१ एप्रिल ना.ए.सोसायटी १०२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
14
१ एप्रिल ना.ए.सोसायटी १०२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा-saimat

साईमत ओझर प्रतिनिधी (प्रविण चौरे)

महाराष्ट्रात अग्रक्रमाने गणल्या जाणाऱ्या नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९२३ मध्ये झाली नाशिक मधील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये तिचा समावेश होतो नाशिक मधील काही अग्रणी संस्थांपैकी एक असलेली सेंट जॉर्ज हायस्कूलची स्थापना रेव्हरंड शिंदे यांनी १९०८ मध्ये सध्याच्या पेठे हायस्कूलच्या ठिकाणी केली होती, काही कारणांनी ती शाळा बंद पडल्यानंतर त्या जागेवर नाशिक एज्युकेशन सोसायटीने १९२३ मध्ये शाळा सुरू केली त्यावेळी लावलेल्या छोट्या वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले यात नानासाहेब अभ्यंकर यांच्यासह इतर अनेक सेवाभावी समर्पित शिक्षकांनी शहरातील रावबहादुर गुप्ते व एम आर गोडबोले यांच्यासारख्या प्रमुख नागरिकांच्या मदतीने नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. १०२ व्या वर्षात संस्थेतील नामवंत ज्ञानवंत शिक्षकांनी लाखो आदर्शवत विद्यार्थी घडविले आहेत जे आज पोलीस, पत्रकारिता, वैद्यकीय, कला ,क्रीडा ,अभिनय ,शिक्षण, राजकीय ,सांस्कृतिक, सरकारी, यंत्रणेत ,परदेशात कार्यरत आहेत.

संस्थेच्या विविध शाळेतून उत्तम संस्कार घेऊन संस्थेच्या हजारो विद्यार्थी यांनी सन २०२०-२१ मध्ये आलेल्या जागतिक महामारी कोरोना च्या संकट काळात मोठ्या प्रमाणावर समाजाची सेवा करण्याचे उत्तम प्रकारे कार्य केले आहे याचा अभिमान वाटतो सरकारने पेशव्यांच्या ताब्यातील ऐतिहासिक जागा संस्थेला शाळेसाठी दिली त्यानंतर संस्थेने पेठे ज्वेलर्स या कुटुंबाच्या आर्थिक मदतीने त्यांचे प्रशस्त माध्यमिक विद्यालयात रूपांतर केले त्यानंतर १९४५ मध्ये त्या शाळेचे पेठे विद्यालय असेल नामकरण करण्यात आले यावेळी गो.रा. गोडबोले हे शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते तर वि.अ. गुप्ते संस्थेचे पहिले अध्यक्ष तसेच नानासाहेब कर्वे ,वां.के. खैरे यांनी संस्थेची धुरा सांभाळली नंतर संस्थेच्या आजी माजी विद्यार्थी हितचिंतक देणगीदार यांच्या माध्यमातून संस्थेचा विस्तार झाला.

सारडा कन्या विद्या मंदिर मुलींची शाळा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी ति.झ विद्यामंदिर (भगूर), नवीन इंग्रजी शाळा, सेठ.ध.सा. कोठारी मुलींची कन्या शाळा नाशिक रोड, माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको, अशिक्षित असलेल्या व शेतीची पार्श्वभूमी असलेल्या स्वर्गीय रंगुबाई जुन्नरे यांनी शाळेसाठी जागा दान केली त्यामुळे त्या शाळेला रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूल असे नाव देण्यात आले. सागरमल मोदी प्राथमिक शाळा सुरू केली.
नाशिकचा हळूहळू विस्तार होत गेला व अनेक नवीन उपनगरांमध्ये वसाहती झाल्या तेथील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेने शहरात आणखीन काही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पंचवटीतील मेरी परिसरात १९७९ मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीने पुन्हा नवीन शाळा सुरू केली.

ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांसाठी त्र्यंबकेश्वर जवळ वेळुंजे येथे आश्रम शाळा सुरू करण्यात आली. आज संस्थेच्या बालवाड्या आहेत पहिले पासून चौथीपर्यंत सेमी इंग्रजी भाषेत ज्ञान देणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत तर सिडको द्वारका मेरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारल्या आहेत.

बदलत्या काळानुसार संस्थेने संगणक शिक्षण व दूर शिक्षणात ही पदार्पण केले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मदतीने संस्थेने बी ए बी कॉम बीए पत्रकारिता हे अभ्यासक्रम सुरू केले आहे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाशी संलग्न स्टडी सेंटर ही संस्थेने सुरू केली आहे संस्थेच्या सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक लॅब सुरू करण्यात आले आहेत.
संस्थेकडून एडवेंचर क्लब ,नेचर क्लब आदी उपक्रम राबवले जातात यासाठी पद्मश्री भवरलाल जैन डॉक्टर माधवराव चितळे यांचे विशेष सहकार्य मिळाले संस्थेने जलसंधारण जलसाक्षरता व पाणी व्यवस्थापन या क्षेत्रातही मोठे काम केले आहे या कार्याबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला, आगामी वर्षापासून ज्युनिअर कॉलेज सुरू होणार आहे . जुन्नरे शाळेची भव्य इमारत होती असून विद्युत बिलाची बचत व्हावी म्हणून संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या प्रयत्नाने सोलर पॅनल बसविण्यात आले.

वेळुंजे येथील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व मुलांची सोयीसाठी संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर यांच्या प्रयत्नाने इंडियाबुल्स कंपनीच्या मदतीने सोलर पॅनल बसून विजेची बचत करण्यात आली इंग्रजी शाळेचे व आश्रम शाळेचे आत्तापर्यंत दहावीचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. नाशिक एज्युकेशन सोसायटी गेल्या १०२वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये २५००० विद्यार्थी शिकत असून त्यांना ५५० शिक्षक व ३५० सहाय्यक कर्मचारी कार्यरत आहेत संस्थेच्या आणखीन वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या व्यवस्थापन निवडीसाठी लोकशाही पॅटर्न या संस्थेत दहा वर्ष शिकवत असलेले शिक्षक आपोआप संस्थेचे सभासद बनतात व त्यातून पुढे संस्थेचे व्यवस्थापन मंडळ निवडले जाते एवढेच की शिक्षकेतर कर्मचारी याच पद्धतीने संस्थेचे सभासद होता.

हेमेद कोठारी फाउंडेशनच्या माध्यमातून इंग्रजी भाषेबाबत व विविध प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येते विविध देणगीदारांनी ठेवलेल्या ठेवीतून संस्थेतील शिक्षक कर्मचारी यांना पुरस्कार दिले जातात तर संस्थेचे आदर्शवत कार्यवाह तथा मुख्याध्यापक कै.ब.चि. सहस्रबुद्धे यांच्या नावाने जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येते.

जागतिक महामारी कोरोनाच्या काळात संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या क्रेडिट सोसायटीने कोविड ग्रस्त शिक्षकांना एक लाख विशेष कर्ज योजना सुरू करण्यात आली होती तसेच संस्थेतील कोणी कर्मचारी किंवा त्यांच्या घरातील सदस्य कोरोना बाधित असलेल्याना तात्काळ वैद्यकीय सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली तसेच संस्थेने प्रत्येक सभासदासाठी लस देण्याची मोहिमे सुरू केली होती. शताब्दी वर्षात विविध तज्ञ मार्गदर्शक संस्थेचे नामवंत माजी विद्यार्थी यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले या कामी संस्थेचे सर्व पदाधिकारी माजी विद्यार्थी पालक हितचिंतक उदार देणगीदार शिक्षण विभाग पालक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.
(श्री उमेश कुलकर्णी सहकार्यवाह , ना.ए.सोसायटी नाशिक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here