जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात परिवारासह राहणारी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिरसोली येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह रहिवासाला आहे. १ मे रोजी रात्री ८ वाजता मुलगी ही घरी असतांना गावात राहणारा मगन रामकृष्ण मोरे यांन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. असा संशय पिडीत मुलीच्या वडीलांनी केला आहे. नातेवाईक व इतर परिसरात मुलीचा शोधाशोध केली परंतू ती कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवार ५ मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जळगाव महानगर पक्ष कार्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त आज सकाळी 10 वाजता 100 सेकंद मौन पाळण्यात आले व कृतज्ञता दिनानिमित्त लोकनेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ पाटील , सेवादेलचे जिल्हा अध्यक्ष वाय. एस . महाजन, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील , मिनाक्षीताई चव्हाण , युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी , जिल्हा महानगर सरचिटणीस दिलीपभाऊ महेश्वरी , सुनीलभाऊ माळी, ॲड. राजेश भाई गोयर, उपअध्यक्ष अकीलभाई पटेल, ॲड. ज्ञानेश्वर बोरसे ,…
जळगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या सुनसगाव शिवारातील शक्ती पेपर मिलला आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. सविस्तर वृत्त असे की, सुनासगाव शिवारातील शक्ती पेपेर मिल ही चुडामण सरोदे व शशिकांत वाघूळदे यांच्या मालकीची कंपनी आहे.या मिलला सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यांनतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलास ११.४५ मिनिटांनी फोनद्वारे कळविण्यात आले असता अग्निशमन दलाचे बंब तत्काळ रवाना झालेत. यावेळी वाहन चालक वसंत न्हावी, भरत बारी, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांच्या पथकाने 2 बंब वापरून ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी समोर असलेल्या सुदर्शन पेपर मिलमधून…
यावल :प्रतिनिधी शहरातील २१ वर्षीय तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली आहे. हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा आरोप जखमी तरूणाच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील काजीपुरा भागात राहणारा जावेद युनूस पटेल (वय-२१) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे व एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे समजते. दरम्यान, फैजपूर येथील अनोळखी तीन जण गुरूवार ५ मे रोजी रात्री १० वाजता जावेद याला भेटण्यासाठी आले होते. जावेद यास गोड- गोड बोलून दुचाकीवर बसवून भुसावळ रोडवरील पीर बाबा दर्गाजवळ घेऊन गेले. तेथे जाऊन त्या तिघांनी…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील इच्छापूर्ती मंदिराजवळील एका हॉटेलच्या पाठीमागे अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती नाशिकच्या पथकाला मिळाली होती. यावरून रात्री १ वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सव्वा लाख रोकडसह एकूण ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. व १२ जणांना ताब्यात घेत १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी एका विशेष पथकाची निवड केली. त्याअनुषंगाने सदर पथक पेट्रोलिंग करत असताना पो.नि बापू रोहम यांना गुप्तहेरांकडून चाळीसगाव तालुक्यातील करगाव रोडवरील इच्छापूर्ती मंदिराजवळील रूबाबदार हॉटेलच्या पाठीमागे…
फैजपूर ता यावल: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार कारवाई करणे बाबत फैजपूर येथील सुमंगल लान्स येथे शांतता समिती बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत मंदिर, मशिदसह इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या स्पीकर परवाना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार कारवाई करणे बाबत मार्गदर्शन व कायदा सुव्यवस्था अंमल बजावणी, मंदिर, मशिद सह इतर धार्मिक स्थळ धर्मगुरू विश्वस्त यांना आपल्या धार्मिक स्थळावरील लाऊस स्पीकर भोंगे आदी विषयी सविस्तर माहिती देऊन कायद्याचे प्रथम पालन करून आपली धार्मिक सद्भावना जपावी व शहरात शांतता कायम प्रस्तापित रहावी याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी…
भडगाव : प्रतीनिधी कोविडच्या संक्रमनामुळे तब्बल दोन वर्षांपासून गावात कुस्त्यांचे आयोजन न झाल्यामुळे दोन वर्षे कुस्ती शौकिणांचा मोठा हिरमोड झाला होता मात्र तब्बल दोन वर्षानंतर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. तालुकयातील कजगाव येथे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली होती. विविध गावातील मल्लानि व कुस्त्या शौकिनांनी आनंद घेतला. यावेळी विविध मल्लांनि चित्तथराक डावपेजाने कुस्ती शौकिणांचा चांगलाच उत्साह वाढवला होता. यावेळी आखाडा पूजन भाजपचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे व माजी सैनिक समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमोल शिंदे, समाधान पाटील, अण्णा बोरसे, अश्रफ खाटीक, अक्षय मालचे, सुनील वाकोडे, पोपट सोनवणे, पंकज भालेराव, तात्या पहिलवान, दीपक…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथील सेवाभावी सामाजिक संस्था लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा शतकोत्तर स्मृतिदिन भादली स्टेशन परिसरातील त्यांच्या स्मृतिस्थळी छोटेखानी कार्यक्रमात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी यांनी बालकवी ठोंबरे यांच्या साहित्यिक कार्याबाबत उपस्थितांशी सुसंवाद साधला व बालकवींच्या कार्याबाबत स्वरचित पोवाडा सादर केला. यावेळी भादली रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक आर. मीना, रफिक खान, भाजपा युवा मोर्चा सोशल मीडियाचे भूषण जाधव, संस्थेचे सचिव संदीप जोशी, जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुळकर्णी, चित्रकार योगेश सुतार यांच्यासह अनेक साहित्य प्रेमींची उपस्थिती होती. श्रावण मासी हर्ष मानसी, आनंदी आनंद गडे, फुलराणी, औदुंबर अशा कविता अभ्यासून…
जळगाव ः प्रतिनिधी गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी 3030 यांच्या संयुक्त वतीने गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयामध्ये सामाजिक बांधिलकी अंतर्गत पशुपक्षी, प्राणी यांना पाणी पिण्यासाठी परळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरीयन संजय शहा, (माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, संचालक प्रेमजी भवानजी जळगाव), डॉ. विजय पाटील (प्राचार्य गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग), महेश पाटील उपस्थित होते. उपस्थितांना संबोधतांना डॉ. प्रशांत वारके यांनी पाण्याचे महत्व पटवून दिले तसेच राज्यात सर्वत्र उष्णतेची प्रचंड लाट आली आहे आणि यामुळे मानवाची तसेच पशुपक्षी, प्राण्यांची जीवाची लाही होत आहे. जसे…