Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात तक्रारी वाढल्या आहेत. मेहरुण परिसरात सोमवारी झालेल्या पाणीपुरवठा दरम्यान नागरिकांच्या घरात अशुद्ध व पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाणी साठवलेल्या भांड्याच्या तळाशी गाळ आणि हिरव्या रंगाचे शेवाळ जमा झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये मेहरूणमधील मराठी शाळा परिसरात सोमवारी सकाळी पाणीपुरवठा करण्यात आला होता. आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याची तयारी केली परंतु सुरुवातीला बराच वेळ पिवळ्या रंगाचे पाणी आल्याने भरण्यात आले नव्हते. त्यानंतर नागरिकांनी पाण्याचा साठा केला पण दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाणी साठवलेल्या भांड्यांची पाहणी केली असता बऱ्याच घरांमध्ये भांड्याच्या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंगळवारी अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवसापर्यंत 2161 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. अजूनही पहिल्या लॉटरीतील 779 जागा रिक्त आहे. शिक्षण विभागातर्फे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून लॉटरी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळवण्यात आली होती. आरटीई 25 टक्केची ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर मार्च महिना अखेरीस पहिली सोडत ऑनलाइन स्वरूपात पार पडली. यात 2940 विद्यार्थ्यांचे निवड झाली असून 2399 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना सुरूवातीला 20 एप्रिलपर्यंत व नंतर 29 एप्रिलपर्यंत शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष…

Read More

मुंबई / जळगाव ः प्रतिनिधी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळासाठी चालू वर्षी म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 250 कोटी रूपयांच्या ठोक तरतुदीचीही मागणी केली होती.त्यानुसार मागणीपैकी 40 कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून उर्वरित अनुदान हे पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. तसेच मागील डिसेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यासाठी ठोक तरतूद (न्यायालयीन प्रकरणे ) अंतर्गत मंजूर तरतूदची 250 कोटी रूपयांची रक्कम शासनाने विभागाला वितरीत केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तापी पाटबंधारे विकास…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सुशिक्षित मुलीने समाजाचा पारंपारिक शिवणकाम व्यवसाय असलेल्या मुलाशी लग्न करून समाजात एक आदर्श घडवला आणि मुलगा सुद्धा उच्चशिक्षित असून नोकरी न करता टेलरिंग या व्यवसायाला प्राधान्य दिले. यावेळी मुलीच्या पालकांचे व मुलीचे कौतुक करण्यात आले अशीच प्रगल्भता जर प्रत्येक पालकांनी ठेवली तर निश्चितच समाजाला एक नवी दिशा मिळेल अशा शब्दात जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेन्द्र कुमार सोनवणे यांनी विवाहप्रसंगी शुभेच्छा दिल्या जळगाव शहरातील सुप्रसिद्ध अशा रिलायन्स टेलर्स या फर्मचे संचालक राजेंद्र एकनाथशेठ सोनवणे यांचा मुलगा चि. हर्षल व करमुळ पोहरे ता. चाळीसगाव येथील मनोहर नथूशेठ निकुंभ यांची कन्या चि.सौ.का.लक्ष्मी यांचा आदर्श विवाह 10 मे रोजी यश…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोळसा टंचाईचे संकट व उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची वाढती मागणी कायम असताना महावितरणने गेल्या 19 दिवसांपासून राज्यात कोणत्याही वाहिनीवर विजेचे भारनियमन केले नाही. भारनियमन टाळण्यासाठी तासागणिक सुरू असलेल्या यशस्वी नियोजनाद्वारे ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचा सुखद दिलासा दिला आहे. याऊलट देशात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आदींसह आठ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन सुरु असल्याची स्थिती कायम आहे. दरम्यान, काल मंगळवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास राज्यात एकूण 26 हजार 700 मेगावॅट विजेची मागणी होती. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यामधील महावितरणच्या कार्यक्षेत्रात 23 हजार 400 मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानुसार महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला आहे. तसेच गेल्या दि. 21 एप्रिलपासून राज्यात कोणत्याही भागातील वीजवाहिनीवर…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार (एमओसीए) आणि फिक्की द्वारे आयोजित विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि अवार्डस्‌ समारंभात अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले आहे. एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी …बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर… या श्रेणीतील हा पुरस्कार हैदराबाद येथे आयोजित समरंभात अलीकडेच प्रदान करण्यात आला होता.

Read More

जळगाव : प्रतिनिधी रविवारी रात्री जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. सविस्तर माहीती अशी की, जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी रात्री कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कैदी सतीश गायकवाड व दशरथ महाजन या दोघांमध्ये रविवारी रात्री कैदी वॉर्डात झाल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वॉर्ड क्र. ९ मधील डॉक्टरांनी गोपनीय अहवाल वैद्यकीय अधिष्ठातांना दिला. यात रुग्णालयाच्या वॉर्डात येणारे कैदी पोलिसांच्या उपस्थितीत दारू प्राशन करून धुमाकूळ घालतात असे नमूद करण्यात आले होते. या कृत्यांमुळे जिल्हा रुग्णालयातील शेजारच्या वॉर्डात दहशत पसरली असून, रुग्णांनाा त्रास…

Read More

मेष: मेष राशीच्या लोकांची लोकप्रियता शिखरावर असेल आणि तुम्ही इतरांवर खूप प्रभाव पाडण्याचा प्रयत्न कराल. अधिकार्‍यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. तुमचे कौटुंबिक जीवन खूप शांत आणि आनंदी असेल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज योजना पूर्णत: अंमलात आणता येतील आणि त्या तुम्हाला फायदेशीर परिणाम देऊ शकतील. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिकदृष्ट्या…

Read More

मुंबई :- प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र स्वबळावर निवडणूक, युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने  एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रिपणे निवडणुका लढवायच्या की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी आपले मत मांडले आहे. या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की, प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, आपण सरकार एकत्र चालवतो. त्यामुळे या निवडणुकीसाठीही आघाडी करावी. मात्र या संदर्भात…

Read More

भुसावळ- प्रतिनिधी  पोलीस विभागात उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन पोलीस दलात गुणवत्तापूर्वक सेवा देणाऱ्या आणि विशेष कार्य केलेल्या भुसावळ उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण यांना नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह दोघांनाही प्रदान करण्यात आले आपल्या कार्यकाळात कोणत्याही स्वरूपाची चूक न करता अचूक पणे कार्य करत राहणे आपल्या कार्याचा ठसा उमटविलाआपलं कार्य गुणवत्तापूर्वक कसे राहील याचं पालन करून विशेष कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केले जात असते नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण यांनी पोलीस खात्यात असतानाही आपल्या कार्य…

Read More