साईमत जळगाव प्रतिनिधी अमरावती जिल्हयाच्या चिखलदरा येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय साहसी शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गोपाळ पाटील या स्वयंसेवकाला आदर्श स्वयंसेवक साहसी क्रीडा राज्यस्तरीय शिबिरार्थी पुरस्कार प्राप्त झाला. चिखलदरा येथे झालेल्या साहसी शिबिराचा ३१ मार्च रोजी समारोप झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सात स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले होते. त्यामध्ये गोपाळ पाटील याला आदर्श स्वयंसेवक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. तो विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेचा विद्यार्थी आहे. विद्यापीठाच्या संघासोबत संघ प्रमुख म्हणून डॉ. दिनेश देवरे होते. या पुरस्काराबद्दल कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आणि रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी…
Author: Saimat
साईमत, रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाल येथून अवैध वाळुने भरलेले दोन ट्रॅक्टर सहस्त्रलिंग गावानजिक तहसीलदार बंडू कापसे आणि अप्पर तहसीलदार मयूर कळसे यांनी पकडले. त्यामुळे वाळु माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे तहसीलदार जेव्हाही फिल्डवर जातात. प्रत्येकवेळी कारवाई होते. परंतु नेहमी फिल्डवर राहणारे मंडळ अधिकारी, तलाठींचे मात्र दुर्लक्ष होत असते. दुसरीकडे तहसीलदार बंडू कापसे पाल येथे वनधन बघायला गेले आणि महसूलधन जप्त करून परतल्याने त्याची रावेर परिसरात एकच चर्चा होत आहे. तहसीलदार बंडू कापसे, अप्पर तहसीलदार मयूर कळसे जंगल सफारीसाठी पाल येथे सकाळी जात असतांना पालकडून अवैध वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टरे येतांना दिसली. ती ट्रॅक्टरे थांबविली असता त्यात…
साईमत येवला प्रतिनिधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुमारे १८८ कोटी रुपये निधीतून राजापूरसह ४२ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या पाणीपुरवठा योजनेची आज मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, येवला शहराध्यक्ष दीपक लोणारी, भागिनाथ पगारे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, विजय जेजुरकर, सुमित थोरात, गोटू मांजरे, पार्थ कासार, गणेश गवळी, यांच्यासह पदाधिकारी स्थानिक नागरिक उपस्थित होते. राजापूरसह परिसरातील टंचाई ग्रस्त ४२ गावांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून…
साईमत ओझर प्रतिनिधी (प्रविण चौरे) महाराष्ट्रात अग्रक्रमाने गणल्या जाणाऱ्या नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९२३ मध्ये झाली नाशिक मधील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये तिचा समावेश होतो नाशिक मधील काही अग्रणी संस्थांपैकी एक असलेली सेंट जॉर्ज हायस्कूलची स्थापना रेव्हरंड शिंदे यांनी १९०८ मध्ये सध्याच्या पेठे हायस्कूलच्या ठिकाणी केली होती, काही कारणांनी ती शाळा बंद पडल्यानंतर त्या जागेवर नाशिक एज्युकेशन सोसायटीने १९२३ मध्ये शाळा सुरू केली त्यावेळी लावलेल्या छोट्या वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले यात नानासाहेब अभ्यंकर यांच्यासह इतर अनेक सेवाभावी समर्पित शिक्षकांनी शहरातील रावबहादुर गुप्ते व एम आर गोडबोले यांच्यासारख्या प्रमुख नागरिकांच्या मदतीने नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. १०२ व्या वर्षात संस्थेतील नामवंत…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर व वॉशिंग सेंटरला रविवार १० मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे सामान आगीच्या भक्ष्यस्थानी येत जाळून नुकसान झाले. दरम्यान, महापालिकेच्या सात बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा (शिवधाम मंदीर, जळगाव) याचे विल्स फर्निचर दुकान आहे. याठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट, देऊळ, खुर्ची, कपाट आदी सामान बनविले जाते. त्यांच्याच बाजूला देवकिरण विलास पाटील (निवृत्ती नगर, जळगाव) यांचे कार वाशिंग सेंटर आहे. रविवार, दि. १० मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास फर्निचर दुकानाला अचानक आग लागली.…
साईमत जळगाव प्रतिनिधी मोदी आवास व शबरी आवास योजनेतर्गत ग्रा. पं. 150 घरकुल मंजूर केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. चोरगाव ते निभोरा या 4 किमीच्या रस्त्यावरील मोऱ्यासह लवकरच डांबरीकरण सुरु करणार आहे. परिसरातील चौफेर शेतीचे रस्ते मार्गी लावणार असून लोकसभा निवडणुकीनंतर चोरगावचे नामकारण करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चोरगावचे गावाचे नाव बदलविण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या मागणी नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी व्यासपीठावरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानुसार ग्रा.पं. तिने तत्काळ परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही दिल्या. ते चोरगाव येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. तालुक्यात सर्वात जास्त मोदी आवास योजनेतर्गत 110 व शबरी आवास…
साईमत जळगाव प्रतिनिधी आपल्याला थिएटर विचार देते, दृष्टी देते आणि आपले व्हिजन तयार करते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय थिएटर दिग्दर्शक आणि थिएटर ऑफ रेलेवंसचे डायरेक्टर मंजूल भारद्वाज यांनी केले. ते खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेत “रंगमंच मानवमुक्ती आणि राष्ट्र उभारणीसाठी कला” या विषयावर भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. व्यासपीठावर “लोकशास्त्र सावित्री” या नाटकाच्या कलाकार अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर आणि सायली पावसकर उपस्थित होत्या. प्रा.अनिलकुमार मार्थी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. भारव्दाज विद्यार्थ्यांशी बोलताना पुढे म्हणाले की, तुमच्या आयुष्यातुन कॉम्पिटिशनचे भूत आधी बाहेर काढून टाका. शिव आणि कलाकार यांचा संबध समजावून…
साईमत जळगाव प्रतिनिधी आजच्या डिजिटल युगात कामगार ही स्मार्ट व्हावा म्हणून कामगार विभाग राबवित असलेल्या योजना महत्वाच्या आहेत. या सर्व कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. कामगारांना काम करताना सुरक्षितता मिळावी म्हणून 10 हजार रुपये किमतीचे सुरक्षा व अत्यावाश्यक संचचे वाटप करण्यात येते. यामुळे अपघातापासून कामगारांचा बचाव होवून कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची मंडळामार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येऊन शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहचवा. प्रत्येक कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. वावडदा येथे रवी कापडणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी संच (भांडी) वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याने त्या संदर्भात एकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही…
साईमत जळगाव प्रतिनिधी महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्योग महत्वाचा असून महिलानी स्वत: सक्षम होऊन मोठे उद्योजक व्हावे असे आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी आवाहन महिलाना केले. महिलाना उद्योग उभारण्यासाठी बँकानी आर्थिक मदत करावी तसेच महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजार पेठ निर्माण व्हावी असेही त्या म्हणाल्या. महानगरपालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलता होत्या. प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अति आयुक्त पल्लवी भागवत , उपायुक्त निर्मला गायकवाड , सहाय्यक आयुक्त गणेश चाटे , सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड , शहर अभियान व्यवस्थापक…