मलकापूर प्रतिनिधी मलकापूर1/5/22 शासन स्तरावर व नगरपालिका प्रशासन संचालनालय स्तरावर राज्यातील नगरपालिका नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांबाबत जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्यामुळे नगरपरिषदेचे संघटनेचे पदाधिकारी सर्व सदस्य कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 10-20-30 वर्षांनंतर मिळणारे कालबद्ध आश्वासीत प्रगती योजना लागू करणे, 100 % वेतन कोषागारातून करणे, 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाचे थकीत हप्ते मिळणे, शासनाकडून वेतनखर्चासाठी मिळणारे सहायक अनुदान मागणीपेक्षा कमी मिळत असून ते परिपूर्ण देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागु करणे या व अशा एकुण 26 मागण्यांसाठी विविध संघटनांनी 2 वर्षांपासून पाठपुरावा करुनही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने दि. 5 एप्रिल 2022 रोजी काळ्या…
Author: Saimat
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी औरंगाबाद जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात चर्चेत असलेल्या स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे कार्य जिल्हात अव्वल असल्याचे मत सोयगाव पोलीस ठाण्यात चे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ साहेब यांनी म्हटले होते,याच स्वप्नपूर्ती फाउंडेशन ने आज 500 रूग्णांचे मोफत मोतिबिंदू आँपरेशन यशस्वी रित्या संपन्न करून तालुक्यातील गरजु व गरीब रुग्णाला एक हात मदतीचा दिला आहे.. स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांनी नुकतीच या संदर्भात माहिती देत तालुक्यातील पञकार बांधवांचे आभार व्यक्त केले.सोयगाव तालुक्यातील किन्ही शिंदोळ,वडगाव,जरंडी बनोटी इ.ठिकाणी भव्य नेञतपासणी शिबीर आयोजित करत मोफत आँपरेशन करणारी ही सोयगाव तालुक्यातील पहीली संस्था आहे तसेच रक्तदान शिबीरे व आरोग्य शिबीर यांच्या माध्यमातून अनेक समाजातील…
मुंबई : प्रतिनिधी “महाराष्ट्राची भूमी शूरांची, वीरांची, संत-महात्म्यांची, समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष या भूमीत जन्मले. रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन करुन राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी घालून दिला. या महामानवांनी दिलेला विचार, दाखवलेल्या वाटेवरुन चालण्याचा प्रयत्न महाराष्ट्रानं, राज्य सरकारनं कायम केला आहे. सर्वांना सोबत घेऊन, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत राज्यातील जनतेच्या एकजूट व निर्धाराच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल अखंड सुरु राहील. महाराष्ट्राची, महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही,” असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात…
भुसावळ : प्रतिनिधी जागतिक नृत्य दिन निमित्ताने येथील नुपूर कथक डान्स ॲकेडमी च्या वतीने अखंड घुंगरुनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी एक तास घुंगरु नाद करण्यात आला. यात नृत्यशिक्षीका चारु भालेराव यांच्यासह कनिका नेमाडे, मन्विथा थोटा, लतिका श्रीखंडे, गिरिजा सावदेकर, मनिषिका आरुषी, चेतना नेमाडे, ज्ञानेश्वरी नेमाडे, सीमा पाठक, अवनी धाडसे, नुपूर भालेराव , चंन्द्रजा र्इंगळे, अनघा वानखेडे, डिंपल गाढे, उर्वशी कोळी, शान्वी तन्नीरवार, हेमांगी पंडागरे, पुजा तन्नीरवार,निलम धाडसे, पुर्वा नेवे, यांनी सहभाग घेतला.यावेळी सामुदायीक नटराज पुजन करण्यात आला. अशाप्रकारे जागतिक नृत्यदिन उत्साहात झाला.
जळगाव : प्रतिनिधी आपण कोणताही पक्षीय भेद न बाळगता जिल्ह्यात आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा योजनांना जलजीवन मिशनच्या अंतर्गत मंजुरी प्रदान केली आहे. बडेजाव मिरवण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कामांना महत्व देतो. या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील सावदा आणि रवंजे येथील पाणी पुरवठा योजनांना 15 दिवसात मंजुरी देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. याबाबत त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता भोगवडे यांना निर्देश दिले. एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन आणि जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील 305 गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी 213 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात…
मेष : मेष राशीच्या लोकांना सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आज सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे लाभ मिळू शकतो. यावेळी जर तुम्ही या संधीचा पुरेपूर वापर करू शकलात तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. आज बिझनेस, नोकरी चांगली राहील. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. त्यामुळे थोडे सावध राहा. आज ८५% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य आज पूर्वीपेक्षा खूप चांगले राहील. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी असेल. तसेच, आज तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला नवीन अधिकार मिळतील ज्यामुळे तुमची…
यावल : प्रतिनिधी यावल शहराचा आठवडे बाजार दर शुक्रवारी असतो आठवडे बाजाराची मोठी वर्दळ आणि लहान,मोठे दुकानदार,हॉटेल व्यवसायिक, भाजीपाला, मास, मच्छी ,चिकन व इतर अनेक वस्तूची विक्री करणारे दुकानदार आणि ग्राहक संगनमताने प्लास्टिक पिशवी,थैलीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करीत असल्यामुळे प्लास्टिकचा वापर पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने मानवास आणि पशुपक्षी यांना मोठ्या प्रमाणात हानिकारक असल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी आपल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत आठवडे बाजारातील व्यवसायिकांना आणि यावल शहरातील सर्व स्तरातील विक्रेत्यांच्या दुकानदारांच्या प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याकडील प्लास्टिकच्या 20 किलो प्लॅस्टिक थैल्या जमा केल्या आणि यापुढे दुकानदारांकडे प्लॅस्टिक पिशव्या थैल्या आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना दिल्या.…
मेष : मेष राशीचा दिवस संस्मरणीय राहील. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीने कामात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील. कार्यात लाभदायक फळांचे महत्त्व कायम राहील. बोलण्यात गोडवा राहील. त्यामुळे तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा येईल. आज तुमच्या घरातील काही शुभ कार्य पूर्ण होतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. देवी सरस्वतीची पूजा करा. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा त्याला वास्तविक स्वरूप देऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. नोकरीत कोणाच्या…