Author: Saimat

मुंबई : NACL घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. उद्या प्रताप सरनाईक यांनाही अटक होऊ शकते, असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. प्रताप सरनाईक यांना अनेकवेळा समन्स बजावले होते. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ईडीने (ED) ही कारवाई केल्याचे आता समजते. अटक करणार… प्रताप सरनाईक यांच्या ११.३५ कोटींच्या मालमत्ते जप्तीबाबत किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या साथीदाराने एनएसीएल घोटाळ्यात २१६ कोटींचा घोटाळा केला आहे. ३५ कोटी सरनाईकांच्या बँक खात्यात आले होते. या पैशातून त्यांनी टिटवाळ्याची जमीन घेतली होती. त्यामुळेच आज ईडीने ही कारवाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सागर पार्क मैदानाच्या पार्किंगमधून तरूणाची दुचाकी लांबवल्याप्रकरणी मार्च रोजी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादावाडी परिसरातील कल्याणीनगर येथील नीलेश बापुराव पाटील (वय ३०) हे २० मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सागर पार्क मैदानावर आले. यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ एएम ५२७१) या क्रमांकाची दुचाकी सागर पार्क मैदानाच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. काम आटोपल्यावर परत घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी नीलेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट होते ते आता संपले परंतु कोरोना काळात लॉकडाउन झाले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले तसेच लॉकडाउन काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते फक्त सरकारी नोकरदारांना पगार सुरु होते त्यामुळे आता लग्न करण्यासाठी वधू पित्याची शासकीय नोकरदारास अधिक प्राधान्य दिले जाते. यामुळे शेतमजून व रोजदारी करणाऱया युवकांना मात्र विवाह होण्यास खूप वेळ लगत आहे. त्यामुळे युवकांना मानसिक त्रास होत असल्याने काही युवक जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेताना समजून येत आहे. तालुक्यातील नशिराबाद येथे एका ३० वर्षीय तरुणाने विवाह होत नसल्या कारणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतन खरोटे (वय…

Read More

मुबई : प्रतिनिधी शिवसेना नेते प्रताप सरनाईक पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनलायाच्या (ED) रडारवर आले आहेत. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने NSEL प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, 25 डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केलं, बनावट कागदपत्रं तयार…

Read More

प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. पुण्यातील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते. तसंच मागोवा आणि तात्पर्य या मासिकांचे संपादकही होते. डेक्कन जिमखाना परिसरातील त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव आज दुपारी ४ नंतर ठेवण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार केले जातील. मागोवा आणि तात्पर्य या मासिकांच्या माध्यमातून तसंच मागोवा या गटाद्वारे सत्तरीच्या दशकातल्या तरुण पिढीला मार्क्सवादी विचारांकडे वळवण्याचं कार्य केलं.

Read More

यावल  सुरेश पाटील तालुक्यातील डांभुर्णी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची सभा दि.23 मार्च रोजी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एम.पी.भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेत संस्थेच्या चेअरमनपदी डांभुर्णी येथील प्रगतशील शेतकरी तथा जळगाव येथील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.विवेक दिवाकर चौधरी तर व्हा.चेअरमन पदी बाळकृष्ण पंडीत सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, संस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे13संचालक निवडून आले शेतकरी पॅनेलचे नेतृत्व डॉ.विवेक चौधरी व सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी यांनी केले संचालक प्रवीण महाजन,उमाकांत भादले,जितेंद्र भंगाळे,ललित चौधरी,सुहास सरोदे,भिमराव फालक,राजू कोळी,गोकुळ कोळी सौ.कांचन फालक,सौ.सुजाता फालक,टेनीराम सरोदे सभेत उपस्थित होते.डांभुर्णी वि.का.सो.ला गतवैभव प्राप्त करण्यासाठी व शेतकरी सभासदांना…

Read More

मुबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये आमदारांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरं देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या निर्णयावरून आता राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामान्य जनतेमधून मात्र आधीच कोट्याधीश असणाऱ्या आमदारांना पुन्हा मोफत घरे कशासाठी? असा सवाल देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं या निर्णयाचा समाचार घेताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. “खर्च कुणाच्या सांगण्यावरून?” राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून केला जात आहे, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. “मुळात हे कशासाठी हवंय? आमदार निवास उपलब्ध…

Read More

पुणे : प्रतिनिधी ओळखीतल्या व्यक्तींकडूनचा होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिंजवडीत वडिलांकडून स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तर कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले आहे. या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी फरार आहेत. अद्याप पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र आठवडाभरात लैंगिक अत्याचाराच्या चार घटना घडल्या आहेत. अशा अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तर नातेसंबंध कोणत्या थराला गेले आहेत, याचीही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आता व्यक्त होतेय. शिवाजीनगरातील धक्कादायक घटना शिवाजीनगर परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर…

Read More

बोदवड : प्रतिनिधी बोदवड येथून कॉलेज संपल्यानंतर रिक्षातून घरी जात असतांना अचानक रिक्षा पडल्याने विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागले. तृप्ती भगवान चौधरी असं दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारी 17 वर्षीय तृप्ती तोल गेल्याने रिक्षातून खाली पडली होती. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेलवड येथील ही घटना घडली. तृप्ती चौधरीला अपघातात गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर जखमी अवस्थेत जळगावला नेत असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तृप्तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एसटीचा संप सुरू नसताना बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातील तब्बल 4 हजार 215 विद्यार्थी पासेस काढून शिक्षणासाठी अप-डाऊन करायचे. त्यात…

Read More