Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाकण शाखेने कविता, काव्य, कादंबरी अशा तिन्ही प्रकारातील पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात जळगाव येथील कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या ‘धगधगते तळघण’ काव्यसंग्रहाला साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला. मसापच्या चाकण शाखेने जाहीर केलेल्या पुरस्कारांत काव्य प्रकारात अभिषेक नाशिककर (समांतर), सिराज करिम शिकिलकर (गझलचाँद), उषा हिंगोणेकर (धगधगते तळघर), रावसाहेब जाधव (गरगर मोळ्या : बालकाव्य), कथासंग्रहात दयाराम पाडलोस्कर (बवाळ), रश्‍मी गुजराथी (जाणीव : बालकथा संग्रह), कादंबरीत चकोर शहा (दोसतार), विशेष प्रकारात प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे (मराठी कविता : परंपरा आणि प्रवाह), स्थानिक साहित्य प्रोत्साहनपर ॲड. नाजिम गुलाब शेख (क्षमाशीलता) यांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे. रविवारी दुपारी 4…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राजस्थानी ब्राम्हण संघातर्फे शुक्रवारी सरदार पटेल लेवा भवनात 25 बटूंच्या सामूहीक उपनयन संस्काराचा कार्यक्रम झाला. बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड, शिवप्रसाद रामावत मुख्य यजमान होते. कार्यक्रमाचे पौरोहित्य पंडीत गोपाल तिवारी यांनी केले. त्यांना मनसुख तिवारी यांनी सहकार्य केले. 300 समाजबांधवांनी उपस्थित राहून बटूंना आशिर्वाद दिले. बहुभाषिक ब्राम्हण संघाचे अजितदादा नांदेडकर, श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, अशोक वाघ, राजेश नाईक, मोहन तिवारी उपस्थित होते. राजेंद्र जोशी यांनी रेखाटलेल्या रांगोळीचे विशेष वैशिष्ट्‌य ठरले. संजय व्यास, शिवप्रसाद शर्मा, महेंद्र पुरोहित, किशन अबोटी, दीपक जोशी, महावीर पचारिया, चंदन जोशी, रवी पांडे, दिलीप सिखवाल, प्रकाश जोशी यांनी नियोजन केले.

Read More

जामनेर : प्रतिनिधी दोन कापूस व्यापार्‍यांमध्ये जुन्या बोदवड रोडसह भुसावळ रोडवर पोलिस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, जामनेर व भुसावळ येथील दोन कापूस व्यापार्‍यांमध्ये जुन्या बोदवड रोडसह भुसावळ रोडवर पोलिस ठाण्यासमोर वाद झाले. यता दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी पोलिस ठाण्यापासून नगरपालिका चौकापर्यंत हाणामारी करणार्‍यांसह समर्थकांवर लाठीमार करून जमाव पांगवला. दरम्यान, हा गोंधळ पाहून सराफ बाजारातील व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद केली होती. या प्रकरणी पोलिसांनी वादातील प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरा याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होता. तर, शहरात शांतताच आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. शहराची शांतता भंग करणार्‍यांवर पोलिस…

Read More

मेष राशीच्या लोकांची प्रतिभा जागृत होऊन तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नती किंवा संबंधित बोलणी आज होतील. आज मुलांकडून प्रशंसनीय काम होईल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा. आज तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल. तुमच्याकडे नवीन संपादने असू शकतात ज्यामुळे तुमची जीवनशैली…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी शहरातील मंडळाधिकारी यांनी एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला फोनद्वारे धमकी देवून ५० हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंडळाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यावल तालुक्यातील फैजपूर येथील मंडळाधिकारी हनीफ तडवी हे काम पाहतात. गावातील माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू मुरलीधर राणे बुधवार ४ मे रोजी रात्री १० वाजता मंडळाधिकारी हनीफ तडवी यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला व सांगितले की, तुमच्या डंपरने माझ्या गाडीला उडविले आहे. तुम्ही मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्‍न केला आहे. तुम्ही मला ५० हजार रूपये द्या नाहीतर मी तुमच्या विरूध्द खोटी कसे दाखल करतो असे सांगून तुला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचललेल्या भोंग्यांच्या मुद्द्यांवरून जळगावात युवासेना महानगरतर्फे उपहासात्मक असे “भोंगा बजाओ, महंगाई भगाओ” आंदोलन पुष्पलता बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपावर करण्यात आले. यात राज ठाकरे यांच्यासह राणा दांपत्य आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. तसेच वाढलेल्या महागाईवरून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा अधिकारी शिवराज पाटील, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरीता माळी कोल्हे, शहर प्रमुख ज्योती शिवदे, युवासेना महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पियुष गांधी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रितम शिंदे, भुषण सोनवणे, उमाकांत जाधव, यश सपकाळे, जय मेहेता, अमोल दहाड, गिरीष सपकाळे, अमोल मोरे, अभिजित रंधे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादाच्या कारणावरून तरूणाला काठीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी केंद्राजवळ पवन यशवंत पाटील (वय-३७) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ५ मे रोजी रात्री १ वाजता पवन हा घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून बाळा सोनवणे आणि भुषण शिंदे आणि सोबत अनोळखी दोन जणांनी पवन याला शिवीगाळ करून काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पवन याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाळा सोनवणे आणि भुषण…

Read More

मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता याचं पाहुण्याचा आज नामकरण सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली बोरुडे यांना नुकतेच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. याचं चिमुकल्याचा राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा साजरा झाला आहे. यावेळेस राज ठाकरे यांनी नातवाचे किआन असे नाव ठेवले व प्रभोधनकारांची ५ वी पिढी सुरु झाली असेही ठाकरे यावेळेस बोलले. ५ एप्रिलला नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करतं माहिती दिली होती. अमित ठाकरे…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कंटेनर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चेंदामेंदा झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. ॲपे रिक्षा प्रवाशांना घेऊन झगडे फाट्यावरून कोपरगाव कडे जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वरांना देखील चिरडले आहे ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. या रिक्षात एकूण बारा जण बसले होते. अपघातानंतर रिक्षाचा चेंदामेंदा झाला होता, रिक्षात बसलेल्या प्रवाशांचं सामान आणि विद्यार्थ्यांची…

Read More