Author: Saimat

मुंबई, यास्मिन शेख  पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपाने महागाईच्या गर्तेत लोटले आहे. निवडणुकीचे दिवस असताना इंधन दरवाढ रोखून ठेवली होती पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच भारतीय जनता पक्षाने जनतेला महागाईची भेट दिली अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. आज एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये तर पेट्रोल व डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ…

Read More

विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील जाळपोळ आणि हिंसाचार आपण पाहिलाय. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये जाळपोळ सुरू झाली आहे. ही जाळपोळ तृणमूलच्या एका नेत्याच्या हत्येनंतर सुरू झाली आहे. बोगतुई या गावातील जाळपोळीच्या घटनेत जवळपास डझनभर घरं आणि 10 लोकांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये जवळपास 38 लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या जाळपोळीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार रामपुरहाट शहराबाहेरील बोगतुई गावामधील घरांमधून आतापर्यंत सात मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे घटनास्थळावर 10 जळलेले मृतदेह सापडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पोलिसांनी सांगितलंय की, गावातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद टोलनाक्याजवळ मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी वाहनचालकांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील यश अरुण लोखंडे हा त्याचा मिऋ राकेश जाधव याच्यासोबत १२ मार्च रोजी नशीराबाद टोलनाका परिसरात गेला होता. यादरम्यान (एम.एच. १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनाने यश व त्याचा मित्र राकेश यास समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात यश व राकेश या दोघांना दुखापत झाली आहे. उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी यश याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी २१ मार्च रेाजी (एमएच १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनावरील अनोळखी चालकांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

बोदवड: प्रतिनिधी शहरातील गोरक्षनाथ नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भावना नीलेश महाजन असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बोदवडच्या गोरक्षनाथनगरमध्ये राहणाऱ्या भावना महाजन व निलेश सुभाष महाजन यांच्या लग्नाला सहा ते सात वर्षे झाली होती. परंतु त्यांना मूलबाळ होत नसल्याने पती व चुलत सासरे व सासू विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला क्रूर वागणूक दिली होती. जाचाला कंटाळून भावना महाजन यांनी सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या…

Read More

मुंबई : भारतात लोक घराजवळ कुठेही जाण्यासाठी, स्थानिक बाजारातून सामान आणण्यासाठी स्कूटर घेऊन जाणं पसंत करतात. कदाचित अशाच गरजा लक्षात घेऊन क्रेयॉन एनव्ही कंपनीने भारतीय बाजारात एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर चावीशिवाय सुरू केली जाऊ शकते. कंपनीने ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये पांढरा, काळा, निळा आणि सिल्व्हर या रंगांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) किंमत 64,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती अनेक उत्तम फीचर्स आणि उत्तम बूट स्पेससह येते. तसेच, यात कीलेस स्टार्टअप सिस्टम आहे. ही स्कूटर देशभरातील 100 हून अधिक किरकोळ ठिकाणी खरेदी केली जाऊ शकते. या…

Read More

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे. भारतात तेल खरेदी कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुध्दा वाढ होत आहे. भारतात पेट्रोल दरात 80 पैशांनी वाढ केली आहे. मागच्या आठवड्यात काही कंपन्यांनी दरात दोन ते पाच रूपयांनी वाढ केली होती. दोन वर्षात कोरोनाच्या काळात अर्थिक संकटात सापडलेला सामान्य नागरिक नुकताच उभारी घेत होता. एकाचवेळी सगळेचं दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळली जाईल. विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या शहरात किती महागला सिलेंडर पुणे…

Read More

मेष: मेष राशीच्या लोकांनी सर्वांशी नम्रपणे बोलले पाहिजे. राजकारणातील संपर्क क्षेत्र व्यापक असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. वृषभ : वृषभ राशीची लोकं सर्वांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. नवीन आव्हानांना धैर्याने सामोरे जा, मार्ग सुकर होईल. आज मुलांकडून प्रशंसनीय काम होईल. जमीन, मालमत्तेशी संबंधित कामे होतील. महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला जाईल. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होणार आहे. महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आजच पूर्ण करा. चांगले आर्थिक नियोजन करू…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून केलेली भक्ती आणि भारूडातून केलेले समाजप्रबोधन यावर पीएच.डी. पदवी मिळवल्यानंतर डॉ. जगदीश पाटील आपल्या प्रबंधाला ग्रंथरूप देत आहेत. श्री एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून ‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भुसावळ येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेचे मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना 2012 मध्ये ‘संत एकनाथ अभंगगाथा : भक्ती विचार’ या विषयावर प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली होती. या प्रबंधाचे ग्रंथरूप व्हावे या उद्देशाने श्री संत एकनाथ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धर्मरथ फाउंडेशन जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, क्रीडा सांस्कृतिक, खेळाडू व सामाजिक पुरस्कार आणि शिवव्याख्यान २०२२ जळगाव जिल्ह्यातील क्रीडा सांस्कृतिक व परंपरेचा वारसा तसेच आपआपल्या क्षेत्रातील जडणघडणी मध्ये प्रचार प्रसार करून अग्रेसर असण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधुन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रंजना पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , माजी मंत्री जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर, प्रशांत तायडे, सुजाता गुलाने यांच्या हस्ते पुरस्कार वाटप करण्यात आले. यावेळी मेहुनबारे क्रीडाशिक्षक योगेश रामराव साळुंखे, गणेश नारायण पाटील, सुनील शामराव पाटील, भूषण परशुराम…

Read More