Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवारी (30 एप्रिल) वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी व जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी सुरू राहतील. या उपलब्ध सुविधेसह वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे महावितरणकडून करण्यात आले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल पवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. ुुु.ारहरवळीलेा.ळप या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट…
जळगाव ः प्रतिनिधी भगवान परशुराम जयंती यंदा बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे जल्लोषात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यंदा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 1 मे रोजी भव्य दुचाकी रॅली तर 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील रथ चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ब्राह्मण समाजातील जवळपास 50 शाखा व भाषा असलेले समाजबांधव यादिवशी एकाच ठिकाणी येऊन उत्सव साजरा करणार आहेत. कार्यक्रमासाठी सुमारे 50 कार्य समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात 400 स्वयंसेवकांचा समावेश आहे. ढोल पथकाचा सराव जी. एस. मैदान या ठिकाणी सुरु आहे. 1 मे रेाजी संध्याकाळी 5 वाजता संभाजी चौकापासून दुचाकी रॅलीची सुरवात होईल. बालगंधर्व खुले…
जळगाव ः प्रतिनिधी कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये 15 राज्यांत भारनियमन होत असताना महाराष्ट्रात आठवडापासून अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे गेल्या शुक्रवारपासून राज्यात कुठेही भारनियमन करण्याची वेळ आली नाही. ही परिस्थिती गुरुवारीही (28 एप्रिल) कायम होती. या कामगिरीसाठी ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे कौतुक केले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून (दि. 22) गुरुवारपर्यंत (दि. 28) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. गुरुवारी मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने 24 हजार 7 मेगावॅट या आजपर्यंतच्या सर्वोच्च मागणीइतका वीजपुरवठा केला. ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी या कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची अधिकृत क्रिकेट अकादमी आहे आणि महान भारतीय फलंदाज, व्हीव्हीएस लक्ष्मण हे अकादमीचे सध्याचे क्रिकेट प्रमुख आहेत. संपूर्ण भारत वर्षातून निवडक मुलांची या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकूण 5 खेळाडूंनी निवड करण्यात आली त्यात नचिकेत ठाकूरची निवड ही निश्चितपणे जैन स्पोर्टस अकादमी व जळगांव जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे.हे शिबिर 9 मे ते 2जून 2022 दरम्यान होणार आहे.नचिकेत हा छउ शिबिरात सहभागी होणारा जैन स्पोर्ट्स अकादमीचा चौथा खेळाडू आहे. या निवडीसाठी जैन स्पोर्टस अकादमीचे संचालक अतुल जैन, क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल, मुश्ताक अली, तन्वीर अहमद,…
उरुळीकंचन ः प्रतिनिधी मॅगेसेस ,पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ मणीभाई देसाई यांनी ग्रामीण भागात ग्रामीणविकास,दुग्धोपादन,कृषी संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य केले.डॉ.मणीभाई राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले होते.ते महान क्रतिविर ,जहाल मतवदी होते मात्र महात्मा गांधीजींच्या भेटीमुळे गांधीवादी बनले.विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कार्य करुन मूळचे गुजरातरत्न डॉ मणीभाई महाराष्ट्र रत्न बनले.पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई म्हणजे गीतेतील ज्ञानयोग,भक्तियोग व निष्काम कर्मयोगाचे जातिवंत उदाहरण होते,असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. अखेरचे गांधीजींचे शिष्य डॉ.मणीभाई देसाई ह्यांच्या एकशे दोनव्या जयंती निमित्ताने येथे डॉ मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नीत दिल्लीवतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.मणीभार्इंच्या प्रतिमेला पुष्पहार…
मेष : आज तुमच्या कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत तुमची भूमिका स्पष्ट ठेवा. आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेश प्रवास आणि परदेशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्हाला उच्च शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचे असेल तर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी यश मिळेल. आज ९०% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी सर्वांशी नम्रपणे बोला. राजकारणातील संपर्क क्षेत्र व्यापक असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्यांसह तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि आरामदायक…
जळगाव : प्रतिनिधी मुलगी पाहण्यासाठी जात असताना अचानक महिलेचा भरधाव ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. मिळालेली अशी की, रावेर तालुक्यातील रेंभोटा येथे राहणाऱ्या कविता मुकेश कोळी (वय-३०) या पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. गावातच त्यांचा भाचा अजय सोनवणे राहतो. त्यांच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी अजय आणि त्याची मामी कवीता कोळी ह्या एकाच दुचाकीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे जाण्यासाठी निघाले. जळगाव शहराच्या पुढे द्वारका नगराजवळ राष्ट्रीय महामार्गावरून गुरूवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता जात असतांना मागून येणारा ट्रक (एमएच २९ एम ०१४४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत कविता कोळी…
जळगाव ः प्रतिनिधी चाळीसगाव येथे ॲड. सुभाष खैरनार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जळगाव जिल्हा वकील संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. ॲड. खैरनार यांना रुग्णालयात दाखल केले आहे. किसन सांगळे विरुद्ध पोलिसांत कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. गुरुवारी अर्धा दिवस न्यायालय बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी ॲड. दिलीप बोरसे, ॲड.प्रभाकर पाटील, ॲड.शरद न्हायदेे, ॲड. प्रकाश पाटील, ॲड. भरत देशमुख, ॲड. दर्शन देशमुख, ॲड.केतन ढाके,ॲड.प्रवीण जंगले,…