मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून राजापूर सह ४२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी

0
1
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून राजापूर सह ४२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी-saimat

साईमत येवला प्रतिनिधी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुमारे १८८ कोटी रुपये निधीतून राजापूरसह ४२ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या पाणीपुरवठा योजनेची आज मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

यावेळी येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, येवला शहराध्यक्ष दीपक लोणारी, भागिनाथ पगारे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, विजय जेजुरकर, सुमित थोरात, गोटू मांजरे, पार्थ कासार, गणेश गवळी, यांच्यासह पदाधिकारी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

राजापूरसह परिसरातील टंचाई ग्रस्त ४२ गावांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राजापूरसह ४२ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे १८८ कोटी रुपये का निधी मंजूर करण्यात आला असून या योजनेचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे. आज राजापूर वाघ वस्ती परिसरात सुरू असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. ही योजना राजापूरसह परिसरातील टंचाई ग्रस्त ४२ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून या गावांसाठी वरदान ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here