जळगांव (प्रतिनिधी) जळगांव शहर महानगरपालिका येथे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सपना श्रीवास्तव यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सपना श्रीवास्तव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली व आगामी काळात संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, महिला व बाल विकास या क्षेत्रात संस्था विशेष उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. मा. आयुक्त यांनी संस्थेला भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका सपना श्रीवास्तव, सदस्य योगानंद कोळी, मौलाना आझाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख, सदस्य योगेश बाविस्कर, मौलाना आझाद संस्थेचे सदस्य अतुल चौधरी आदी उपस्थित होते.…
Author: Saimat
चोपडा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात कमालीची भूजल पातळी वाढण्याचा उच्चांक चोपडा तालुक्याने घेतला आहे.गेल्या काळात खालावलेली पाण्याची पातळी तालुक्यावासियांचे डोके दुखीचा प्रश्न निर्माण झालेला होता.त्यावर गांभीर्याने चाणक्य नीतीने दूरदूष्टी ठेवून माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे व कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंवर्धनाची कामे प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणात केल्याने भूजल पातळी वाढण्याचे श्रेय सोनवणे दाम्पत्यास जाते. जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाई समस्या गंभीर असल्याचे गांभीर्य ओळखून आपला मतदारसंघात पाणी समस्या सुटून परिसर सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठी त्यांनी दंड थोपटले होते.. भूजल अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी व भौगोलिक अभ्यास तज्ज्ञांच्या बैठकांवर बैठका लाऊन आवश्यक त्या ठिकाणी नियोजनबध्द आराखडा तयार करून जलसंवर्धनाची कामे…
भुसावळ : प्रतिनिधी या जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू चि शोधूनी पाहे, समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकाच्या अर्थ कथन करत संसारात जगतांना ज्यांनी मोह आणि आसक्ती टाकत भगवंतास शरण गेला त्यास संसारात सुख प्राप्त होते, असे उद्बोधन हभप दुर्गादास महाराज खिर्डीकर यांनी केले. भुसावळ येथील वेडीमाता मंदिराजवळील आराधना कॉलनीतील स्व.सदाशिव एकनाथ सावकारे यांच्या वर्षश्राध्दनिमित्त किर्तनात केले. हभप दुर्गादास महाराज यांनी उद्बोधनात एकनाथ महाराजांच्या अभंगाचा आधार घेत जन्म-मृत्यूबाबतच्या वास्तव्याबाबत उपस्थितांना अवगत केले. यावेळी श्राध्द कर्माचे महत्त्व उदाहरण देवून पटवून देतांना ते म्हणाले की, जन्म-मृत्यूचा फेरा अटळ आहे. जुना देह गळून पडतो तेव्हा आत्मा नविन देह धारण करतो त्याला…
जळगाव : प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आंतरजिल्हा स्क्वॅश स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॅश कोर्टवर आज सकाळपासून सुरु झाली. ही स्पर्धा खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने 8 ते 11 मे दरम्यान होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 ते 25 जिल्ह्यांचा सहभाग अपेक्षित असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातून 20 ते 25 खेळाडू सहभागी होत आहेत.स्पर्धेसाठी 12 पंच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.खेळाडूंची निवास व्यवस्था केली आहे.जिल्ह्यात या स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्या तरी महाराष्ट्रातून 600 खेळाडू सहभागी होत आहेत. अशा होतील स्पर्धा‘अ’ गट : सब ज्युनियर 11/13/15/17 वर्षांआतील…
जळगाव : प्रतिनिधी सध्या राज्यात भोंगे विरुध्द हनुमान चालीसा असे वातावरण तापले असल्याने पोलीस अधिकाऱ्यांना सतर्कतेसाठी सुट्या नाकारण्यात आल्या आहेत.अशात पोलीस अधिकाऱ्यांच्या सुकन्येने आय.ए.एस. क्लासेसचा शोध घेत त्यात प्रवेश घेवून वडिलांना कुठलाही त्रास होवू नये याची काळजी घेत एकप्रकारे वडिलांच्या कर्तव्यात सहभाग घेतला आहे. दरम्यान, श्रुती शिंदे ही काल रात्री राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाली. त्यावेळी वेळात वेळ काढून वडील पो.नि. विजय शिंदे यांनी जळगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचून श्रुतीला शुभेच्छा दिल्या. राज्यात राजकीय वातावरण तापले असल्याने पोलीस खात्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सुट्या शासनाने रद्द केल्या आहेत. त्यातल्या त्यात अधिकाऱ्यांना तर अजिबात सुटी नाही व कर्तव्यावर सतर्कतेसाठी सतत अलर्ट राहावे लागते.…
जळगाव : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये बोगस बियाणे आणि खतांचे प्रमाण वाढले असून याला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजीत खरीप पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी ना. पाटील यांनी शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया आणि किटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. एक गाव – एक वाणच्या अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. रासायनिक खतांच्या संतुलीत वापरासाठी ठिबक सिंचनातून खत देणे, माती…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे काम प्रगतीपथावर आहे हे उड्डाण पूलाच्या मध्यभागी सम्यक बुद्ध विहार येत आहे. त्यामुळे तेथील औटा कदाचित पुढील काळात तोडण्यात येऊ शकतो यासाठी महापौर महाजन हे पाहणी करण्यासाठी आले असता. परिसरातील नागरिकांनी विनंती केली आहे कि जर हा औटा तोडला तर पुन्हा ते बनवून द्यावा यावेळी महापौर महाजन यांनीही नागरिकांना आश्व्सत केले आहे. दि.5 मे रोजी इंद्रप्रस्थ नगर येथील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे कामाचे निरीक्षणं करण्यासाठी महानगरपालिका कर्मचारी व रेल्वे अधिकारी यांच्यातर्फे निरीक्षण करण्यात आले होते. या प्रसंगी जो…
जळगाव ः प्रतिनिधी शांतता, मैत्री, प्रेम आणि संवाद यावर विश्वास असणाऱ्या लेखक, कवी,कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून महाराष्ट्र दिनी शांततेच्या मार्गाने पांढरे कपडे परिधान करून वा पांढरे निशाण दाखवून प्रेम व शांततेच आवाहन केले.अशा प्रकारचे अभिनव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. छत्रपती शिवराय यांचा महाराष्ट्र धर्म हा असाच सर्वसमावेशक व प्रेमाचा होता.याच शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमून सगळ्यांनी शांतता व प्रेमाचे आवाहन केले.या देशावर प्रेम करणारे देशभक्त नागरिक म्हणून या देशातील प्रत्येक नागरिक हा आमचा देशबंधु आहे .त्या प्रत्येक बांधवा सोबत प्रेमाचे नात निर्माण व विश्वास निर्माण करणारी प्रतिकात्मक कृती काल राज्यभर करण्यात आली . जळगावातही…
जळगाव : प्रतिनिधी कोकण प्रादेशिक विभागाच्या वीजबिल वसुलीत मार्चनंतर पुन्हा शिथिलता आली आहे. परिणामी एप्रिल महिन्याचे चालू वीजबिलही पूर्णपणे वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे महिन्याच्या एक तारखेपासूनच चालू वीजबिल आणि थकबाकी वसुलीच्या कामाला गती देऊन महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत भांडूप परिमंडल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (6 मे) आयोजित आढावा बैठकीत…
जळगाव ः येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी व त्यांच्या कार्यकारिणीने जुलै-जुन 2022 या रोटरी वर्षात दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. क्लबच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित चौथ्या शिबिरासह एकूण 200 पेक्षा अधिक व्यक्तींनी त्यात रक्तदान करुन सहभाग घेतला. गेल्या दीड-दोन वर्षातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन लांबलेल्या शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, अनलॉकनंतरचे वाढते अपघात, मे महिन्यातील सुट्ट्या, उन्हाळा यावेळी लागणारे रक्त उपलब्ध व्हावे म्हणून रोटरी वेस्टने रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट व जळगाव सायकलीस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या समवेत या शिबिरांचे आयोजन केल्याचे मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. आनंद दशपूत्रे यांनी सांगितले. रोटरी वेस्ट व…