प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव निसर्गाच्या अनियमित व ढगाळ लहरीपणामुळेमका पिकावर अनिष्ट परिणाम झाला असून कणीसाच्या वरील भाग हा लष्करी अंळीने मोठ्या प्रमाणात पूर्णता फस्त केला असून मका पिकावर परिणाम झाला आहे , मका उत्पादनातवर दहा ते पंधरा टक्के घट होणार आहे गणेश दुधाळ अवस्थेत असताना रानडुकरांनी पिकाची नासाडी केली व त्याच्यातच शेतीपंपाला होणारा वीजपुरवठा कमी दाबाचा तसेच मध्येच खंडित होत असल्याने शेती पिकांना पाणी भरणे कठीण होतं असून विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे , याच कारणामुळे बरोडा भागातील पिके सुकू लागली आहेत अगदी तोंड आलेले शेतीचे उत्पन्न हातचे जायला नको म्हणून शेतकरी रात्रंदिवस एक करीत आहे…
Author: Saimat
यावल (सुरेश पाटील) यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावापासून भुसावळ कडे जाताना बंद पडलेल्या जुन्या पोलीस चौकीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे जिवघेणे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे याकडे यावल सार्वजनिक बांधकाम उपविभागासह जलसिंचन विभागाचे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे. शेळगाव बॅरेजचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,अंजाळे गावाजवळ मोर नदीपात्रात शेळगाव बॅरेजचे बॅकवाटर/पाणी सतत राहणार असल्याने या ठिकाणी उंच पुलासह रस्त्याचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे वाहतुकीस पर्यायी रस्ता करण्यात आला आहे,अंजाळे गावापासून भुसावळकडे जाताना रस्त्यावर अर्धा किलोमीटर अंतरावरील उतार आणि चढावावर मोठमोठे जीव घेणे खड्डे पडले…
यावल (सुरेश पाटील) केंद्रीय पुरस्कृत एका अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेत शैक्षणिक कायद्यांची पायमल्ली करून इयत्ता 10वी परीक्षा बोगस घेतली जात असल्याची तसेच शाळेला मिळालेला सांकेतिक क्र.हा सुद्धा संशयास्पद असल्याने इयत्ता 5वी ते 9वीतील विद्यार्थी हे सुद्धा प्रत्यक्षात नसताना कागदोपत्री दाखवले गेल्याने या शाळेमार्फत शासनासह विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक व शैक्षणिक फसवणूक केली गेली त्यामुळे या गैरप्रकाराकड़े संबंधित सर्व शिक्षण अधिकारी जबाबदार असल्याचे जिल्ह्यात शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रात बोलले जात आहे. या एका निवासी आश्रम शाळेत कागदोपत्री जे विद्यार्थी मुलं-मुली दाखविले गेले त्यांच्या पटसंख्येनुसार आधार कार्ड नोंदणी संशयास्पद आहे,विद्यार्थी इयत्ता 9वी पर्यंत शाळेत दाखल नसताना ते विद्यार्थी कोणत्या शैक्षणिक नियमानुसार इयत्ता…
मेष : आज मेष राशीचे लोक आपले काम प्रामाणिकपणे करतील. तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता येईल. आर्थिक बाबतीत आज लोभाची परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांची सर्व कामे सहज पार पडतील. आज व्यापार्यांना विशेष फायदा अपेक्षित आहे. आर्थिक देवाणघेवाण करताना एखाद्याला साक्षीदार म्हणून ठेवा. तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. तरुणांना इच्छित जीवनसाथी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आज तुम्ही तुमच्या विचारानुसार काम कराल, त्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची…
जळगाव प्रतिनिधी या संदर्भातील माहिती अशी की, जळगावातील परवेज निसार खाटीक (वय २२, लक्ष्मीनगर, जळगाव ) आणि आमीर जाकीर खाटीक (वय २२, उस्मानिया पार्क ) हे भुसावळ येथे कामानिमित्त गेले होते. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्वास घेतला.
जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग जळगाव, व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक माननीय श्री आर एम लोळगे, माहिती व तंत्रज्ञान कायदा सोशल मीडिया, सहदिवाणी न्यायालय, रावेर, यांनी रॅगिंग म्हणजे विद्यापीठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही लेखी किंवा तोंडी कृती की, ज्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला दुःख किंवा कष्ट होईल असे असभ्य वर्तन होय. अशी व्याख्या सांगितली. त्यांनी मेसेज मधून एखाद्या इमेल मधून फोटो मधून डाटा मधून सुद्धा चूक होऊन त्याचे रॅगिंग मध्ये रूपांतर होते असे सांगितले.…
जळगाव प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात आज गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातुन 130 च्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये निंब, करंज, बदाम, पेलेटोफार्म, बकूळ, बुच, चांदणी, चाफा, कन्हेर, जास्वंद यांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, होम डीवायएसपी विठ्ठल ससे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, राखीव पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोनि बळिराम हिरे, शहर पोलीस स्टेशनचे पोनि विजयसिंह ठाकूरवाड, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोनि प्रताप शिकारे, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोनि रामदास वाकडे,…
जळगाव प्रतिनिधी आज जळगाव काँग्रेस भवन येथे नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे तर महानगर अध्यक्षपदी मुजीब पटेल यांची गेल्या पाच मार्च रोजी लागलेल्या युवक काँग्रेस निवडणुकीच्या निकालांमध्ये दणदणीत विजय झाला. त्यानंतर आज जळगाव काँग्रेस भवन येथे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रथम महापुरुषांचे पूजन करण्यात आले .दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष माननीय प्रदीप बाळासाहेब पवार यांना दिले मनोगत : प्रास्ताविक मुक्तदीर देशमुख, एड.अविनाश भालेराव, सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, विनोद कोळपकर, सत्कारमूर्ती नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगर अध्यक्ष मुजिब पाटील,श्याम तायडे, माजी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात पतीपासून विभक्त विवाहिता दोन मुलांसह राहते. या महिलेशी नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाशी जुनी ओळख असल्याने त्याचेही महिलेच्या घरी येणे-जाणे होते तर संशयीत आरोपी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) याचे विवाहितेशी प्रेमसंबंध होते. शनिवारी नरेश शिवाजी नगर हुडको भागात आल्यानंतर आकाशही तेथे आला व त्यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर आकाशने जवळील चाकू/चॉपरसारख्या धारदार शस्त्राने नरेशच्या पोटात दोन वेळा वार केल्याने नरेशचा मृत्यू ओढवला. गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वातील जितेंद्र पाटील, विजयसिंह पाटील, अक्रम शेख, प्रीतम पाटील आदींच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरात आज सकाळपासून शहरात दुसरा खून झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी नगर परिसरातील घरकुल येथील एका खोलीमध्ये नरेश आनंद सोनवणे(३५) राजाराम नगर येथील रहिवासी आहे. नरेश आनंद सोनावणे हा दूध फेडरेशन येथील रहिवाशी आहे. या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत. खून कशामुळे झाला, कुणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी चॉपरने वार केल्याने खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नरेश सोनावणे हा रिक्षा चालक होता.हा खून कोणी व कशामुळे झाला ह्ये अजून स्पष्ट झालेलं नाही,तरी हा वार धारदार शास्त्राने झालेला…