Author: Saimat

मुबंई : प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत महत्त्वाच्या या पदासाठी बीडमधून रेखा फड आणि हेमा पिंपळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही नेत्या अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रीय आहेत. आपापल्या स्तरावर पक्षश्रेष्ठीकडे बातचीत सुरू झाली आहे. मराठवाड्याला अद्याप राज्यस्तरीय पद मिळालं नाही, त्यामुळे आता बीड जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मराठवाड्यात बीड जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. राष्ट्रवादीला भरभरून देणारा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाते. मंत्री धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणले…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हाड येथे काल शिवजयंतीनिमित्त बैल जोडी चा शामि गोंडा अर्थात शंकर पट स्पर्धा भरविण्यात आली होती. कुऱ्हाड खुर्द येथील शिवसेना व युवासेना ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जळगाव जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातून त्यात अकोला, खामगाव ,मालेगाव, सिल्लोड ,धुळे व औरंगाबाद या ठिकाणाहून बैलजोडी स्पर्धकांनी भाग घेतला होता.तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन माा. जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉ. सागरगरुड, राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्षा वंदनाताई चौधरी , कळमसराचे सरपंच अशोक चौधरी,विजय राठोड ,शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील सरपंच कैलास भगत व उपस्थित मान्यवरांनी केले यावेळी सर्व स्पर्धक बैल मालकांनी आपल्या बैलजोडीच्या कलागुणांचे प्रदर्शन केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आज दिनांक 23 मार्च शहीद दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शहीद दिनानिमित्त लोक सेवार्थ जल प्याऊ चे उदघाटन करण्यात आले. सध्याचे उष्णतेचे वाढते तापमान लक्षात घेऊन जळगाव शहरात आलेल्या सर्व वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची तृष्णा भागविण्यासाठी जळगाव शहर आम आदमी पार्टी कार्यालयाजवळ पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे सल्लागार डॉक्टर श्री सूनील गाजरे सर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष. श्री योगेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.शहीद भगत सिंग, सुखदेव, आणि राजगुरु या वीरांच्या प्रतिमेचे पूजन जळगाव शहर महानगर कार्य उपाध्यक्ष अनिल वाघ (सर)…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी येथील गजमल नगरात किरकोळ कारणावरून भांडण झाल्यामुळे तीन महिला व एक पुरुषाने मिळून एका महिलेच्या डोक्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना 22 मार्च घडली होती. गंभीर जखमी महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू आहे. जखमी महिलेने दिलेल्या जबाबानुसार 23 मार्च रोजी एरंडोल पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याबाबत सविस्तर असे की, गजमल नगरात आशाबाई दत्तात्रय चौधरी (वय 45) ही महिला पती व दोन मुलांसह राहते. 22 रोजी महिलेचे पती दत्तात्रय चौधरी हे बकरी बांधण्यासाठी जात असतांना, त्यांच्या घरासमोरील मनिषा सपकाळे, ममता सपकाळे, मोना सपकाळे व दीपक मेहराळे यांनी आशाबाई व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. त्याचा…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात आनंदाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. व्यापार्‍यांसाठी नफ्याची परिस्थिती राहिली आहे. तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवा. तुमची मुले तुम्हाला व्यवसायात पूर्ण सहकार्य करतील. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवाल. कामात कोणाचे तरी सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. यशासाठी सर्व जोखीम पत्करण्याची तयारी असेल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण…

Read More

मुंबई यास्मिन शेख  राज्यात काही ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याचे उघड झाले असून अशा पद्धतीने गर्भलिंग निदान करणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. अशा अवैध गर्भलिंग निदान रोखण्यावर शासनाच्या स्तरावर काय उपाययोजना आहेत, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला प्रश्नोत्तराच्या तासात भाग घेत नाना पटोले म्हणाले की, राज्यात एक हजार मुलांमागे ९१३ मुली असा आलेख आहे. आणि अवैध गर्भलिंग निदान रोखण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केंद्र आहेत असे सांगितले आहे. पम त्यांच्यावर वॉच ठेवणारी यंत्रणा नाही. डॉक्टर डॉक्टर यांच्या संगनमताने हे अवैध काम चालते. मुलींची संख्या कमी असणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे अमर रमेश भोळे वय-३२ यांना दारू पिण्याची सवय असल्याने दि.१६ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ते मंगलपुरी भागातील पुष्पा ठाकूर यांच्या दारूच्या अड्ड्यावर गेले होते. त्याठिकाणी काम करणाऱ्या प्रकाश नावाच्या मुलाने त्यांना सांगितले कि मी मोहाची दारू आणलेली आहे. त्याने दारूच्या बाटलीत ती दारू टाकून दिली. दारू पिल्यानंतर अमर भोळे यांना रक्ताची उलटी झाली. त्यानंतर ते घरी येऊन झोपले असता त्यांना पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्या. कुटुंबियांनी अमर भोळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोदावरी हॉस्पिटल येथे पाठविले. प्रकृती अस्तावस्त असल्याने काही दिवस ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. बुधवारी पूर्ण शुद्दीवर आल्यानंतर अमर…

Read More

औरंगाबादः प्रतिनिधी मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जालना ते जळगाव हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असून त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. हे सर्वेक्षण 23 ते 25 मार्च या कालावधीत होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी जालन्यात दाखल झाले आहेत. विभागाचे हे अधिकारी जालना ते जळगाव मार्गावरील विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर रेल्वेमार्गासंबंधीचा अहवाल रेल्वे विभागाकडे दिला जाईल. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंर देशाचा विकास आणि देशातील गोरगरीब, कामगार, शेतमजूर,दलित व अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना काँंग्रेस पक्षानेच सुरू केल्या असून या योजनांमुळे या वंचीत वर्गाला न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले असून आजही करीत आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचे विचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस व जळगाव शहर जिल्हा कमेटीचे डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचे,निरीक्षक किशोर बोरकर यांनी येथे व्यक्त केले. जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमेटीव्दारा काँग्रेस भवनात आयोजित डिजिटल सदस्य नोंदणी अभियानासाठी ते आले होते.याप्रसंगी ते पुढे म्हणाले की,काँग्रेस पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे मुल्यमापन करून त्या कार्यकर्त्यांस न्याय देण्याचे काम खासदार राहुल गांधी करणार आहेत.पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या एक वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर नोकरी मिळेपर्यंत त्यांना नियमानुसार देय असलेल्या मासिक निर्वाह भत्त्याची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा, असे आदेश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.  राज्यातील मानव संसाधन व औद्योगिक संबंध अधिकारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  संजय ढोके, महाव्यवस्थापक(व्य.प्र.) राजेंद्र पांडे, महाव्यवस्थापक(मा.सं.) भूषण कुलकर्णी व सहमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी ललित गायकवाड उपस्थित होते. महावितरण मधील मासिक निर्वाह भत्ता तसेच अनुकंपा तत्वातर्ंगत नोकरीच्या प्रलंबित प्रकरणांबाबतचा आढावा घेताना डॉ. नरेश गिते म्हणाले, प्रशासनात अनुकंपातत्वाची  प्रकरणे अधिक संवेदनशील पध्दतीने हाताळली पाहिजेत. मृत…

Read More