जळगाव : प्रतिनिधी शहरातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना गुरुवार 17 मार्चपासून कोर्बेव्हॅक्स लस दिली जाणार आहे. आज सकाळी शहरातील शाहू महाराज रुग्णालयात पहिली लस देऊन प्रारंभ करण्यात आला. बुधवारी राज्य शासनाकडून कोर्बेव्हॅक्स लस मनपाला प्राप्त झाली. 1 जानेवारी 2008 ते 17 मार्च 2010 दरम्यान जन्मलेल्या मुले/मुलींना ही लस देण्यात येईल. यासाठी त्यांना आपले आधार कार्ड किंवा जन्मतारीख नोंद असलेले शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करून किंवा ऑन स्पॉट नोंदणी करण्याची मुभा राहील. लस घेण्यासाठी मुलांचे 12 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून मान्यताप्राप्त कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जातील. पहिला डोस घेतल्यानंतर…
Author: Saimat
पुणे : वृत्तसंस्था सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजस मोरेविरोधात शिवाजीनगर पोलिसांत ही तक्रार देण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेन ड्राइव्ह हा तेजस मोरे यानेच पुरवला, असा आरोप चव्हाणांनी केला आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर तेजस मोरेचा शोध पोलीस घेतात का, हे पाहावे लागेल. जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप नुकताच केला होता. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावे पुढे येणार आहेत. ‘व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता’ व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता, असा आरोप…
मेष : आज मेष राशीच्या लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे सरकारकडून लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य सर्वोच्च शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही अंगावर येऊ शकते. आज तुम्हाला कठीण समस्यांचे समाधान मिळेल. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. कर्क : आज कर्क राशीच्या लोकांना संमिश्र…
मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख ) राज्यातील आमदारांना अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन वर्षा पासून दर वर्षी १ कोटी निधी वाढत आहे. या वर्षी आमदार निधी 5 कोटी पर्यंत करण्यात आला असून,आमदारांच्या पीए आणि ड्रायव्हर यांच्या पगारात पाच हजाराने वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे आता आमदारांन बरोबर पीए आणि ड्रायव्हर याना ही अच्छे दिन येणार आहेत.
औरंगाबाद : वृत्तसंस्था नात्यातील एका महिलेला मारहाण केल्या प्रकरणी वैजापुर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, आता आमदार बोरनारे यांच्यावर याप्रकरणी विनयभंगची कलमं लावण्यात आली आहे. पीडित महिलेच्या पुरवणी जवबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमासाठी वैजापूरात आले असताना आमदार बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत आमदारांच्या नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण आपला विनयभंग झाला असल्याचा आरोप सुध्दा या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जवाब नोंदवत आता आमदार बोरनारे यांच्यावर विनयभंगाची कलमे लावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार…
मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख ) अर्थसंकल्पाच्या चर्चेवर उत्तर देतांना राज्याचे अर्थ मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या उत्तराची अभंगापासून सुरुवात केली . कोरोना काळात झालेल्या वैद्यकीय सेवा बरोबर अन्य सेवा अधिकाऱ्यांनी काम केले त्यांच्या कौतुकावरही टीका होते ही शोकांतिका आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागात राजकीय नेत्यांनी प्रबोधन करण्याची गरज आहे. राज्यवर कर्ज भार वाढतो आहे हे सत्य आहे, तरी कोविड संकटात कर्ज काढावे लागले. सरकारने प्रयत्न केला की, स्थूल उत्पन्नाच्या 3 टक्केपेक्षा हे कर्ज वाढू नये मात्र कोविड काळात 14 हजार कोटी हे कर्ज रकमेतून खर्च झाले आहे. केंद्र सरकारला ही कोविड काळात कर्ज घ्यावे लागले आहे. योजना या…
पणजी : वृत्तसंस्था गोव्यात आणि मणिपूरमध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. असे असले तरी दोन्ही राज्यांमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला होता. मात्र आता हा सस्पेन्स दूर झाला असून गोवा आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री कायम राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोव्यामध्ये प्रमोद सावंत तर मणिपूरमध्ये बीरेन सिंह हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यामध्ये झालेल्या भेटीनंतर पंतप्रधानांनी सांगितले की, नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या शानदार विजयासाठी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना शुभेच्छा. आमचा पक्ष मणिपूरच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अधिक…
नाशिक : प्रतिनिधी देशातील भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. फडणवीसांच्या काळात सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या ४७ घटनांमुळे २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. पण भाजपाच्या चित्रा वाघ यांना त्या प्रकरणाचा विसर पडलेला दिसतो. त्यांनी थोडे मागे वळून पाहिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी व्यक्त केले. नाशिक दौऱ्यावर असताना चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराबाबत महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबवले आणि त्यांचा सन्मान करण्याचा…
फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. असे मानले जाते की जेव्हा हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हादला काहीही झाले नाही. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा होती. तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होलिका दहन केले जाते. यावेळी होलिका दहन 17 मार्च 2022 च्या रात्री केले जाईल. ज्योतिषांच्या मते, होलिका दहन दरम्यान काही चुका कधीच करू नये, अन्यथा त्याचा फटका नंतर भोगावा लागू शकतो. होलिकेच्या अग्निला जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कोणत्याही नवविवाहित जोडप्याने ही अग्नी पाहू नये.…
जळगाव ः प्रतिनिधी पाणी हेच जीवन आहे या वाक्यावरून पाण्याचे महत्व लक्षात येते.पाण्याच्या उपलब्धतेवर समस्त सजीव सृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे.पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. याअनुषंगाने राज्यभर जलजागृती सप्ताहाचा आज आरंभ करण्यात आला. येथील आकाशवाणी चौकीतील पाटबंधारे विभागातील मुख्य कार्यालयात कार्यकारी संचालक पी.जी.मांडाळे यांच्या हस्ते जलसप्ताह प्रारंभ करण्यात आला. या जलसप्ताहाची सांगता 22 मार्च रोजी होणार आहे. तापी पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयात जलजागृती सप्ताह सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मुख्य अभियंता जी.डी.बोरकर, अधिक्षक अभियंता श्री.दळवी, जे.आय.पी.सी.चे अधिक्षक अभियंता श्री.भोसले, जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बेहरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अग्रवाल, वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे…