गेल्या तीस वर्षापुर्वी जळगाव हे राज्यातील एक विकसनशील शहर म्हणून ओळखले जात असे,त्याचे श्रेय कोणीही सुरेशदादा जैन यांना दिल्याशिवाय राहणार नही मात्र गेल्या सात-आठ वर्षापासून या शहराला कोणाची नजर लागली की, जळगावचं पार वाटोळं झाल्याची तीव्र प्रतिक्रिया अनेक जळगावकरांनी व्यक्त केल्यास नवल वाटू नये.शहरात फिरतांना त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.शहरातील विस्तारीत भागातील रस्त्यांची तर पार दुरवस्था झाली असून त्याकडे मनापाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास किंवा अधिकाऱ्यास बघायला वेळ आहे कुठे… अहो,हे तर सोडा परंतु शहरातील एक-दोन रस्ते सोडले तर सर्व प्रमुख रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली आहे की,रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे समजायला मार्ग नाही. जळगावची जनता किती सहनशील आहे हे…
Author: Saimat
नवी दिल्ली :वृत्तसंस्था नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाल्यानंतर यात भाजपने मोठी भरारी घेतल्याचे दिसून आले. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यात महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल भविष्यवाणी केली आहे. गिरी यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार राष्ट्रवादाच्या नावावर मोदी स्वत: पंतप्रधानपद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असे सूचक वक्तव्य महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केले आहे. महोबामध्ये स्वजन शिष्य संम्मेलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वर स्वामी यतींद्र…
उन्हाळा आला की सर्वांनाच चविष्ट आंबे खाण्याचे वेध लागतात. पण आंबे असो वा कैरी आपण दोन्ही फळे चवीने खातो. ही फळे आपल्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहेत. करीपासून आपण अनेक चटण्या, लोणची आणि पन्ह बनवू शकतो. उन्हाळ्यात उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी कैरी पन्ह हे सर्वोत्तम पेय आहे. कैरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, फायबर इत्यादी घटक असतात. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात कैरी पन्ह प्यायल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. उष्माघातापासून बचाव : कैरीचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे कैरीचे पन्ह बनवून प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात लोकांना उष्माघाताचा सर्वाधिक त्रास होतो, अशा परिस्थितीत जर तुम्ही अर्धा कप कैरीचे पन्ह…
मुंबई : प्रतिनिधी मुंबई पोलिसाच्या अंमली पदार्थ विभाग घाटकोपर युनिटने ३८ किलोचा गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. घाटकोपरच्या वैतागवाडी येथील पीडब्ल्यूडी सिमेंट गोडाऊन येथून हे दोन्ही आरोपी गांजाच्या गोणी घेऊन जात होते. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना अडवले चौकशी केली आणि अंग झडतीत त्याच्याजवळ हे अंमली पदार्थ आढळून आले. तर दुसरीकडे अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान युनिटने ५ लाख ७० हजाराचे एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आयुब खान असे या आरोपीचे नाव असून तो…
????????मानवी जीवनावर प्रभाव असलेल्या ज्या ऊर्जा आहेत, त्यातील काही महत्वाच्या ऊर्जा पुढील प्रमाणे 1) सूर्या ची ऊर्जा 2) वास्तु पुरूष 3) पृथ्वी चे चुम्बकीय तत्व 4) नैसर्गिक दिशा 5) पंचमहाभूते ????वास्तु शास्त्र याचा संबंध अष्ट दिशाशी आहे… या अष्टदिशां चे नाते पंचमहाभुताशी आणि नवग्रहाशी सुद्धा. आपले शरीर हे सुद्धा पंचमहाभुतानी बनलेले आहे… साहजिकच या शरीराचा अष्ट दिशा शी अन्योन्न संबंध आहे ????देवांचा वास्तु शास्त्र -इंजीनियर विश्वकर्मा होय… महाभारत कालीन मय दानव हा वास्तु शास्रात पारंगत होता, ????सूर्य सिद्धांत नुसार त्याने अनेक वास्तु बांधलीली आहेत… त्याचे वंशजही आज वास्तुशिल्पी म्हणून प्रसिद्ध आहेत ????वास्तु पुरूष मंडलातिल 45 पैकी काहीच देवता अधिक प्रभावशाली…
चोपडाःप्रतिनिधी ग्राहकांनी काळजीपुर्वक आणि सजग राहून खरेदी केली पाहीजे. सध्या लोकांकडे पैसा आहे पण वेळ कमी यामुळे धावपळीच्या जगात सर्व ग्राहकांनी वस्तू आणि सेवा खरेदी करतांना सजग बनून आपला हक्क तसेच केंद्र शासनाकडून ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यामुळे ऑनलाईन खरेदी व भ्रामक जाहिरातींव्दारे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीस आळा बसणार आहे. या नवीन कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अनिल गावित यांनी जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमांत केले. ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत असतात या सर्वांसाठी 15…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव : तालुक्यातील किन्ही गावातील पंचायत समिती मार्फत जाहीर झालेल्या नुकत्याच घरकुल यादीत वंचित गरजू ग्रामस्थांचे नावे वगळले असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे, गावतील घरकुल साठी पाञ ठरलेले काही लाभार्थी धनदांडगे असुन त्यांचे पक्केघर तसेच बागायती जमीन असल्याचे निदर्शनास आले, माञ अपाञ ठरविण्यात आलेले वंचित गरजू गरीब यांच्या वर अन्याय होऊ नये यासाठी स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांनी थेट औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय गाठत चौकशी करण्यात यावी ही मागणी केली आहे. तसेच यात संबंधित कर्मचारी वर कारवाई करण्यात यावी असे देखील अर्ज देण्यात आला, सदरील पाञ अपाञ यादीची चौकशी जलद गतीने व्हावी अशी…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी बहुजन समाज पार्टी संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त सोयगाव येथील बहुजन समाज पार्टी कार्यालयासमोर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बसपा सिल्लोड -सोयगाव विधानसभा अध्यक्ष संघपाल सोनवणे,सिल्लोड सोयगाव विभाग भारतीय बौद्ध महासभा (रा. अध्यक्ष मा. राजरत्न साहेब) संघटक जेष्ठ कार्यकर्ता भारत पगारे, मुखेड सरपंच रवींद्र सोनवणे, सागर खरे,ओमप्रकाश जैस्वाल, महेंद्र पाटील, अनिल वाघ, अशोक साबळे, पंजाब बोरसे आदी बसपा कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोयगाव : प्रतिनिधी अतिवृष्टीच्या २५% यातून राहिलेल्या नुकसानीच्या पोटी सोयगाव तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या ६ कोटी ५१ लक्ष ३५ हजार ४१३ निधी सोमवारी २३ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याची माहिती रमेश जसवंत यांनी दिली आहे त्यामुळे ऐन टंचाईग्रस्त स्थितीत सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाअसून होळीच्या सणात मदत मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे सोयगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्याच्या क्षेत्राला मोठा फटका बसला होता त्यातच अवकाळी च्या नुकसानीचा पंचनामे होणार नसल्याचे संकेत मिळाले असताना आधीच संकटाच्या खाईत असलेल्या शेतकर्यांना पुन्हा नुकसानीचा पेच पडला आहे विहिरींनी तळ गाठल्याने आणि वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने फळबागा संकटात सापडल्या होत्या अशा स्थितीत…