जळगाव : प्रतिनिधी रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रिद घेऊन गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालय जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे पोहोचत आहे. खेड्यापाड्यात घेण्यात येत असलेल्या कॅम्पद्वारे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अनेकांना गंभीर आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्ल्यासह येण्यासाठी गाडीचीही व्यवस्था उपलब्ध करुन दिली जात आहे. मंगळवार, २२ मार्च रोजी यावल तालुक्यातील कासारखेडा, भादली आणि मोहाडी येथे एकाचदिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील शिवाजी महाराज चौकात सोमवार, २१ मार्च रोजी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी मुधमेह, रक्तदाब, टू डी…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सोमवारी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेतली. या वेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचीही भेट घेतली. या वेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील उपस्थित होते. विद्यापीठाशी निगडित अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. विद्यार्थीहिताच्या प्रश्नांवर कुलगुरू डॉ.माहेश्वरी यांनी राज्यपालांना साकडे घातले.
जळगाव प्रतिनिधी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मोहाडी गावाजवळ घडली. या संदर्भातील वृत्त असे की, सुजय गणेश सोनवणे (वय१३) हा मुलगा आज दुपारी साडे अकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता. याप्रसंगी गावाजवळ एमएच-२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली
ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांमधे खळबळ. यावल सुरेश पाटील तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीनीची महसूल विभागाकडून रितसर परवानगी न घेता,गांवठाण प्रकरणाबाबत कार्यवाही न करता भोगवटादार लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यावल येथील संबंधित एका ग्रामविस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी भालोद मंडळाधिकारी मिलिंद देवरे यांना दिले आहे. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी भालोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीन असलेल्या गावठाणाबाबत यावल पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तर अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाची रितसर परवानगी न घेतला भेगवटादार लावून गाव नमूना नंबर ८ (अ) तयार केल्याबाबत…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे मंगळवार मध्यररात्रीच्या सुमारास शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे, जरंडी येथील शेतकरी नितीन मानसिंग पाटील यांच्या जरंडी शिवारातील गट नंबर ३८०/ब यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरीला गेला आहे, चोरांनी शेतातील गोडाऊन जवळ नसल्याच्या फायदा घेत नितीन पाटील यांच्या शेतातील गोडाऊनच्या शेडचे कुलूप तोडून अंदाजे ४० क्विटल ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा कापूस चोरी केला आहे या घटनेची पोलिसांना माहीत दिल्यानंतर घटनास्थळी सोयगाव पोलीस दाखल झाले पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित , जमादार रवींद्र तायडे, राजू बर्डे…
मुंबई यास्मिन शेख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी शासनाचा जलसंपदा विभाग काम करत आहे. या उद्देशाने शासनाने अनेक कामे पूर्ण केली असून अनेक कामे सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. मंगळवारी विधानसभेत २६३ अन्वये अनुदान मागणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांनी या चर्चेत भाग घेत अनेक चांगल्या सुचना केल्या. गोदावरी थट कालवा दुरुस्तीच्या कामाला महाविकास सरकारमध्ये गती मिळाली असून पुढील दोन वर्षात मोठे काम होईल. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. कोविडच्या काळात आर्थिक चणचण असताना या प्रकल्पासाठी ८२३ कोटी ७२ लाख रुपये दिले गेले तर यंदाही २२-२३ यावर्षी…
जळगाव : प्रतिनिधी शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना श्री आयुक्त सतीश कुलकर्णी व महापौर सौ जयश्री ताई महाजन अपर आयुक्त सौ विद्या गायकवाड चंद्रकांत वांद्रे नितीन पटवे सुरेश कोल्हे प्रकाश सपकाळे राजु सोनवणे प्रमोद निकम व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मालेगावः नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये पूर्व वैमनस्यातून चक्क एका व्यक्तीचा हात तोडल्याचा प्रकार उघड झाला असून, जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. संशयित फरार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, या अघोरी हल्ल्याने पोलिसही चक्रावून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारींमुळे मालेगाव सतत चर्चेत आहे. दिवाळीच्या सुमारास तर मालेगावमध्ये पेटलेल्या दंगलीने देश हादरला. त्यामुळे या संवेदनशील शहरात पोलिसांसमोर रोज एक आव्हान उभे राहताना दिसत आहे. मालेगावमधील पवारवाडीतील मेहवीनगर येथे दोन कुटुंबात पूर्व वैमनस्य आहे. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. हे प्रकरण थेट भांडणापर्यंत गेले. या भांडणांनी इतके टोक गाठले की, एका व्यक्तीने समोरच्याच्या मनगटावर शस्त्राचा वार करून हात तोडला. या…
मेष : तुम्हाला व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. आज काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात ज्यातून ते उत्पन्न मिळू शकते. आर्थिक बाजू सुधारेल आणि तुम्हाला आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील. आज तुम्हाला करिअरमध्ये नवीन संपर्कांचा लाभ मिळेल. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. बचतीत वाढ होईल. वृषभ : वृषभ राशीचे लोक व्यावसायिक क्षेत्रात नवीन योजना सुरू करू शकतात. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे असेल तर निराश होऊ नका, प्रयत्न करा, काम पूर्ण होईल. आज नोकरीत अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवू शकतात. घरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घर घेण्याचा प्रयत्न करत असाल तर या कामासाठी आजचा…
मुंबई यास्मिन शेख महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते पदी आ. अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोद पदी आ. अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सभागृहात ही घोषणा केली. अमरनाथ राजूरकर नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून अभिजीत बंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले व वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सदर नियुक्ती संदर्भात पक्षश्रेष्ठींनी शिफारस केली होती. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस…