जळगाव ः प्रतिनिधी गिरणा धरण यंदा पावसाळ्यात 100 टक्के भरले होते. त्यातून जिल्ह्यासाठी पाच आवर्तन राखीव करण्यात आले आहेत. यापैकी चौथे आवर्तन मंगळवारी जळगाव शहरानजीकच्या बांभोरी नदीपात्रात पोहोचले. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात जिल्ह्यातील दोन पालिका क्षेत्रासह अनेक गावांच्या पिण्याच्य पाण्याची सोय झाली आहे. पाचवे व शेवटचे आवर्तन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. गिरणा धरणातून जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाण्यातून 1500 क्यूसेसचे चौथे आवर्तन 1 मे रोजी सोडण्यात आले होते. ते चाळीसगाव, भडगाव, पाचोरा पालिका व पाचोरा एमआयडीसी, दहिगाव संतमार्गे काळनदा येथे दहा दिवसांत पोहचले. या पाण्याचा 150 किमी प्रवास झाला. या मार्गातील शंभरावर गावांची तहान…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी केसीईच्या पी. जी. महाविद्यालयात पी. जी. टेक्नॉलॉजीया स्पर्धा नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जे. एन. चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. जावेद खान, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. संदीप पाटील, डॉ. आर. एम. पाटील हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांतील सादरीकरण, व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ॲनिमेटेड पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी निमेटेड पॉवर पॉइंटद्वारे भाग घेतला. स्पर्धेसाठी महाविद्यालयातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना…
जळगाव ः प्रतिनिधी भादली खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत हिंमत पाटील-बोरसे यांची तर युवराज जानकीराम पाटील यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली. संचालक प्रवीण पाटील, भगवान पाटील, मधुकर पाटील, विनायक पाटील, प्रभाकर पाटील, उपेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, सजन भालेराव, मनोहर सोनवणे, आशाबाई पाटील, निर्मलाबाई पाटील उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील भादली बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हर्षल प्रकाश नारखेडे तर व्हाईस चेअरमनपदी जितेंद्र ओंकार नारखेडे यांची निवड करण्यात आली. निवडून आलेल्या संचालकांची बैठक 11 मे रोजी आयोजीत केली होती. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत विरकर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवड करण्यात आली. चेअरमनपदी हर्षल नारखेडे, व्हाईस चेअरमनपदी जितेंद्र नारखेडे यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक मनोहर महाजन, मिलिंद चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र अत्तरदे, प्रमोद चौधरी, विद्या कोल्हे, हेमलता नारखेडे, प्रकाश धनगर, संदीप सपकाळे, किरण रडे, सचिव गुणवंत पाटील उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान व आदर्श मातांचा त्यांच्या घरी जाऊन गौरव करण्यात आला. उपक्रमांची संकल्पना ही नवा विचार देणारी असल्याची भावना मान्यवरांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. रविवार व सोमवार असे दोन दिवस हा उपक्रम राबवण्यात आला. मातृसन्मान सोहळ्याची प्रेरणा पुस्तक भिशी ग्रुपला डाएटचे निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड, प्राथमिक विभागाचे निवृत्त शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्याकडून मिळाली. कार्यक्रमास दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, संयोजक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे, जगदीश महाजन, मनोहर खोंडे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे,…
जळगाव ः प्रतिनिधी शहरात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरूच आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने हा विषय गांभीर्याने घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मेहरूण परिसरातील सुप्रीम कॉलनी, तांबापुरा व शहरातील अनेक भागांत दूषित व गढूळ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. आयुक्तांनी पाणीपुरवठा अभियंता गोपाळ लुले यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत योग्य उपाययोजना करण्याची सूचना केली. राष्ट्रवादीचे सुनिल माळी, राजू मोरे, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, अमोल कोल्हे व कार्यकर्ते उपस्थित…
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या पंधरवड्यापासून उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या जळगावकरांसाठी मे महिन्यातील प्रत्येक दिवस उष्णतेची नवीन आव्हाने घेऊन येत आहे. काल बुधवारी जळगावात सकाळी 10.45 वाजताच तापमान तब्बल 40 अंशांवर पोहोचले होते. या वेळेत उष्ण वाऱ्यांचा वेगही ताशी 14 किलोमीटरवर असल्याने एरवी 12 ते 1 वाजेनंतर जाणवणारा उन्हाचा चटका 11 वाजेपूर्वीच हैराण करणारा ठरला. दुपारी 2 वाजता 45.2 तर रात्रीसुध्दा तापमान 30 अंशांवर होते. बंगालचा उपसागर व अंदमान बेटाजवळ समुद्रात असलेल्या असनी चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यातील उष्णतेच्या लाटेवर होत आहे. विदर्भ व खान्देशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. समुद्रातील वादळामुळे हवेतील बाष्प शोषले जात असल्याने उत्तर महाराष्ट्रात आर्द्रता घटली…
यावल : प्रतिनिधी अमळनेरहुन यावल येथे जात असताना चोपडा येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर इसमाचा दि ११ रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, यावल येथील अक्सा नगर कॉलनीत राहणारे वनपाल असलम खान अमळनेर चोपडा मार्गावर यावल येत असतांना त्यांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिषण अपघात झाला होता व त्यांना डोक्यास गंभीर दुखापत झाली होती त्यात जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतांना अडीच महीन्यापर्यंत त्यांनी मृत्युशी झुंज दिली. आज बुधवार, दिनांक ११ मे रोजी त्यांचे दुदैवी निधन झाले. रावेर, यावल, चोपडा या सातपुडा वनक्षेत्रात सेवेत कार्यरत असतांना आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे सर्वांना आपुलकीची व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (वय ३२, रा. नाथवाडा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली होती. मुकेश याचा अपघात नसून तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेली माहिती अशी की, शहरातील खाऊ गल्लीत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. त्यानंतर दाणाबाजातून बिरयानी व दारु घेतल्यानंतर तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर…
मेष : मेष राशीच्या लोकांना आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा प्रत्यक्षात देखील येऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. कौटुंबिक आनंद असेल आणि आज तुम्ही आनंदी असाल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चपळतेने भरलेला असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय असेल. विवाह किंवा मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. कामे पूर्ण झाल्यामुळे मनाला आनंद होईल. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा…