Author: Saimat

एरंडोल : प्रतिनिधी शहरातील  तीन  व्यवसायिक जालना येथे छोटा हत्ती वाहनाला बाणेगावजवळ भरधाव वेगाते धावणार्‍या ट्रकने धडक दिल्याने या अपतातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील पापड विक्रेते पापड विक्रीसाठी जात असताना त्यांच्या टाटा छोटाहत्ती गाडीला जालना जिल्ह्यातील बाणेगाव गावानजीक अपघात झाला असून दोन जण जागेवरच ठार तर एकाचा उपचारदारम्य मुत्यु झाला. एरंडोल येथील अमळनेर दरवाजा परिसरातील रामदास रतन पाटील, कल्पनाबाई भरत पाटील,कल्पनाबाई गोविंदा ठाकूर व सचिन पाटील, भारत पाटील हे एमएच -१९ सीवाय -१०९१ या क्रमांकाच्या टाटा एस या वाहनाने पापड व कुरडयांचा स्टॉक घेऊन विक्रीसाठी निघाले होते. काल रात्र जास्त झाल्याने रस्त्याच्या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील एकाच्या घरी रात्री हल्ला झाल्याची घटना रात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली. मात्र या हल्ल्यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. तर दोन दुचाकी वाहनाची मात्र तोडफोड करण्यात आली असल्याची समजते. सकाळी रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील महाबळ परिसराला लागून असलेल्या जाकीर हुसैन कॉलनी राहणाऱ्या नलिनी विलास तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यांच्या राहत्या घरी जाकीर हुसैन कॉलनीत रात्री आबा व अश्‍विन (पूर्ण नाव माहित नाही) हे घराबाहेर येवून त्यांची मुले विनोद व सतिष यांच्या नावाने शिवीगाळ करून व जीवेठार मारण्याची धमकी देत घराबाहेर असलेल्या बुलेट…

Read More

मेष : आज तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे. तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी तुम्ही चांगल्या संधींचा सहज फायदा घ्याल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज शुभवार्ता मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत प्रकरण प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून सतत अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे विविध कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’ अशी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी असामान्य कार्यकर्तृत्व असणाऱ्यांचा सन्मान आज झाला, सर्व पुरस्कारार्थी इथं पर्यंत त्यांच्या दुर्दम्य इच्छा शक्तीमुळेच पोहचले आहे.समाजातील साकारात्म कार्य आणि ते कार्य करणारी माणसे समाजापर्यत पोहचली पाहिजे.आपलं काम जो पर्यंत समाजपर्यंत पोहचणार नाही तो पर्यंत समाज त्यात सहभागी होणार नाही.समाजकार्य आता आधुनिक पद्धतीनेच करण्याची वेळ आली आहे.समाजात सेवा भाव वाढला पाहिजे आणि अश्‍या काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली पाहिजे.रडण्याऐवजी लढण्याची प्रेरणा दिव्यांगांना दीपस्तंभच्या माध्यमातून दिली जात आहे हे उदाहरण सर्व समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सचिन खेडेकर यांनी केले राज्यस्तरीय दीपस्तंभ 2022 पुरस्काराचे वितरण रविवारी छत्रपती संभाजी राजे सभागृह जळगाव येथे झाले , त्यावेळी ते बोलत होते.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब जळगाव, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, प्रभाकर पाटील हॉस्पिटल आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच पापणी पडणे याविषयी तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत मुक्तांगण येथील प्रभाकर पाटील हॉस्पिटल येथे 22, 23 व 24 एप्रिल रोजी झालेल्या शिविरात 55 डोळ्यांवर व 5 पापणी पडणे या विषयी मोफत शस्त्रक्रीया करण्यात आल्या. समारोप प्रसंगी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. दिपक आठवले, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी, प्रकल्प प्रमुख डॉ. तुषार फिरके,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, यांसारख्या राज्यात 9 ते 15 टक्क्यांपर्यत वीजेची तुट असतांना महावितरणने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे राज्यात ही तूट शुन्य टक्क्‌यापर्यंत म्हणजेच मागणी एवढा वीजपुरवठा करण्यात आला. त्यामुळे राज्यातील भारनियमन आटोक्यात आले असून महावितरणचे प्रभावी नियोजन यशस्वी होतांना दिसत आहे. परिणामत: मागील चार दिवसांत राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून वाढत्या तापमानात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील 10 प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी या संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसहकार गटाने 21 उमेदवार उभे केले आहेत या निवडणुकीच्या प्रचारार्थ काल नूतन मराठा कॉलेज जळगाव येथे प्रचार मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याला लोकसहकार गटाचे पॅनलप्रमुख मनोज पाटील सर गटाचे अध्यक्ष शामकांत भदाणे , जेष्ठ सदस्य सुनिल सूर्यवंशी ,सुभाष जाधव देशमुख यांनी मेळाव्याला संबोधित केले. त्यात मनोज पाटील सर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अहवाल छपाईत 14 लाखाची बचत केली , 218 रुपयात 3 लाखाचे विमा कवच करून दिले, सहामाही वर्गणीची तिमाही नुसार वर्गणीवर व्याज आकारणी , कर्जवाढ मर्यादा पहिले वर्षी 2 लाख दुसऱ्या वर्षी 2 लाख पगाराच्या टप्प्यानुसार केली ,…

Read More