जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद गावातील 200 बांधकाम मजुरांना बांधकाम कामगार विभागासह शिवसेनेच्या कामगार सेना व झिअम फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप साळी यांच्या प्रयत्नातून सुरक्षारक्षक किट असलेल्या पेट्यांचे वाटप करण्यात आले. भवानीनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप साळी, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, विनोद रंधे, गणेश चव्हाण, सय्यद बरकत अली, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा 43.2 अंशांवर होता. पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावत असताना मंगळवारपासून उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरणासह ही लाट कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात 26 एप्रिलपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव जिल्ह्यात विदर्भानंतर आता उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमान 45 अंशांवर जाईल अशी शक्यता आहे. याच काळात विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारपासून पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या उष्णतामानात वाढ होण्याची पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून सात वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे की, पिंप्री खु. येथील राकेश भाईदास बारेला (वय २०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ एप्रिल रोजी पिंप्री खुर्द येथून त्यांची बहीण मुंगळी भाईदास बारेला (वय ७) हिचे अज्ञात इसमाने अपहरण केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांनी शोधासाठी मध्यप्रदेशसह विविध भागात पथके रवाना केली आहेत.
मेष : मेष राशीच्या लोकांना आज काही कामात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन भागीदार व्यवसायात सामील होऊ शकतात. पैशाशी संबंधित काही बाबींमध्ये तणाव कमी होईल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातून काम करणार्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज ८५% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आज व्यावहारिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. दुधाशी संबंधित व्यवसाय करणार्यांना आज चांगला नफा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत जीवनाचा उत्तम अनुभव घेऊ…
जळगाव ः प्रतिनिधी आपल्यावर निस्वार्थी प्रेम फक्त आई-वडिलच करु शकतात, त्यांच्या प्रेमाचा नेहमी आदर करा, दर महिन्यातून एकदा तरी त्यांची भेट घ्या, त्यांच्याजवळ राहा, जन्मदात्यांचे आशिर्वाद घ्या, दुसऱ्या मोठ्या शहरात जाऊन वैद्यकीय सेवा देण्यापेक्षा जन्मभूमीतच वैद्यकीय सेवा द्या, तिथे जे स्पेशालिस्ट डॉॅक्टर्स नाहीत, त्याचे पुढे शिक्षण घ्या, हार्डवर्क करा आणि जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवतं यशस्वी व्हा असा कानमंत्र पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.तात्याराव लहाने यांनी दिला. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात काल आयोजित दिक्षांत सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांची विशेष उपस्थिती होती, याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे…
जळगाव ः प्रतिनिधी घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आपल्यासोबत आम्ही आहोत, अशा भावना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील 22 महिला व पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत 4 लाख 40 हजाराचे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील बोलत होते. दरम्यान, यातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ देण्यात यावे असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले. अजिंठा विश्रामगृहात या कार्यक्रमाचे…
जळगाव : प्रतिनिधी राज्यभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यपदी विष्णू गोकुळ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही नियुक्ती केली असून यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र विष्णू मोरे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. विष्णू मोरे हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष दीपक वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सावळे, धरणगाव तालुकाध्यक्ष महेंद्र चौधरी यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे यांच्या निवडीबद्दल लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील,…
जळगाव ः प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळ्याची तीव्रता जाणवता नामशेष होण्याऱ्या पक्षांना पाणी देऊन जीवनदान मिळावे या उद्देशाने बहीणाबाई उद्यान येथे पक्षांसाठी परळ व धान्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. पक्षांना उन्हाच्या तीव्रतेपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करून परळ द्वारा दाणापाण्याची सोय करावी या उद्देशाने संवेदनशील भावनेतून हा स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ नीलिमा सेठीया व अध्यक्ष मनिषा पाटील यांच्या हस्ते परळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी नेहा जगताप, किमया पाटील,नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, संजय साळुंखे, कविता पाटील, उल्का पाटे ,वैशाली शिरूडे, आशा मौर्य…
जळगाव : प्रतिनिधी विश्वविख्यात अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे साहेब यांचे मध्यप्रदेश मधील रावेरखेडी येथे भव्य स्मारक (समाधी) तसेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे भव्य पुतळा निर्माण करण्याचा निर्णय घेऊन पाठपुरावा करणारे राज्यसभेचे खा. विनय सहस्रबुद्धे यांची ब्रह्मदंड मासिकातर्फे संपादक अजय डोहोळे व अनघा डोहोळे यांनी सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.