मेष : मेष राशीची लोक आज उत्साहात दिसून येतील आणि नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रगतीसाठी अथक मेहनत कराल. संपूर्ण दिवस आनंदात जाईल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. शैक्षणिक आघाडीवर सततच्या प्रयत्नांमुळे काही खास व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा चांगला जाणार नाही.…
Author: Saimat
जळगांव :प्रतिनिधी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनची राष्ट्रीय खेळाडू व कोच कु. प्रियंका ओमप्रकाश पटाईत हिने स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे झालेल्या प्रशिक्षक (कोच) प्रमाणपत्र प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे पूर्ण करून एस. ए. आय., एन.एस., एन. आय. एस. चे शुटींग या खेळाचे कोच प्रमाणपत्र पटकाविल्याबद्दल जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनतर्फे क्रीडा प्रेमी हरिष मिलवाणी यांच्या हस्ते कु. प्रियंका पटाईत यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी काशी मिलवाणी व असो.चे अध्यक्ष बिशनजी मिलवाणी, सचिव व मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, प्रा.विनोद कोचुरे व सुनिल पालवे हे उपस्थित होते.
जळगाव : प्रतिनिधी स्पर्धेचे प्रथम वर्ष – एप्रिल,मे या महिन्यात झाडावरून बिया किंवा शेंग गळून पडत असतात व त्या वाया जातात. तसेच आपण फळ खाल्ल्यानंतर त्यामधील बिया फेकून देतो. या बिया संकलित केल्या व त्यांचे व्यवस्थित जतन केले तर या बियांपासून चांगल्या पद्धतीचे रोप निर्मिती करता येऊ शकते.एका बिजा मधून मोठे वृक्ष जन्माला येऊ शकते त्या वृक्षापासून सजीवसृष्टीला होणारा फायदा तर असंख्य आहेच. एका बिजा मध्ये जंगल निर्मितीची सुद्धा ताकद आहे. त्यामुळे या बिया वाया जाऊ न देता त्यांचे जतन करणे व त्यापासून रोप निर्मिती करणे किंवा या बिया जमिनीमध्ये व्यवस्थितपणे रुजविणे आवश्यक आहे. हा विचार मराठी प्रतिष्ठान तर्फे या…
भुसावळ : प्रतिनिधी समाजात समरसता तयार करून सकारात्मक समाजनिर्मिती करण्याचे काम संतांचे वाङ्मय करत असते. संत एकनाथांनी परिणामकारक औषधी अत्यंत सोप्या पद्धतीने आईस्वरूप बनून बालरूपी समाजाला दिली. हेच ज्ञान अजून सोपे करून डॉ. जगदीश पाटील यांनी भक्ती ग्रंथाची निर्मिती केली. त्यामुळे आध्यात्मिक पाया मजबुतीसाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण योगदान देऊन लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. डॉ. जगदीश पाटील लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती या ग्रंथाचे प्रकाशन नाथषष्ठीच्या मुहूर्तावर फैजपूर येथील सतपंथ मंदिरात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. आशालता अशोक महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज महाराज गोसावी पैठणकर, प्रा.डॉ. पृथ्वीराज…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या कितीक वर्षांपासून पोलीस विभाग व बॅंकाकडून वेळोवेळी कुणालाही ओटीपी न देण्याचे आवाहन करत असते परंतु काही लोक यामध्ये अडकताच त्याच प्रकार जळगावत हि एक उच्च शिक्षित इंजिनिअर तरुणीला लाखो रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही शेअर करु नका असे बॅंकाकडून वेळोवेळी आवाहन केले जात असते. भोळेभाबडे लोक या आवाहनाकडे दुर्लक्ष करत फसतात. मात्र अनेक सुशिक्षीत देखील ओटीपी शेअर करुन आपली फसवणूक करण्याची दुस-याला संधी देत असतात. जळगाव शहरातील सॉफ्टवेअर इंजीनिअर तरुणीने देखील पलीकडून मंजुळ आवाजात बोलणा-या मोबाईल धारक तरुणीस ओटीपी सांगून आपली लाखो रुपयात फसवणूक करुन घेतल्याचे उघड झाले आहे.…
मुंबई : प्रतिनिधी तीन मद्यधुंद तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होतोय. याधील एक तरुणी रस्त्यावर थेट पोलिसाची गच्ची पकडून गैरवर्तन करताना दिसत आहे. नशेमध्ये बेधुंद असलेली ही तरुणी पोलिसासोबत उद्धटपणा आणि गैरवर्तन करत आहे. मात्र, दुसरीकडे आपलं कर्तव्य बजावणारा पोलीस या मद्यधुंद तरुणींना समजावतोय. आता या व्हिडीओमध्ये या मद्यधुंद तरुणींनी आधी ओला ड्रायव्हरसोबत शिविगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही जुमानलं नाही. अशा प्रकारे पोलिसांशी गैरवर्तन करणे, त्यांच्याशी नशेत हुज्जत घालणे, त्यांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जाणे, या मुंबईत सुरू आहे. मुंबई पोलीस अहोरात्र मुंबईकरांच्या सेवेत असतात. चोवीस ते आठ्ठेचाळीस तास ते आपली सेवा बजावतात. मात्र, त्यांच्यासोबत अशा प्रकारे गच्ची पकडण्यापर्यंत मजलं जात असेल…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव बुद्रुक तालुका जामनेर येथील पदवीधर प्रभारी मुख्याध्यापिका शारदा अंबादास शिंपी यांना यजमान विजय बोरसे यांच्या जोडीने राष्ट्रवादी क्राँग्रेस शिक्षक संघातर्फे जिल्हास्तरीय बहिणाबाई चौधरी गुणवंत शिक्षिका पुरस्कार सन 2022 ने राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव शहराध्यक्षा मंगला पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक, शाल देऊन जळगाव येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील,संजय गरुड, मगन पाटील आदिंच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. “ एकच ध्यास, गुणवत्ता विकास “ हे ब्रीद घेऊन समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शारदा शिंपी यांनी 30 वर्षे 6…
भुसावळ : प्रतिनिधी श्री राजपुत करणी सेनेच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी शिवसैनिक पवन मेहरा यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकेंद्रसिंह कालवी यांच्या तसेच राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शामसिंग ठाकूर यांच्या आदेशाने प्रदेशउपाध्यक्ष प्रविणसिंह पाटील तसेच खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंह पाटील व जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. शहरात विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले व विविध पदावर कार्याचा अनुभव असलेले सामाजिक कार्यकर्ते पवन मेहरा यांच्या कार्याची दखल घेत त्यांची श्री राजपुत करणी सेनेच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे संघटनेच्यावतीने सांगितले आहे. दरम्यान, या निवडीबद्दल नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पवन मेहरा म्हणाले की, संघटनेच्या मान्यवरांनी माझ्यावर…
जळगाव : प्रतिनिधी शालेय शिक्षणातील विषय, अभ्यासाचा तणाव, स्वच्छता अशा अनेक विषयांवर बालकलावंतांनी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरू असलेल्या 18 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी सादरीकरण करून प्रेक्षकांना अचंबित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ला.ना.सार्वजनिक विद्यालयाचे अमोल संगीता अरुण लिखित उल्हास ठाकरे दिग्दर्शित द बटरफ्लाइज, श्री फाउंडेशन वरणगाव यांचे गणेशसिंग मरोड लिखित अजय पाटील दिग्दर्शित शोध अस्तित्वाचा, सातपुडा शैक्षणिक व सामाजिक संस्था शहादा यांचे ऋषिकेश तुराई लिखित रोहिणी निकुंभ दिग्दर्शित म्याडम, श्री समर्थ मठ संस्थान, इंदूर यांचे उषा चोरघडे लिखित – दिग्दर्शित बंद पुस्तक, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ यांचे विनोद उबाळे लिखित, सोनाली वासकर दिग्दर्शित नाते…
जळगावः प्रतिनिधी शहरातील विविध पोलिस स्थानकातंर्गत गेल्या सहा महिन्यापासून मोबाईल चोरीच्या तक्रारीत वाढ झाली होती. त्या अनुशंगाने शहरातील विविध पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या. सदर तक्रारींची दखल घेत पोलीसांनी मोबाईल डिटेक्ट करत ४४ तक्रारदार मुळ मालकांना मोबाईल परत मिळवून दिले आहे . सदर कार्यक्रम पोलीस कवायत मैदानातील मंगलम सभागृहात जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या सहा महिन्यापासून शहरातील विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या चोरीच्या घटनेचा तपास करून ४४ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल आज सकाळी परत करण्यात…