Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी रविवारी रात्री जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. सविस्तर माहीती अशी की, जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी रात्री कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कैदी सतीश गायकवाड व दशरथ महाजन या दोघांमध्ये रविवारी रात्री कैदी वॉर्डात झाल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वॉर्ड क्र. ९ मधील डॉक्टरांनी गोपनीय अहवाल वैद्यकीय अधिष्ठातांना दिला. यात रुग्णालयाच्या वॉर्डात येणारे कैदी पोलिसांच्या उपस्थितीत दारू प्राशन करून धुमाकूळ घालतात असे नमूद करण्यात आले होते. या कृत्यांमुळे जिल्हा रुग्णालयातील शेजारच्या वॉर्डात दहशत पसरली असून, रुग्णांनाा त्रास…

Read More

मेष: मेष राशीच्या लोकांची लोकप्रियता शिखरावर असेल आणि तुम्ही इतरांवर खूप प्रभाव पाडण्याचा प्रयत्न कराल. अधिकार्‍यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. तुमचे कौटुंबिक जीवन खूप शांत आणि आनंदी असेल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज योजना पूर्णत: अंमलात आणता येतील आणि त्या तुम्हाला फायदेशीर परिणाम देऊ शकतील. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिकदृष्ट्या…

Read More

मुंबई :- प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र स्वबळावर निवडणूक, युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने  एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रिपणे निवडणुका लढवायच्या की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी आपले मत मांडले आहे. या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की, प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, आपण सरकार एकत्र चालवतो. त्यामुळे या निवडणुकीसाठीही आघाडी करावी. मात्र या संदर्भात…

Read More

भुसावळ- प्रतिनिधी  पोलीस विभागात उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन पोलीस दलात गुणवत्तापूर्वक सेवा देणाऱ्या आणि विशेष कार्य केलेल्या भुसावळ उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण यांना नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह दोघांनाही प्रदान करण्यात आले आपल्या कार्यकाळात कोणत्याही स्वरूपाची चूक न करता अचूक पणे कार्य करत राहणे आपल्या कार्याचा ठसा उमटविलाआपलं कार्य गुणवत्तापूर्वक कसे राहील याचं पालन करून विशेष कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केले जात असते नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण यांनी पोलीस खात्यात असतानाही आपल्या कार्य…

Read More

जळगांव (प्रतिनिधी) जळगांव शहर  महानगरपालिका येथे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सपना श्रीवास्तव यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सपना श्रीवास्तव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली व आगामी काळात संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, महिला व बाल विकास या क्षेत्रात संस्था विशेष उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. मा. आयुक्त यांनी संस्थेला भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका सपना श्रीवास्तव, सदस्य योगानंद कोळी, मौलाना आझाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख, सदस्य योगेश बाविस्कर, मौलाना आझाद संस्थेचे सदस्य अतुल चौधरी आदी उपस्थित होते.…

Read More

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात कमालीची भूजल पातळी वाढण्याचा उच्चांक चोपडा तालुक्याने घेतला आहे.गेल्या काळात खालावलेली पाण्याची पातळी तालुक्यावासियांचे डोके दुखीचा प्रश्न निर्माण झालेला होता.त्यावर गांभीर्याने चाणक्य नीतीने दूरदूष्टी  ठेवून माजी  आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे व कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंवर्धनाची कामे प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणात केल्याने भूजल पातळी वाढण्याचे श्रेय सोनवणे दाम्पत्यास जाते. जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाई समस्या गंभीर असल्याचे गांभीर्य ओळखून आपला मतदारसंघात पाणी समस्या सुटून परिसर सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठी त्यांनी  दंड थोपटले होते.. भूजल अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी व भौगोलिक अभ्यास तज्ज्ञांच्या बैठकांवर बैठका लाऊन आवश्यक त्या ठिकाणी नियोजनबध्द आराखडा तयार करून जलसंवर्धनाची कामे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी या जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू चि शोधूनी पाहे, समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकाच्या अर्थ कथन करत संसारात जगतांना ज्यांनी मोह आणि आसक्ती टाकत भगवंतास शरण गेला त्यास संसारात सुख प्राप्त होते, असे उद्बोधन हभप दुर्गादास महाराज खिर्डीकर यांनी केले. भुसावळ येथील वेडीमाता मंदिराजवळील आराधना कॉलनीतील स्व.सदाशिव एकनाथ सावकारे यांच्या वर्षश्राध्दनिमित्त किर्तनात केले. हभप दुर्गादास महाराज यांनी उद्बोधनात एकनाथ महाराजांच्या अभंगाचा आधार घेत जन्म-मृत्यूबाबतच्या वास्तव्याबाबत उपस्थितांना अवगत केले. यावेळी श्राध्द कर्माचे महत्त्व उदाहरण देवून पटवून देतांना ते म्हणाले की, जन्म-मृत्यूचा फेरा अटळ आहे. जुना देह गळून पडतो तेव्हा आत्मा नविन देह धारण करतो त्याला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आंतरजिल्हा स्क्वॅश स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॅश कोर्टवर आज सकाळपासून सुरु झाली. ही स्पर्धा खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने 8 ते 11 मे दरम्यान होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 ते 25 जिल्ह्यांचा सहभाग अपेक्षित असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातून 20 ते 25 खेळाडू सहभागी होत आहेत.स्पर्धेसाठी 12 पंच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.खेळाडूंची निवास व्यवस्था केली आहे.जिल्ह्यात या स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्या तरी महाराष्ट्रातून 600 खेळाडू सहभागी होत आहेत. अशा होतील स्पर्धा‘अ’ गट : सब ज्युनियर 11/13/15/17 वर्षांआतील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सध्या राज्यात भोंगे विरुध्द हनुमान चालीसा असे वातावरण तापले असल्याने पोलीस अधिकाऱ्यांना सतर्कतेसाठी सुट्या नाकारण्यात आल्या आहेत.अशात पोलीस अधिकाऱ्यांच्या सुकन्येने आय.ए.एस. क्लासेसचा शोध घेत त्यात प्रवेश घेवून वडिलांना कुठलाही त्रास होवू नये याची काळजी घेत एकप्रकारे वडिलांच्या कर्तव्यात सहभाग घेतला आहे. दरम्यान, श्रुती शिंदे ही काल रात्री राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाली. त्यावेळी वेळात वेळ काढून वडील पो.नि. विजय शिंदे यांनी जळगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचून श्रुतीला शुभेच्छा दिल्या. राज्यात राजकीय वातावरण तापले असल्याने पोलीस खात्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सुट्या शासनाने रद्द केल्या आहेत. त्यातल्या त्यात अधिकाऱ्यांना तर अजिबात सुटी नाही व कर्तव्यावर सतर्कतेसाठी सतत अलर्ट राहावे लागते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये बोगस बियाणे आणि खतांचे प्रमाण वाढले असून याला आळा घालण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजीत खरीप पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी ना. पाटील यांनी शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया आणि किटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. एक गाव – एक वाणच्या अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. रासायनिक खतांच्या संतुलीत वापरासाठी ठिबक सिंचनातून खत देणे, माती…

Read More