जळगाव : प्रतिनिधी शहरातील २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून सतत अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे विविध कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’ अशी…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी असामान्य कार्यकर्तृत्व असणाऱ्यांचा सन्मान आज झाला, सर्व पुरस्कारार्थी इथं पर्यंत त्यांच्या दुर्दम्य इच्छा शक्तीमुळेच पोहचले आहे.समाजातील साकारात्म कार्य आणि ते कार्य करणारी माणसे समाजापर्यत पोहचली पाहिजे.आपलं काम जो पर्यंत समाजपर्यंत पोहचणार नाही तो पर्यंत समाज त्यात सहभागी होणार नाही.समाजकार्य आता आधुनिक पद्धतीनेच करण्याची वेळ आली आहे.समाजात सेवा भाव वाढला पाहिजे आणि अश्या काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली पाहिजे.रडण्याऐवजी लढण्याची प्रेरणा दिव्यांगांना दीपस्तंभच्या माध्यमातून दिली जात आहे हे उदाहरण सर्व समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सचिन खेडेकर यांनी केले राज्यस्तरीय दीपस्तंभ 2022 पुरस्काराचे वितरण रविवारी छत्रपती संभाजी राजे सभागृह जळगाव येथे झाले , त्यावेळी ते बोलत होते.…
जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब जळगाव, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, प्रभाकर पाटील हॉस्पिटल आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच पापणी पडणे याविषयी तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत मुक्तांगण येथील प्रभाकर पाटील हॉस्पिटल येथे 22, 23 व 24 एप्रिल रोजी झालेल्या शिविरात 55 डोळ्यांवर व 5 पापणी पडणे या विषयी मोफत शस्त्रक्रीया करण्यात आल्या. समारोप प्रसंगी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. दिपक आठवले, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी, प्रकल्प प्रमुख डॉ. तुषार फिरके,…
जळगाव : प्रतिनिधी कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, यांसारख्या राज्यात 9 ते 15 टक्क्यांपर्यत वीजेची तुट असतांना महावितरणने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे राज्यात ही तूट शुन्य टक्क्यापर्यंत म्हणजेच मागणी एवढा वीजपुरवठा करण्यात आला. त्यामुळे राज्यातील भारनियमन आटोक्यात आले असून महावितरणचे प्रभावी नियोजन यशस्वी होतांना दिसत आहे. परिणामत: मागील चार दिवसांत राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून वाढत्या तापमानात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील 10 प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी या संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसहकार गटाने 21 उमेदवार उभे केले आहेत या निवडणुकीच्या प्रचारार्थ काल नूतन मराठा कॉलेज जळगाव येथे प्रचार मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याला लोकसहकार गटाचे पॅनलप्रमुख मनोज पाटील सर गटाचे अध्यक्ष शामकांत भदाणे , जेष्ठ सदस्य सुनिल सूर्यवंशी ,सुभाष जाधव देशमुख यांनी मेळाव्याला संबोधित केले. त्यात मनोज पाटील सर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अहवाल छपाईत 14 लाखाची बचत केली , 218 रुपयात 3 लाखाचे विमा कवच करून दिले, सहामाही वर्गणीची तिमाही नुसार वर्गणीवर व्याज आकारणी , कर्जवाढ मर्यादा पहिले वर्षी 2 लाख दुसऱ्या वर्षी 2 लाख पगाराच्या टप्प्यानुसार केली ,…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2021-22 या वर्षात लागू करण्यात आली असून याच्या अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेट मुंबईच्या माध्यमातून जिल्ह्यातील गृम व आंबिया बहारासाठी फळपिकांसाठीची भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा फलदायी ठरत आहे. त्यात मृग बहारमध्ये लिंबू, पेरू, सिताफळ आणि मोसंबी या पिकांसाठी 77 लक्ष 70 हजार रूपये मंजूर होऊन थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली असून आंबिया बहारमध्ये केळी पिकासाठी कमी तापमानाच्या निकषाच्या अंतर्गत 127 कोटी तर जास्त तापमानासाठी 175 कोटी अशी एकूण 302 कोटी नुकसान भरपाई मंजूर होणार असल्याने ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तालुकानिहाय मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून, सहकार विभागातर्फे इलेक्शन ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ग.स. सोसायटीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष मतदान, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सोमवारी पार पडला. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, जिल्ह्यातील सर्व तालुका सहायक निबंधक कार्यालये, जिल्ह्यातील सर्व तालुका लेखापरीक्षक कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जनता बँक, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या या आस्थापनांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी प्रशिक्षण…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यातील 116 दुकानदारांनी वर्षभराच्या कालावधीत रेशन दुकान चालवण्यास इच्छुक नसल्याने स्वेच्छेने जिल्हा पुरवठा विभागाकडे राजीनामा दिला आहे. रेशन दुकान चालवण्यासाठी कुणी व्यक्ती नसणे, प्रकृती ठीक नसणे, स्वेच्छेने तसेच कंटाळूनही दुकानदारांनी रेशन दुकानाचा राजीनामा दिला असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. रेशन धान्य वाटप ऑनलाइन होत आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा उमटवल्यानंतर लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे बंधनकारक आहे. पूर्वीसारखा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करणे शक्य होत नाही. बहुतांश लाभार्थी जागरूक झालेले असल्याने धान्याचा लाभ सोडत नाहीत.त्यामुळे प्रतिक्विंटल दीडशे रुपये मार्जीनवर रेशन दुकानदारांना अवलंबून राहावे लागत आहे. रेशन दुकानदारांनी राजीनामा देण्यामागे ही सुद्धा कारणे आहेत. लाभार्थींना वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे रेकॉर्ड अद्ययावत…
जळगाव ः प्रतिनिधी युवासेनेतर्फे इंद्रप्रस्थ नगरात रविवारी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले. नोंदणीसाठी युवकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने व युवासेना सचिव दुर्गाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान 2022 वीर सावरकर सभागृह, इंद्रप्रस्थनगर येथे रविवारी शिवसैनिक महेश ठाकूर यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. उद्घाटन व युवासेना सदस्य कार्ड वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. युवासेना तरुणांना स्वाभिमानाने जगणे शिकवते. विविध समाजकार्य करण्यासाठी युवासेना अग्रेसर आहे. युवकांनी युवासेनेत सहभागी व्हावे असेही यावेळी विष्णू भंगाळे यांनी सांगितले. युवासेना…