असून सत्ताधाऱ्यांमुळेच गुन्हेगार मुजोर होत असल्याचेहि प्रदीप पवार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जळगाव तहसीलदार शीतल राजपूत यांच्या वाहनाचाही काही दुचाकीस्वार…
साईमत जळगाव प्रतिनिधी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च २०२४ ही परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मूळजी जेठा महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विवेकानंद भवन (केंद्र क्र.७००) मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची बैठक व्यवस्था केली आहे. कला शाखा – बैठक क्रमांक – एस १२८५६२ ते एस १२८६८२ आहे. विज्ञान शाखा – एस ०६४४५७ ते एस ०६५२७३ आहे. वाणिज्य शाखा एस १५९१६९ ते एस १५९७५० आहे. तर एम.सी. व्ही.सी.शाखा – एस १६६७६१ ते एस १६६७७८ आहे, असे केंद्र संचालक प्राचार्य एस.एन. भारंबे यांनी कळवले आहे.